Sillod Assembly Constituency: `मी पडलो तर लाडकी बहीण योजना बंद पडेल`, सत्तारांकडून अपप्रचार

Suresh Bankar criticism Abdul Sattar: विकासाच्या नावाखाली गेली पंधरा वर्ष सत्ताधाऱ्यांनी जनतेच्या डोळ्यात फक्त धुळफेक करण्याचे काम केले आहे, अशी टीका बनकर यांनी केली.
Suresh Bankar
Suresh BankarSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Assembly Election 2024 : `मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण` योजनेवर विरोधकांकडून जेव्हा टीका झाली तेव्हा हेच मंत्री महोदय गावागावात फिरून ही योजना बंद होणार नाही. उलट आम्ही रक्कमेत वाढ करणार आहोत, असे सांगत होते. मात्र विधानसभा निवडणुक जाहीर होऊन पराभव दिसू लागतातच मी पडलो तर लाडकी बहीण योजना बंद होईल, असा अपप्रचार महायुतीच्या उमेदवारांनी सुरू केला आहे, असा टोला महाविकास आघाडीचे उमेदवार सुरेश बनकर यांनी मंत्री अब्दुल सत्तार यांना लगावला.

लाडकी बहीण योजना कोणत्याही परिस्थितीत बंद होणार नाही, राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर ही योजना आणखी प्रभावीपणे आणि वाढीव रक्कमेसह सुरू राहील, असेही बनकर मतदारांशी संवाद साधतांना सांगत आहेत. (Abdul Sattar) सिल्लोड-सोयगाव विधानसभा मतदारसंघात शिवसेना महाविकास आघाडीचे उमेदवार सुरेश बनकर यांनी मतदारांच्या थेट भेटीवर भर दिला आहे.

विकासाच्या नावाखाली गेली पंधरा वर्ष सत्ताधाऱ्यांनी जनतेच्या डोळ्यात फक्त धुळफेक करण्याचे काम केले आहे, अशी टीका बनकर यांनी केली. निवडणुकीत समोर पराभव दिसत असल्याने मंत्री सत्तारांकडून महिलांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. निवडणुकीत मी पडलो तर लाडकी बहीण योजना बंद पडेल, अशी अफवा सत्तार व त्यांचे समर्थक तालुक्यात पसरवत आहेत.

Suresh Bankar
Abdul Sattar : अब्दुल सत्तारांच्या सिल्लोड मतदारसंघात लागली शर्यत; जिंकणाऱ्याला मिळणार बुलेट

घाटनांद्रा गावातील संवाद दौऱ्यात सुरेश बनकर यांनी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या पंधरा वर्षातील कारभारावर टीका केली. (Shivsena) लाडकी बहीण योजना कुणीही बंद करु शकत नाही, असे सांगतानाच मतदारांनी कोणाच्याही भुलथापांना बळी न पडता निर्भयपणे मतदान करावे आणि तालुक्यात परिवर्तन घडवून इतिहास निर्माण करावा, असे आवाहन बनकर यांनी यावेळी केले.

घाटनांद्रा सर्कलमधील चारनेर, आमठाणा, देऊळगाव बाजार, कोटनांद्रा, धावडा, पेंडगाव, तळणी गावांमध्ये त्यांनी प्रचार सभा घेतल्या. सुनिल मिरकर, राजेंद्र जैस्वाल, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख रघुनाथ चव्हाण, विठ्ठल बदर, तालुकाप्रमुख रघुनाथ घरमोडे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष भास्कर घायवट, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रा.राहुलकुमार ताठे यावेळी सहभागी झाले होते.

Suresh Bankar
Shivsena Party & Symbol Case : शिवसेना कोणाची? निकाल कधी? सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या कार्यकाळात निकाल नाहीच

तसेच दत्तात्रय पांढरे, अजित पाटील, शांतीलाल अग्रवाल, देविदास आमटे, धाडस संघटनेचे जिल्हाध्यक्ष आकाश पाडळे, आनंदा मोरे, चंद्रशेखर सिरसाठ, किशोर जगताप, रामचंद्र मोरे, डिंगाबर मोरे, राजाराम पालोदकर, नथ्थु मोरे, देविदास पंडित, साहेबराव बांबर्डे, सुभाष जेठर, काकासाहेब मोरे, अरुण मोरे, पोपटराव कुंटे, अंबादास अंभोरे, सागर पवार यांची उपस्थिती होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com