Sambhajinagar News: विधानसभा निवडणुकीसाठी येत्या काही दिवसात मतदान होणार आहे. त्यामुळे मराठवाड्यातील या लढतींकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. त्यातच सत्ताधारी व विरोधकांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्याची एकही संधी सोडली जात नसल्याने वातावरण चांगलेच तापले आहे. विशेषतः मंत्री अब्दुल सत्तार यांच्या सिल्लोड मतदारसंघातील लढतीकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
सिल्लोड विधानसभा मतदारसंघात आमदार अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी विजयाचा विश्वास व्यक्त केला आहे. आता, त्यांच्या मतदारसंघातील लढतीवरुन दोन कार्यकर्त्यांमध्ये पैजेचा विडा लागला आहे. विशेष म्हणजे 500 रुपयांच्या बॉण्ड पेपरवर लिहून ही पैज लागली आहे. या निवडणुकीत कोणाला मताची आघाडी मिळणार यावरून ही शर्यत लागली आहे.
ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच महायुतीमधील रावसाहेब दानवे (Raosaheb Danave) मंत्री अब्दुल सत्तार यांच्यात चांगलीच जुंपल्याचं पाहायला मिळते. त्यामुळे वातावरण चांगलेच तापले असतानाच मंत्री अब्दुल सत्तार यांच्या निवडणुकीवरून पैज लावण्यात आली आहे. विशेष म्हणजे 500 रुपयांच्या बॉण्ड पेपरवर लिहून ही पैज लावण्यात आली आहे.
सिल्लोडमधील नदीम (दादा) शेख आणि अब्दुल कुरेशी या दोन कार्यकर्त्यांमध्ये पैज लावण्यात आली आहे. त्यानुसार, पैज जिंकणाऱ्याला नवी बुलेट गाडी देण्याचं वचन या पैजेतून देण्यात आले आहे. महाराष्ट्रात सगळीकडे निवडणुकीची धामधूम सुरू असताना कोण निवडून येणार यावर चर्चा सुरू झाली आहे.
मताधिक्यासाठी लागली शर्यत
सिल्लोड मतदारसंघातून अब्दुल सत्तार किती मताच्या फरकाने निवडून येणार यावर ही पैज लावली आहे. बॉण्ड पेपरवर लिहून पैज लावण्यात आली आहे. शेख नदीम आणि अब्दुल कुरेशी यांच्यामध्ये पैज ही पैज लागली आहे. ही पैज जिंकणाऱ्याला बुलेट गाडी मिळणार आहे. शेख नदीम यांच्यामते अब्दुल सत्तार हे 30 ते 40 हजारांच्या मतांनी निवडून येतील. तर, कुरेशी यांच्या मते 10 ते 20 हजार मतांनी ते विजयी होतील. त्यावरुन दोघांमध्ये बुलेटची दुचाकीची शर्यत लागली आहे.
सिल्लोडमध्ये चुरशीची लढत
सिल्लोड मतदारसंघात शिवसेना महायुतीकडून अब्दुल सत्तार विरुद्ध शिवसेना (युबीटी) महाविकास आघाडीकडून सुरेश बनकर यांच्यात थेट लढत होत आहे. त्यामध्ये, अब्दुल सत्तार हे विजयी होतील, असा विश्वास शर्यत लावणाऱ्या दोन्ही कार्यकर्त्यांना व्यक्त केला आहे. मात्र, किती मताधिक्यांनी ते निवडून येतील, यासाठी ही पैज लागली आहे. दरम्यान, कायद्याने अशाप्रकारच्या पैज लावणे हा गुन्हा आहे, त्यामुळे पोलीस या प्रकारानंतर काय करावे करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.