Rohit Pawar : कॅबिनेट नाही मात्र ईडीची कारवाई थांबली; रोहित पवारांचे प्रफुल पटेल, अजितदादांच्या वर्मावर बोट

Ajit Pawar, Praful Patel : लोकसभेत एक खासदार निवडून आल्यानंतर अजितदादांनी केंद्रात दोन मंत्रि‍पदे मिळण्याची अपेक्षा दोन दिवसांपूर्वी भाजपश्रेष्ठींपुढे केली होती. प्रत्यक्षात मात्र त्यांना एकच राज्यमंत्री पदाची ऑफर करण्यात आलेली आहे.
Rohit Pawar
Rohit PawarSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Political News : नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात रविवारी भाजपचे 3.0 सरकार स्थापन होत आहे. राष्ट्रपती भवनात होणाऱ्या शपथविधी सोहळ्यात राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचा एकही नेता शपथ घेणार नसल्याचे आता स्पष्ट झाले आहे. पूर्वी कॅबिनेट मंत्री असलेल्या प्रफुल पटेलांना राज्यमंत्री (स्वातंत्र्य कारभार) पदाची ऑफर होती. यावर शरद पवार गटाचे नेते रोहित पवारांनी त्यांना मंत्रीपद दिले नसले तरी भाजपने ईडीचा ससेमिरा कमी करुन त्यांना व्यक्तिगत फायदा करुन दिल्याची बोचरी टीका अजित पवारांसह पटेल यांच्यावर केली आहे.

लोकसभेत एक खासदार निवडून आल्यानंतर अजितदादांनी Ajit Pawar केंद्रात दोन मंत्रि‍पदे मिळण्याची अपेक्षा दोन दिवसांपूर्वी भाजपश्रेष्ठींपुढे केली होती. प्रत्यक्षात मात्र त्यांना एकच राज्यमंत्री पदाची ऑफर करण्यात आलेली आहे. मात्र ती ऑफर न स्वीकारण्याचा निर्णय राष्ट्रवादीने घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. यावर रोहित पवारांनी अजित पवारांवर निशाणा साधला आहे.

रोहित पवार Rohit Pawar म्हणाले, जे नेते पवारसाहेबांना सोडून भाजपसोबत गेलेले आहेत, त्यांना व्यक्तिगतरित्या खूप काही मिळालेले आहे. प्रफुल पटेल यांच्यावर ईडीने कारवाई केली होती. त्यांचे घर आणि ऑफिस जप्त केले होते. आता ती कारवाई थांबवून घर आणि ऑफिसही त्यांना परत केलेले आहे. पण मंत्रिपद दिले नसल्याने कुठेतरी विचार करण्याची वेळ आली आहे.

आम्ही पहिल्यापासून म्हणत आलो आहे, की भाजप लोकसभा निवडणुकीपुरताच अजितदादांचा वापर करून आहेत. मात्र या निवडणुकीत भाजपला त्यांचा काहीच फायदा झालेला नाही. आता लोकसभेनंतर विधानसभा लढवयाची असेल, तर अजितदादा आणि त्यांच्या आमदारांपुढे कमळाच्या चिन्हाचा हा एकच पर्याय असेल असा केंद्रिय भाजपच्या नेत्यांनी संदेश दिल्याचे दिसते, असे मतही रोहित पवारांनी व्यक्त केले.

Rohit Pawar
Praful Patel News : राष्ट्रवादी कॅबिनेट मंत्रिपदावर ठाम; प्रफुल पटेल यांनी सांगितले 'हे' कारण

राज्यमंत्री पद दिल्यानंतर फडणवीसांनीच अजितदादा, पटेल Praful Patel आणि तटकरेंची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. यावर राज्याच्या नेत्यांनी कितीही समजूत काढली तरी भाजपमध्ये काही फरक पडत नाही. शेवटी त्यांना सर्व रिपोर्ट दिल्लीलाच पाठवावे लागतात. समजूत काढताना असेही ठरलेले असेल, की आता ईडीच्या कारवाया थांबवल्या आहेत. आता राहिलेल्या कारवायातूनही तुमची मुक्तता करण्याचा समझोता झालेला असेल, अशी शंकाही रोहित पवारांनी व्यक्त केली.

(Edited by Sunil Dhumal)

Rohit Pawar
Narendra Modi Oath Ceremony LIVE : राष्ट्रवादीनेच धुडकावली मंत्रिपदाची ऑफर; फडणवीसांची मनधरणी निष्फळ

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com