Uddhav Thackeray Sabha News : शिंदे गटाने टार्गेट केलेल्या केंद्रेकरांचे ठाकरेंकडून कौतुक..

Shivsena Political News : केंद्रेकर यांच्याबद्दल सर्वसामान्य व शेतकऱ्यांमध्ये सहानुभूती निर्माण झाली आहे.
Uddhav Thackeray-Kendrekar News
Uddhav Thackeray-Kendrekar NewsSarkarnama

Marathwada Political News : पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची हिंगोलीत निर्धार सभा झाली. आक्रमक भाषण करत ठाकरेंनी शिंदे-फडणवीस आणि पंतप्रधान मोदी यांच्यावर तोफ डागली. राज्यातील सरकार हे कसे शेतकरी विरोधी आहे हे सांगतांना ठाकरेंनी आपल्या भाषणात माजी विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर (Sunil Kendrekar News) यांचा एक कर्तबगार अधिकारी म्हणून उल्लेख केला.

Uddhav Thackeray-Kendrekar News
Rohit Pawar On Ajit Pawar : बारामती अन् बीडमध्ये 'दादा गटा'ची डाळ शिजली नाही; नेमकं काय झालं ते रोहित पवारांनी सांगितलं

मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी, त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी शासनाला केंद्रेकरांनी सादर केलेला अहवाल फेटाळण्यात आला याचा संदर्भ देत त्यांना जबरदस्तीने स्वेच्छा निवृत्ती घ्यायला भाग पाडल्याचा आरोपही केला. (Shivsena) भाषणातील तीन मिनिटे ठाकरे (Uddhav Thackeray) केंद्रेकर यांच्यावर बोलत होते, त्यांचे कौतुक करत होते. विशेष म्हणजे शेतकऱ्यांच्या संदर्भातील अहवाल केंद्रेकरांनी सरकारला सादर केल्यानंतर त्यावर ठोस निर्णय घेण्याऐवजी त्यांच्यावरच आरोप केले गेले.

शिंदे गटाच्या खांद्यावर बंदूक ठेवून भाजपने देखील केंद्रेकरांवर निशाणा साधल्याची चर्चा होती. शिवसेनेचे प्रवक्ते आमदार संजय शिरसाट यांनी तर केंद्रकर यांच्यावर गुन्हा दाखल करून चौकशीची मागणी विधीमंडळ अधिवेशन सुरू असतांना केली होती. (Hingoli) अशावेळी उद्धव ठाकरे यांनी हिंगोलीच्या सभेत केंद्रेकरांची पाठराखण करत त्यांचे कौतुक केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. एक कडक शिस्तीचा प्रशासकीय अधिकारी म्हणून केंद्रेकराची कारकीर्द गाजली.

शेतकरी कुटुंबातून आल्यामुळे त्यांचे दुःख जवळून अनुभवणाऱ्या केंद्रेकर यांनी शासकीय सेवेतील शेवटच्या दोन अडीच वर्षात मराठवाड्यातील दुष्काळ आणि त्यामुळे सातत्याने होणाऱ्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या या विषयावर गांभीर्याने काम सुरू केले होते. १० लाख शेतकऱ्यांच्या सर्वेतून समोर आलेल्या गोष्टी आणि त्यावरील उपयायोजना केंद्रेकरांनी अहवालातून सुचवल्या होत्या. पण शासनाने त्याला केराची टोपली दाखवली. त्यामुळेच त्यांच्या स्वेच्छा निवृत्तीच्या निर्णयाकडे राजकीय दबाव या अर्थानेच पाहिले गेले.

त्यामुळे केंद्रेकर यांच्याबद्दल सर्वसामान्य व शेतकऱ्यांमध्ये सहानुभूती निर्माण झाली आहे. राज्याच्या राजकारणात शिंदे गटाने बंड केल्यानंतर उद्धव ठाकरे यांना देखील राज्यात मोठ्या प्रमाणावर सहानुभूती मिळत आहे. याच सहानुभूतीच्या लाटेवर स्वार होत ठाकरे पुन्हा राज्यात सत्ता आणू पाहत आहेत. याच सत्तेचा एक भाग किंवा प्रतिनिधित्व केंद्रेकरांच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न तर या कौतुकामागचे कारण नाही ना? अशी चर्चाही या निमित्ताने होत आहे.

Uddhav Thackeray-Kendrekar News
Thackeray Group On Ajit Pawar: सत्तेची हाव नाही, मग काकांचा पक्ष का फोडला? अजितदादांच्या विकासाची व्याख्या म्हणजे...

स्वेच्छा निवृत्तीनंतर आपण शेतीत रमणार असे केंद्रेकरांनी स्पष्ट केले होते. त्यानंतर बीआरएसचे महाराष्ट्रातील पदाधिकारी यांनी केंद्रेकरांची भेट घेऊन त्यांना पक्षात येण्याची गळ घातली होती. तेव्हा केंद्रेकरांनी त्याला नम्रपणे नकार दिला होता. परंतु ठाकरेंचे राजकीय वलय, त्यांच्या पक्षाची राज्यातील ताकद आणि महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री म्हणून केंद्रेकरांचा त्यांच्याशी आलेला संबंध पाहता ठाकरेंनी त्यांना आॅफर दिली तर ते स्वीकारू शकतील, असे देखील बोलले जाते.

देशात, राज्यात आणि मराठवाड्यात देखील प्रशासकीय सेवेतून निवृत्त झाल्यानंतर राजकारणातून दुसरी इनिंग सुरू करण्याचा नवा ट्रेंड सध्या पहायला मिळतो आहे. मराठवाड्यातील वरिष्ठ पोलिस अधिकारी शाम दिघावकर यांनी नुकताच निवृत्तीनंतर भाजपमध्ये प्रवेश केल्याचे ताजे उदाहरण आपल्यासमोर आहे. हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे खासदार हेमंत पाटील यांनी ठाकरेंची साथ सोडली आहे. त्यांना पराभूत करायचे असेल तर नवा आणि स्वच्छ चारित्र्याचा चेहऱ्याच्या शोधात ठाकरे गट देखील आहे. त्यांचा हा शोध केंद्रेकरांपर्यंत येऊन थांबतो का? हे येणाऱ्या काही महिन्यातच स्पष्ट होईल.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com