BJP News : पक्ष बदलला तरी नशीब साथ देईना, सत्तारांना घाम फोडणारे सुरेश बनकर यांची भाजपमध्ये घरवापसी!

Suresh Bankar, who challenged Abdul Sattar, returns to BJP : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत सुरेश बनकर यांचा पक्ष प्रवेश झाला. अब्दुल सत्तार यांचा करेक्ट कार्यक्रम करण्यासाठी बनकर यांना उद्धव ठाकरेंच्या सेनेते पाठवण्याची खेळी करणारे माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे हे देखील यावेळी उपस्थित होते.
Suresh Bankar News
Suresh Bankar NewsSarkarnama
Published on
Updated on

Marathwada Political News : विधानसभा निवडणुकीत तीन वेळा नशिब आजमावून देखील कपाळी विजयाचा गुलाल लागला नाही. अगदी 2024 मध्ये पक्ष ही बदलाल, पण नशिबात आमदारकी नसल्याने सिल्लोड-सोयगाव विधानसभा मतदारसंघातून सुरेश बनकर यांचा अवघ्या 2420 मतांनी पराभूत झाले. उमेदवारीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात गेलेले बनकर पुन्हा भाजपमध्ये परतले आहेत.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekahr Bawankule) यांच्या उपस्थितीत सुरेश बनकर यांचा पक्ष प्रवेश झाला. अब्दुल सत्तार यांचा करेक्ट कार्यक्रम करण्यासाठी बनकर यांना उद्धव ठाकरेंच्या सेनेते पाठवण्याची खेळी करणारे माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे हे देखील यावेळी उपस्थित होते. सिल्लोड-सोयगाव मतदारसंघात सुरेश बनकर यांचा विजय झाला नसला तरी अब्दुल सत्तार यांच्या विरोधात तालुक्यात किती हवा आहे, हे दाखवण्यात दानवे आणि स्थानिक भाजपचे नेते यशस्वी ठरले.

अब्दुल सत्तार यांना मिळालेला विजय संशयास्पद असल्याचा आरोप (BJP) भाजपसह महाविकास आघाडीने केला होता. अगदी या विरोधात न्यायालयात देखील धाव घेण्यात आली. अब्दुल सत्तार थोडक्यात बचावल्याने त्यांचे हवेत उडालेले विमान जमीनीवर आणण्याचे काम सिल्लोडच्या मतदारांनी केले. याचा धक्का अब्दुल सत्तार यांना इतका बसला होता, की त्यांनी आपण पुढील विधानसभा निवडणूक लढणार नाही, असे जाहीर करून टाकले होते.

Suresh Bankar News
Sillod Assembly Election : ‘मविआ’चे उमेदवार सुरेश बनकर यांच्यासह भाजप पदाधिकाऱ्यांना मारहाण

बनकर यांची घरवापसी का?

सुरेश बनकर हे सुरवातीपासून भाजपचे कट्टर पदाधिकारी आणि रावसाहेब दानव यांचे समर्थक म्हणून ओळखले जातात. सिल्लोडमधून त्यांनी चौथ्यांदा विधानसभा निवडणूक लढवली होती. त्यांना विजय मिळाला नसला तरी उद्धव ठाकरे यांच्या पक्षात गेल्यानंतर सत्तार विरोधकांनी एकजूटीने बनकर यांचा किल्ला लढवला होता. मुळचे भाजपचे असलेले सुरेश बनकर केवळ विधानसभेच्या उमेदवारीसाठी उद्धव ठाकरेंच्या पक्षात गेले होते हे स्पष्ट होते.

Suresh Bankar News
Abdul Sattar : मुलाला आमदार करण्यासाठी अब्दुल सत्तारांची नवी खेळी!

आता निवडणुकीत पराभव झाल्यामुळे आगामी जिल्हा परिषद, नगरपरिषद व इतर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका पाहता अब्दुल सत्तार यांचे मतदारसंघातील वर्चस्व कमी करण्यासाठी सुरेश बनकर यांना मिळालेल्या पाठिंब्याचा मोठा फायदा भाजपला होऊ शकतो. सत्तार यांचा विधानसभा निवडणुकीत विजय झाला असला, तरी त्यांच्याविरोधातील वातावरणाची धग अजून कायम आहे.

Suresh Bankar News
Raosaheb Danve on Shiv Sena : ...तर हातात हात मिळवण्याची तयारी; ठाकरे सेनेबाबत रावसाहेब दानवेंच्या मनात नेमकं काय?

शिवाय सिल्लोडमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची ताकद मर्यादित आहे. अशावेळी भाजपमध्ये घरवापसी करणे हिताचे ठरेल अशी त्यांच्या समर्थकांचीही मागणी होती. शिवाय विधानसभा निवडणुकीआधी ठरलेल्या स्क्रीप्ट प्रमाणेच बनकर यांची भाजपमधील घरवापसी म्हणावी लागेल. त्यामुळे बनकर यांच्या भाजप प्रवेशाचे फार आश्चर्य वाटायला नको.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com