Ambadas Danve News : अंबादास दानवे म्हणतात, कलंकित मंत्र्यांमुळे फडणवीस अन् भाजपाची बदनामी ; कारवाई करावीच लागेल!

Maharashtra Politics : फडणवीसांच्या सरकारमधील लोक भ्रष्टाचारी आहेत, त्यांच्या सरकारमधील लोक सभागृहात रमी खेळतात, पैशाच्या बॅगा घरात भरून ठेवतात, यावर सर्वसामान्य लोकांमधून तीव्र भावना उमटतात.
Ambadas Danve, Devendra Fadnavis, Eknath Shinde
Ambadas Danve, Devendra Fadnavis, Eknath ShindeSarkarnama
Published on
Updated on

दीपा कदम

Shivsena UBT : महायुती सरकारमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वादग्रस्त मंत्र्यांमुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपाची सर्वाधिक बदनामी होत आहे. भ्रष्टाचाराचे आरोप, मंत्र्यांच्या घरात सापडलेल्या पैशाच्या बॅगा, कृषीमंत्र्यांचे सभागृहात रमी खेळताना उघडकीस आलेले उद्योग यामुळे सरकार बदनाम झाले आहे. लोक एकनाथ शिंदे, अजित पवारांना बोलत नाहीत, पण देवेंद्र फडणवीस यांची पर्यायाने भाजपाची या कलंकित मंत्र्यांमुळे प्रतिमा खराब होत आहे. त्यामुळे अशा कलंकित मंत्र्यांवर फडणवीस यांना कारवाई करावीच लागेल, असा दावा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला.

'सरकारनामा'ला दिलेल्या मुलाखतीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांवर कारवाई ऐवजी त्यांचे फक्त खाते बदलले जाते. एकनाथ शिंदे यांच्या मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप असूनही त्यांच्यावर काहीच कारवाई केली जात नाही. विरोधी पक्षाने अधिवेशनात दबाव आणला तरी त्याचा फारसा उपयोग झाला नाही, याकडे लक्ष वेधले असता अंबादास दानवे यांनी यावर भाष्य केले. (Eknath Shinde) एकनाथ शिंदेंच्या मंत्र्‍यांवरही भाजपाला कारवाई करावी लागेल. कारण याचे परिणाम सध्या भाजपालाच भोगावे लागत आहेत. शिंदेना लोक बोलत नाहीत, पण फडणवीस यांना बोलतात.

फडणवीसांच्या सरकारमधील लोक भ्रष्टाचारी आहेत, त्यांच्या सरकारमधील लोक सभागृहात रमी खेळतात, पैशाच्या बॅगा घरात भरून ठेवतात, यावर सर्वसामान्य लोकांमधून तीव्र भावना उमटतात. यातून भाजपाची आणि फडणवीसांची बदनामी होते. त्यामुळे आज ना उद्या शिंदेंच्या कलंकित मंत्र्यांवर कारवाई करावीच लागेल. विरोधक म्हणून सरकारवर आमचाही दबाव कायम असेल, असे दानवे (Ambadas Danve) यांनी स्पष्ट केले. संजय शिरसाट, माणिकराव कोकाटे, योगेश कदम यांच्यावर आरोप झाल्यानंतर फक्त कोकाटे यांचे खाते बदलले गेले. खरतर आम्ही या सगळ्या मंत्र्यांची प्रकरण विधिमंडळात मांडली.

Ambadas Danve, Devendra Fadnavis, Eknath Shinde
Ambadas Danve On Eknath Shinde : एकनाथ शिंदेंच्या तीन वर्षाच्या काळात राज्यात भ्रष्टाचाराचा महापूर! भाजपाचीही त्याला मूकसंमती..

राज्यपालांची भेट घेतली, आता या तिघांची तक्रार घेऊन आम्ही राष्ट्रपतींकडे दाद मागणार आहोत. कलंकित मंत्र्यांमुळे सरकारची प्रतिम कलंकित झाली आहे. कलंकित मंत्री सरकारमध्ये आहेत, हे लांकाना कळून चुकले आहे. संजय शिरसाट यांच्याशी माझे वैयक्तिक वाद नाहीत. सत्तेचा आणि राजकीय दबावाखाली यंत्रणा कशी काम करते यावर आम्ही बोलतोय. शिरसाट यांच्या मुलाने 67 कोटींच्या हाॅटेल खरेदी निविदेत सहभाग घेतला. त्यांची स्वतःची कंपनी नाही, रेडीरेकनरचे दर वीस वर्षापुर्वीचे लावले गेले. एमआयडीसीतील प्लाॅटवरचे आरक्षण उठवून तो खरेदी करण्याचा प्रयत्न झाला.

Ambadas Danve, Devendra Fadnavis, Eknath Shinde
Eknath Shinde : "ते अनुभवी पण, आमची वाटचाल..."; दिल्लीवारी अन् शरद पवारांच्या 'त्या' सूचक वक्तव्यावर अखेर एकनाथ शिंदे बोलले

शिरसाट यांच्या घरात नोटांच्या बंडलांनी भरलेली बॅग सापडल्याचे व्हिडिओ बाहेर आले. त्यांच्या घरात नोटांची बॅग कुठून आली, त्यांचे उत्पन्न किती आहे? हे देखील तपासले पाहिजे, अशी मागणी अंबादास दानवे यांनी केली. कलंकित मंत्र्यांवर कारवाई व्हावी, यासाठी शिवसेनेच्या वतीने आज राज्यव्यापी आंदोलन करण्यात येत आहे. कलंकित मंत्र्यांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कारवाई करून त्यांचे राजीनामे घ्यावे, हीच या निमित्ताने आमची मागणी असल्याचे दानवे म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com