
Mumbai News : मुंबई :भाजप आमदार सुरेश धस हे सध्या राजकीय वर्तुळासह संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेचा विषय ठरत आहे. त्यांनी बीडमधील मस्साजोगचे दिवगंत सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचं प्रकरण उचलून धरत त्यात एकाहून एक अशी धक्कादायक माहिती समोर आणत आहे. इतक्या दिवस संतोष देशमुख हत्या प्रकरणावरुन मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते धनंजय मुंडे,वाल्मिक कराड यांच्यावर मोठे आरोप केले आहेत. त्यातच भाजप आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांनी आणखी एक धक्कादायक दावा केला आहे.
बीड लोकसभा निवडणुकीत भाजपच्या पंकजा मुंडे यांचा धक्कादायक पराभव झाला होता.राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार बजरंग सोनवणे यांनी अटीतटीच्या लढतीत पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांचा अवघ्या 6 हजार मतांनी पराभव केला होता. या पराभवाविषयीच धस यांनी मोठं विधान केलं आहे. हा पराभव धनंजय मुंडे यांच्यामुळेच झाला असा गौप्यस्फोट सुरेश धस यांनी करत महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवून दिली आहे.
आमदार सुरेश धस यांनी एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बीडमधील घटनेवरुन धक्कादायक खुलासे केले आहेत.तसेच त्यांनी पंकजा मुंडे यांच्या पराभवावर भाष्य केले. ते म्हणाले, लोकसभेतील पंकजा मुंडे यांचा पराभव हा धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडच्या दहशत आणि वागण्यामुळे झाला. मात्र, त्यासाठी आम्हाला जबाबदार ठरवण्यात आलं.कराडमुळेच बजरंग सोनवणे यांनी धनंजय मुंडे यांची साथ सोडली.सोनवणे यांच्यासारखा तगडा उमेदवार उभा राहिल्यानेच पंकजा यांचा पराभव झाला असंही सुरेश धस म्हणाले.
मुंडे आणि कराडमुळे यांच्याविषयी मोठी नाराजी परळीत आहे. त्याचाच फटका पंकजा मुंडे यांना लोकसभेच्या निवडणुकीत पंकजा यांना बसला. माझ्या मतदारसंघातून त्यांना 31 हजारांचं लीड मिळालं. परळीमधून 73 हजारांचं लीड मिळालं. पण एकट्या बीड तालुक्यातून त्या 98 हजारांनी मागं पडल्या, असं सुरेश धस म्हणाले.
पंकजा मुंडेंना हे सगळं माहित आहे. पण त्या थेट बोलू शकत नाही.म्हणून मी हे बोलतोय असंही सुरेश धस म्हणाले. आम्ही प्रामाणिक काम करुनही लोकसभेच्या पराभवाला आम्हालाच जबाबदार ठरवलं गेलं. त्यामुळेच विधानसभेला आमच्याविरोधात पंकजा मुंडे यांनी उमेदवार दिल्याचं भाजप आमदार धस यांनी सांगितलं.
मी कुणालाही घाबरत नाही.कुणालाही मोजीत नाही,त्यामुळे मला कुठल्याही संरक्षणाची गरज नाही. पण जे लोकप्रतिनिधी या विरोधात आवाज उठवतात, त्यांच्या कुटुंबीयांना संरक्षण देण्यात यावं,अशी अपेक्षाही धस यांनी बोलून दाखवली.
संतोष देशमुखला इतक्या भयानक प्रकारे मारल्यानंतरही आमच्या जिल्ह्याचे माजी पालकमंत्री म्हणतात,देशातल्या सगळ्या जिल्ह्यांत अशा अपहरण आणि हत्या होतात. हे कोण बोललं तर धनंजय मुंडे बोलले आहेत. ही सगळी अतिशय बेकार टोळी आहे. सुदर्शन घुले, प्रतिक घुले, आंधळे हे मुलं 21, 22, 23 वर्षांचे तरुण आहेत. त्यांच्यात एकच 30 वर्षांचा आहे. या तरुणांच आयुष्य कुठे घातलं तुम्ही? संतोषला रिंगण करुन मारल्याचा दावाही धस यांनी केला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.