Dharashiv Loksabha : मैदानात तर या..! ओमराजेंनी भाजपला दिले आव्हान...

Omraje challenged BJP : कुणाला आजी आणि कुणाला माजी करायचं हे लोक ठरवतील, तुमचा पैलवान तरी उतरवा...
Omraje Nimbalkar
Omraje NimbalkarSarkarnama

- शीतल वाघमारे

Dharashiv Loksabha : मी अकार्यक्षम आहे, माझ्या कामाबद्दल लोकांमध्ये तीव्र नाराजी आहे. जर माझे लोकमतांमध्ये शून्य स्थान असेल तर भाजपला इतका वेळ का लागतो उमेदवार जाहीर करायला ? कुणाला आजी आणि कुणाला माजी करायचं हा अधिकार जनतेला आहे. भारतीय जनता पार्टीने पैलवान जाहीर करून मैदानात यावे, असे आव्हान खासदार ओमराजे निंबाळकर यांनी भारतीय जनता पार्टीला दिले.

महाविकास आघाडीसह सगळ्या पक्षाकडून एक मत झालं आणि त्या ठिकाणी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जर परत मला लोकसभा लढविण्याची संधी दिली तर मी लोकसभा निवडणूक लढविणार असल्याचा प्रथमच खुलासा खासदार ओमराजे निंबाळकर यांनी केला आहे. ओमराजे हे मंगळवारी दिशा समितीची बैठक झाल्यानंतर पत्रकारांशी ते बोलत होते.

Omraje Nimbalkar
Satara Political : उपमुख्यमंत्री फडणवीस आज जिल्हा दौऱ्यावर ; लोकसभेच्या पार्श्वभूमीवर कोणती घोषणा करणार ?

धाराशिव शहरात रविवारी महायुतीचा जिल्हास्तरीय कार्यकर्ता मेळावा पार पडला. राज्याचे आरोग्यमंत्री तथा धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी खासदार ओमराजे यांनी एक प्रकल्प आणल्याचा दाखवावा, म्हणेल ती पैज हरायला तयार आहे, असे आव्हान दिले होते. ते म्हणाले की, कोण कशा पद्धतीने बघतंय, कोण कशा पद्धतीने बोलतंय.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

याच्यापेक्षा जनतेतून निवडून येत असताना जनतेचे प्रत्येक मत हे त्या ठिकाणी महत्त्वाचे असते. जनता शेवटी निर्णय घेत असते. कुणाचं काम योग्य आहे, कुणाचं काम अयोग्य आहे. याचं मूल्यमापन जनता निवडणुकीच्या माध्यमातून करीत असते. त्यामुळे घोडामैदान लांब नाही, काही दिवसांनी लोकसभा निवडणुका होणार आहेत.

महाविकास आघाडीचे सगळ्या पक्षाकडून एकमत झालं तर आणि त्या ठिकाणी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जर परत लढण्याची, मला लोकसभा लढविण्याची संधी दिली तर मी लोकसभा निवडणूक लढविणार आहे. जे मी पाच वर्षे अखंड काम केले तर त्या कामाचं अवलोकन करून इथली जनता काय ते निर्णय घ्यायचा तो घेईल.

कुणाला आजी आणि कुणाला माजी करायचं हा अधिकार जनतेला आहे. मी अकार्यक्षम आहे, माझ्या कामाबद्दल लोकांमध्ये तीव्र नाराजी आहे. जर माझे लोकमतांमध्ये शून्य स्थान असेल तर भाजपला इतका वेळ का लागतो उमेदवार जाहीर करायला ? त्याचा विचार भारतीय जनता पार्टीसह महायुतीने करावा. भारतीय जनता पार्टीने पैलवान तरी मैदानात उतरवावा.

जनता ठरवेल. जर प्रामाणिकपणे काम केल्याचा मोबदला जनता देणार असेल तर जनतेला निर्णय घेऊ द्या. जनतेला जर वाटलं माझं पाच वर्षांचं काम योग्य आहे तर जनता ठरवेल. जर लोकांना अयोग्य आहे असं वाटलं तर त्यांचा निर्णय ते घेतील, असे ओमराजे यांनी सांगितले.

(Edited by Amol Sutar)

R...

Omraje Nimbalkar
Nashik Politics : भाजपच्या बालेकिल्ल्यात पवारांच्या राष्ट्रवादीचे 'तेरे राम... मेरे राम...'

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com