BJP News : जिल्हाध्यक्ष नियुक्त होताच परभणीत भाजपकडून स्वबळाचा नारा!

Suresh Bhumre, newly appointed BJP District President of Parbhani, asserts focus on strengthening the party independently. : आमची संपूर्ण तयारी झाली असली तरी या संदर्भातला अंतिम निर्णय हा पक्षश्रेष्ठीच घेतील, आमची मात्र स्वबळावर लढण्याची इच्छा असून पदाधिकारी, कार्यकर्त्यांची परीक्षा म्हणून भाजपने आम्हाला ही संधी द्यावी.
Suresh Bhumre Appoint As A BjP District President Parbhani News
Suresh Bhumre Appoint As A BjP District President Parbhani NewsSarkarnama
Published on
Updated on

Parbhani Political News : परभणी भारतीय जनता पक्षाच्या संघटनात्मक बांधणीमध्ये नुकतेच जिल्हाध्यक्ष पद मिळालेले सुरेश भुमरे यांनी आपल्या पहिल्याच पत्रकार परिषदेत आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत स्वबळावर लढण्याची इच्छा व्यक्त केली. स्वबळावर लढण्याची आमची संपूर्ण तयारी झाली असून पक्षाने एकदा आमची परीक्षा घ्यावी, आणि कार्यकर्त्यांना संधी द्यावी असे आवाहन सुरेश भुमरे यांनी माध्यमांशी बोलताना केले.

सुरेश भुमरे यांनी परभणी (Parbhani) जिल्ह्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आता शिल्लक राहिलेला नाही. आहे ती फक्त खासदार बंडु जाधव आणि आमदार राहुल पाटील यांची सेना, असा टोला लगावला. भाजपमध्ये कुठल्याही प्रकारची गटबाजी नसून माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला पक्षाने जिल्हाध्यक्षपदावर नियुक्त करून काम करण्याची संधी दिली त्याबद्दल मी पालकमंत्री मेघना बोर्डीकर आणि राज्यस्तरावरील वरिष्ठ नेत्यांचे आभार मानतो.

आमच्या पक्षात एकाधिकारशाही नाही. जिल्हा, राज्य पातळीवरची कोरअर कमिटी आणि देशपातळीवरची कोअर कमिटी यांच्या समन्वयातून पक्षातील नियुक्त्या आणि धोरण राबवली जातात. (BJP) त्यामुळे कोणी काहीही म्हणत असले तरी स्थानिक पातळीवर भाजपाचा नेत्यांशी आणि कार्यकर्त्यांशी चांगला संपर्क आहे.

Suresh Bhumre Appoint As A BjP District President Parbhani News
BJP News : अजित कव्हेकर-बसवराज पाटील यांची जोडी लातूर जिल्ह्यात भाजपला 'अच्छे दिन' आणतील का?

या जोरावरच आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत जिल्हा परिषदेच्या सर्व सर्कल, नगरपंचायतीच्या वार्डांमध्ये तसेच महापालिकेच्या सगळ्या वार्डात भारतीय जनता पक्ष स्वबळावर लढण्याच्या तयारीत आहे. आमची संपूर्ण तयारी झाली असली तरी या संदर्भातला अंतिम निर्णय हा पक्षश्रेष्ठीच घेतील, आमची मात्र स्वबळावर लढण्याची इच्छा असून पदाधिकारी, कार्यकर्त्यांची परीक्षा म्हणून भाजपने आम्हाला ही संधी द्यावी, या मागणीचा पुनरुच्चारही सुरेश भुमरे यांनी केला.

Suresh Bhumre Appoint As A BjP District President Parbhani News
Mahadev Jankar On BJP : भाजपप्रणित एनडीएसोबत जाणं, ही आमची चूक होती : महादेव जानकरांची दिल्लीत जाहीर कबुली

आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत आमच्या नेत्या मंत्री मेघना बोर्डीकर, रामप्रसाद बोर्डीकर यांच्या नेतृत्वाखाली आम्ही संपूर्ण जिल्ह्यात भाजपाला मोठे यश मिळवून देण्यात यशस्वी होऊ, असा विश्वासही सुरेश भुमरे यांनी व्यक्त केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com