Suresh Dhas : मुख्यमंत्र्यांआधीच सुरेश धस यांनी संतोष देशमुख हत्याप्रकरणी दिली मोठी माहिती; तपासाला वेग येणार

Santosh Deshmukh murder investigation : या प्रकरणाच्या चौकशीसाठी 1 जानेवारीला नेमण्यात आलेली एसआयटी रद्द करून चौकशीसाठी सात जणांची एसआयटी स्थापन केली असल्याची माहिती भाजप आमदार सुरेश धस यांनी दिली.
BJP MLA Suresh Dhas
BJP MLA Suresh DhasSarkarnama
Published on
Updated on

Beed News : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या होऊन महिना उलटला आहे. तरी या प्रकरणातील एक आरोपी फरार आहे. तर दुसरीकडे मोक्काचा गुन्हा दाखल करण्यासाठी दिरंगाई केली जात असल्याने आक्रमक झालेल्या ग्रामस्थानी सोमवारी आंदोलन केले. यावेळी धनंजय देशमुख यांनी पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केले. संतोष देशमुखांच्या हत्येप्रकरणचा मास्टरमाईंड वाल्मिक कराड असल्याचा आरोप त्यांनी केला. त्यामुळे वाल्मिक कराडवर मोक्का लावावा, अशी मागणी केली जात असतानाच आता या प्रकरणाच्या चौकशीसाठी 1 जानेवारीला नेमण्यात आलेली एसआयटी रद्द करून चौकशीसाठी सात जणांची एसआयटी स्थापन केली असल्याची माहिती भाजप आमदार सुरेश धस यांनी दिली.

संतोष देशमुख हत्या प्रकरणात भाजप (BJP) आमदार सुरेश धस यांनी मोठी माहिती दिली आहे. आधीच्या एसआयटीवर देशमुख कुटुंबाचा आक्षेप होता. या घटनेतील आरोपी एसआयटीतील अधिकाऱ्यांच्या संपर्कातील होते, असाही आरोप देशमुख कुटुंबाकडून करण्यात आला होता. त्याचमुळे नव्या एसआयटीची स्थापना करण्यात आल्याची माहिती धस यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

BJP MLA Suresh Dhas
Santosh Deshmukh : अश्विनी देशमुखांचा CID समोर धक्कादायक जवाब; विष्णू चाटे अन् वाल्मिक कराडने महिन्याभरापूर्वीच...

या प्रकरणी आता सात जणांच्या नव्या एसआयटीची स्थापना करण्यात आली आहे. या पूर्वीच्या एसआयटीमधील बरेच अधिकारी हे आरोपी वाल्मिक कराड यांच्या संपर्कातील होते. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करताना अडचण येण्याची शक्यता होती. त्यामुळे १ जानेवारीला स्थापन करण्यात आलेली एसआयटी रद्द करावी, अशी मागणी देशमुख कुटुंबीयांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेऊन केली होती. त्यानुसार आता नव्याने सात जणांची एसआयटी नेमली असल्याचे आमदार धस (Suresh Dhas) यांनी सांगितले.

BJP MLA Suresh Dhas
Santosh Deshmukh Murder Case : पोलिसांचा टॉवरला बंदोबस्त; धनंजय देशमुखांचे पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन

या पूर्वी नेमण्यात आलेल्या एसआयटीमध्ये पोलीस उपमहानिरीक्षक बसवराज तेली यांच्या अध्यक्षतेखालील या विशेष तपास पथकात पोलीस उपअधीक्षक अनिल गुजर, सपोनि विजयसिंग जोनवाल, पीएसआय महेश विघ्ने आणि पीएसआय आनंद शंकर शिंदे, सहाय्यक पीएसआय तुळशीराम जगताप यांच्याशिवाय इतर पोलीस कर्मचारी यांचा समावेश करण्यात आला होता. ही एसआयटीची कमेटी आता रद्द करण्यात आली आहे.

BJP MLA Suresh Dhas
Santosh Deshmukh Murder : संजय शिरसाटांचे मोठे विधान; ‘दोन दिवस वाट पाहा, वाल्मिक कराड किंवा आणखी कोणी...? तोही यातून वाचणार नाही’

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com