Maharashtara : आता तरी धडा घ्या, किमान सीमावर्ती भागातील विकासकामांवरील स्थगिती मागे घ्या..

Ashok Chavan : अन्यथा महाराष्ट्र तोडू इच्छिणारे त्या नाराजीचा गैरफायदा घेण्याची शक्यता नाकारता येत नाही
Congress Leader Ashok Chavan News, Aurangabad
Congress Leader Ashok Chavan News, AurangabadSarkarnama
Published on
Updated on

Ashok Chavan News : महाराष्ट्राच्या सांगली, सोलापूर, नाशिक, नंदूरबार, नांदेड जिल्ह्यातील काही गावे लगतच्या राज्यांमध्ये समाविष्ट होऊ इच्छित असल्याच्या बातम्या ही अतिशय गंभीर बाब आहे. Maharashtra राज्य सरकारने याबाबत विनाविलंब पावले उचलण्याची आवश्यकता आहे. या गावांच्या प्रामुख्याने विविध शासकीय योजना व पायाभूत सुविधांबाबत तक्रारी आहेत.

Congress Leader Ashok Chavan News, Aurangabad
Maharashtra-Karnataka border dispute : सीमावादाचं खापर फडणवीसांवर फुटणार!

राज्य सरकारने त्यांचे निराकरण करण्याबाबत तात्काळ निर्णय घेतले पाहिजेत. अन्यथा महाराष्ट्र तोडू इच्छिणारे त्या नाराजीचा गैरफायदा घेण्याची शक्यता नाकारता येत नाही, असा इशारा माजी मुख्यमंत्री काॅंग्रेस नेते अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी सरकारला दिला आहे. (Marathwada) राज्यातील सीमावर्ती भागातील अनेक गावांनी शेजारच्या राज्यांमध्ये समाविष्ट होण्याची इच्छा व्यक्त करत आंदोलन देखील केले आहे.

यात नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद, माहूर, किनवट भागातील गावांचा देखील समावेश आहे. या पार्श्वभूमीवर अशोक चव्हाण यांनी ट्विट करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. अशोक चव्हाण म्हणाले, राज्याच्या सीमावर्ती भागातील गावांची नाराजी कमी करण्यासाठी किमान त्या परिसरातील विकासकामांवरील स्थगिती राज्य सरकारने तातडीने मागे घ्यावी, अशी आमची मागणी आहे.

राज्य सरकारने तातडीने त्या भागातील सर्व विकासकामांवरील स्थगिती मागे घ्यावी आणि ती तातडीने सुरू करावीत. त्यातून सरकार आपल्याला प्रतिसाद देत असल्याची भावना निर्माण होऊन या गावांमधील नाराजी कमी होऊ शकेल.

राज्य सरकारच्या स्थगिती निर्णयाविरूद्ध सुनावणी करताना गेल्या आठवड्यात मुंबई उच्च न्यायालयाने अर्थसंकल्पात मंजूर कामांना स्थगिती योग्य नसल्याचे निरीक्षण नोंदवले आहे. त्यातून धडा घेत राज्य सरकारने किमान सीमावर्ती भागातील मविआ काळातील सर्व विकासकामांवरील स्थगिती मागे घ्यावी, असेही चव्हाण यांनी ट्विटमध्ये नमूद केले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com