
New Delhi, 02 June : राष्ट्रीय लोकशाही आघाडीसोबत (भाजप) जाणे, ही आमची चूक होती. पण काही मजबुरीमुळे आम्ही त्यांच्यासोबत गेलो होतो. पण त्यांनी (भाजप) आम्हाला धोका दिला आहे. जेव्हा वेळ येईल, तेव्हा भाजप आणि एनडीएला नक्कीच पराभूत करू, अशी घोषणा राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष तथा माजी मंत्री महादेव जानकर यांनी दिल्लीतील कार्यक्रमातून दिली.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 300 वी जयंती कार्यक्रमाचे राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने दिल्लीतील तालकटोरा स्टेडियमध्ये आयोजन करण्यात आले होते. त्या कार्यक्रमात बोलताना महादेव जानकर यांनी भाजपप्रणित एनडीए आघाडीसोबत (NDA) जाणे ही आमची चूक होती, अशी कबुली जाहीररित्या दिली आहे. त्यामुळे राज्यात नव्या चर्चेला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
आम्ही भाजपप्रणित एनडीएसोबत जाऊन चूक केली. मजबुरीमुळे आम्ही त्यांच्यासोबत गेलो होतो. पण, त्यांनी आम्हाला धोका दिला आहे. आम्हाला जेव्हा संधी मिळेल, तेव्हा आम्ही त्यांनाही सत्तेवरून नक्कीच हटवू. ज्यांनी आम्हाला धोका दिला आहे, त्यांना निवडणुकीत पराभूत करण्यासाठी काम करत राहू, असे महादेव जानकर (Mahadev Jankar) यांनी स्पष्ट केले.
जानकर म्हणाले, काँग्रेस पक्ष सत्तेवर होता, मोठा पक्ष होता, तेव्हा आम्हाला काँग्रेसकडून कोणी विचारतही नव्हते, त्यामुळे मागील काळात आम्हाला एनडीएसोबत जावं लागलं. काही मजबुरी असतात. पण आम्ही संविधानाला मानणारे सरकार देशाच्या सत्तेवर आणण्यासाठी संघर्ष करायला तयार आहोत.
आम्ही एनडीएसोबत नाही, असे मी मागच्या एक दोन दिवसांत सांगत होतो. इंडिया आघाडीवाले आम्हाला सोबत घेतील, असे वाटत होते. त्यामुळे कोणी लाईन मारत असेल तर आम्ही त्यांच्यासोबत आघाडी करण्यास तयार आहोत, असे मी सांगितले आहे. आम्ही काँग्रेसकडे मैत्रीचा हात पुढे केला आहे. त्याला प्रतिसाद देणं न देणं तुमच्या हातात आहे. पण, एक दिवस आम्ही दिल्लीवर नक्कीच राज्य करू, असा विश्वासही जानकरांनी बोलून दाखवला.
सर्व संत आणि महापुरूषांच्या विचाराने आम्ही वाटचाल करत आहेात. आम्ही महात्मा फुलेंना आयडॉल मानले आहे, त्यांच्या विचारांनुसार आम्ही वाटचाल करणार आहोत. राष्ट्रीय समाज पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आपापल्या राज्यात पक्षाची ताकद वाढविली पाहिजे, असा सल्लाही त्यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना दिला.
मी चौंडीत अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी करण्या सुरुवात केली. तेव्हा आज जे चौंडीत होळकरांची जयंती साजरी करत आहेत, ते मला विरोध करत होते. पण आम्ही सुरुवातीला अवघ्या २५ जणांनी चौंडीत अहिल्यादेवी होळकरांची जयंती करायला सुरुवात केली, अशी आठवणही महादेव जानकरांनी सांगितली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.