Akshay Bhalerao Killing Case: अक्षय भालेरावच्या खून्यांवर कठोर कारवाई करा; आंबेडकरी जनतेचा धडक मोर्चा

Nanded News: अक्षय भालेराव या मागासवर्गीय तरुणाची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करतो म्हणून निर्घृण खून करण्यात आला.
Akshay Bhalerao Killing Case:
Akshay Bhalerao Killing Case:Sarkarnama
Published on
Updated on

Ahmednagar News : नांदेड जिल्ह्यातील बोंडार इथे अक्षय भालेराव या मागासवर्गीय तरुणाची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करतो म्हणून निर्घृण खून करण्यात आला. या खूनाच्या निषेधार्थ आणि इतर विविध मागण्यांसाठी आज(13 जून) अहमदनगर शहरात आंबेडकरवादी जनतेने मोर्चाचे आयोजन केलं आहे. नियोजित मोर्चा सकाळी अहमदनगर महानगरपालिका येथून निघून छत्रपती संभाजीनगर रोडने जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे.

नांदेड जिल्ह्यात मागासवर्गीय तरुणाची केवळ तो आंबेडकरी विचारांचा आहे आणि बाबासाहेबांची जयंती साजरी करतो. अशा कारणावरून बोंडार येथील काही जातीयवादी लोकांनी त्याची निर्घृण हत्या केली. या सर्व आरोपींवर कडक कारवाई करून फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये सुनावणी व्हावी आणि आरोपींना कठोरातील कठोर शिक्षा त्वरित सुनावली जावी अशी मुख्य मागणी घेऊन हा मोर्चा निघणार आहे. (Akshay Bhalerao Killing Case)

Akshay Bhalerao Killing Case:
Congress News : राज्यातील '२१ लोकसभा मतदारसंघात' पक्षाला सकारात्मक वातावरण; काँग्रेसचा दावा...

अक्षय भालेराव याची निर्घृण हत्या याबरोबरच बेरोजगारीची समस्या मोठ्या प्रमाणात युवकांना भेडसावत आहे, केंद्र आणि राज्य सरकार युवकांना रोजगार देत नाही. (Maharashtra Politics) त्याचबरोबर हिंदुत्वाच्या नावाखाली धार्मिक संघर्ष पेटवला जात असून युवकांची माथी भडकवली जात आहे, यावर आवर घालण्यात यावा. सामाजिक वातावरण बिघडवले जात असून त्यामुळे एकूणच समाजव्यवस्था सध्या बिघडली आहे. त्यावर सरकारने नियंत्रण आणावे आणि मुख्य म्हणजे देशाच्या राष्ट्रपती आदिवासी समाजाच्या आहेत. त्यांना संसद भवनाच्या उद्घाटन कार्यक्रमाला न बोलावणे हे निषेधार्य आहे.

एक महिला असताना त्याचबरोबर आदिवासी समाजातील महिला घटनात्मक पदावर सर्वोच्च स्थानी राष्ट्पती पदावर असलेल्या व्यक्तीला संसद भवनाच्या उद्घाटन कार्यक्रमाला निमंत्रण नसणे हा या देशाचा आणि पर्यायाने संविधानाचा अपमान आहे याचा निषेध नोंदवण्यासाठी हा मोर्चा काढण्यात येणार असल्याचे आंबेडकरी चळवळीचे जेष्ठ कार्यकर्ते अॅडव्होकेट अशोक गायकवाड यांनी सांगितले आहे. (Political news)

Akshay Bhalerao Killing Case:
Congress News : वाई मतदारसंघात स्वबळाची तयारी करा... नाना पटोले

आज(13 जून) निघणारा आंबेडकरी जनतेचा मोर्चा हा पक्ष विरहित असून जिल्ह्यातून हजारोच्या संख्येने नागरिक यामध्ये शांततामय पद्धतीने सहभागी होऊन मोर्चा पार पाडणार आहेत. यामध्ये कोणत्याही पक्ष संघटनेचा समावेश नसून मागासवर्गीय समाजावर होणारा अन्याय दूर होणे हा यामागचा मुख्य उद्देश असल्याचे अशोक गायकवाड आणि त्यांच्या सहकाऱ्यानी म्हटलं आहे.

Edited By- Anuadha Dhawade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com