Ashok Chavan : भाजपला घरचा आहेर, अशोक चव्हाणांची पाठराखण; सूर्यकांता पाटील नेमके काय म्हणाल्या?

Surykanta Patil : नांदेडमधील भाजपच्या पराभवाला अशोक चव्हाण जबाबदार नाहीत. ते खूप मोठे नेते आहेत, पण भाजपमध्ये प्रवेश करून त्यांनी मोठी चूक केली.
Ashok Chavan, Surykanta Patil
Ashok Chavan, Surykanta PatilSarkarnama

Nanded Political News : लोकसभेच्या निवडणुकीत नांदेड मतदारसंघात झालेल्या पराभवानंतर भाजपमध्ये अशोक चव्हाणांच्या नावाची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. दिल्लीत शनिवारी एनडीएच्या खासदारांच्या संसदेतील सेंट्रल हाॅलमध्ये झालेल्या बैठकीतही अशोक चव्हाण दुर्लक्षित होते. नेते पदी मोदींची निवड झाल्यानंतर सगळे नेते, खासदार त्यांच्या सत्कारासाठी पुढे सरसावले. त्यात अशोक चव्हाण हे बराच वेळ हात जोडून उभे होते, पण मोदींनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केले.

नांदेडमध्ये झालेल्या पराभवाचे खापर अशोक चव्हाण यांच्यावर फोडले जात असताना माजी केंद्रीय राज्यमंत्री व भाजपाच्या नांदेडमधील नेत्या सूर्यकांता पाटील या अशोक चव्हाणांच्या समर्थनात सरसावल्या आहेत. एका मुलाखतीत नांदेडमधील भाजपच्या पराभवाला अशोक चव्हाण जबाबदार नाहीत. ते खूप मोठे नेते आहेत, पण भाजपमध्ये प्रवेश करून त्यांनी मोठी चूक केली, असेही पाटील यांनी म्हटले आहे.

अशोक चव्हाण Ashok Chavan यांच्या भाजप प्रवेशानंतर स्थानिक नेते नाराज झाल्याची चर्चा होती. लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर ही नाराजी मोठ्या प्रमाणात समोर येईल असे वाटत होते. मात्र नांदेडमधील पराभवावरून अशोक चव्हाणांना लक्ष्य करणाऱ्या स्वपक्षातील नेते, पदाधिकारी, कार्यकर्त्यांना सूर्यकांता पाटील यांनीच घरचा आहेर दिला आहे.

राज्यसभेतील खासदारकी एवढीच अशोक चव्हाण यांची लायकी नाही. ते खूप मोठे नेते आहेत, पण भाजपमध्ये येऊन त्यांनी चूक केली. मराठा आरक्षण आणि अशोक चव्हाण यांनी काँग्रेस पक्ष सोडल्याबद्दल असललेल्या नाराजीचा फटका प्रताप पाटील चिखलीकर Pratap Patil Chikhlikar यांना बसला. त्यामुळे अशोक चव्हाण यांच्यामुळे भाजपचा, चिखलीकरांचा पराभव झाला असे कोणी म्हणू शकत नाही, असेही पाटील यांनी म्हटले आहे.

Ashok Chavan, Surykanta Patil
Rohit Pawar : कॅबिनेट नाही मात्र ईडीची कारवाई थांबली; रोहित पवारांचे प्रफुल पटेल, अजितदादांच्या वर्मावर बोट

अवघ्या दोन तासांनी केंद्रातील एनडीए सरकारचा तिसऱ्यांदा शपथविधी होणार आहे. नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतील. मंत्रीमंडळातील मंत्र्यांची नावे अंतिम झाली आहेत. मराठवाड्यातील लोकभेच्या जालना मतदारसंघातून रावसाहेब दानवे पराभूत झाले आहेत, तर केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डाॅ. भागवत कराड यांना वगळण्यात आले आहे.

लोकसभेच्या छत्रपती संभाजीनगर मतदारसंघातून एकमेव संदीपान भुमरे Sandipan Bhumre हे निवडून आले असले तरी शिवसेना शिंदे गटाकडून त्यांच्याऐवजी बुलडाण्यातील प्रतापराव जाधव यांचे नाव मंत्रीपदासाठी फायनल करण्यात आले. त्यामुळे मराठवाड्यातून काही महिन्यापूर्वी भाजपमध्ये प्रवेश केलेले आणि राज्यसभेचे खासदार असलेल्या अनुभवी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा समावेश केला जाईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र मराठवाड्यातील महायुतीच्या पराभवामुळे त्यांच्या नावाचा विचार झाला नसल्याचे बोलले जाते.

(Edited by Sunil Dhumal)

Ashok Chavan, Surykanta Patil
Raksha Khadse : शरद पवारांच्या 'त्या' फॅक्टरमुळे रक्षा खडसेंच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com