Congress News : वाई मतदारसंघात स्वबळाची तयारी करा... नाना पटोले

Nana Patole कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आज ( ता. १९) पुण्याहून दहिवडीकडे जात असताना लोणंद येथे अहिल्यादेवी स्मारक येथे काहीवेळ थांबले.
Nana Patole
Nana Patolesarkarnama
Published on
Updated on

-रमेश धायगुडे

Lonand News : राज्यात कॉंग्रेस Congress पक्षाच्या वाढीसाठी सर्व स्तरातून जोरदार प्रयत्न केले जात आहेत. वाई - खंडाळा -महाबळेश्वर विधानसभा मतदार संघात पक्षाची ताकत वाढण्यासाठी सर्वांना जोमाने काम करावे लागेल. त्यासाठी मला केव्हाही बोलवा मी वेळ काढून उपस्थित राहिन. वाई - खंडाळा -महाबळेश्वर विधानसभा मतदारसंघात २०२४ ची निवडणूक स्वबळावर लढण्याची तयारी करा, असे आदेश कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले Nana Patole यांनी दिले.

कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आज ( ता. १९) पुण्याहून दहिवडीकडे जात असताना लोणंद येथे अहिल्यादेवी स्मारक येथे काहीवेळ थांबले. त्यावेळी त्यांनी अहिल्यादेवींच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन केले. त्यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांशी चर्चा करताना ते बोलत होते.

यावेळी जिल्हा कॉंग्रेसचे माजी उपाध्यक्ष व खंडाळा तालुक्याचे कॉंग्रेसचे नेते (कै.) अॅड. बाळासाहेब बागवान यांच्या आठवणीला उजाळा देताना नाना पटोले म्हणाले, कॉंग्रेसचा एक निष्ठावंत मोठा नेता पक्षाने गमवला आहे. त्यांच्या विचाराने लोणंद, खंडाळा व वाई मतदार संघात पुन्हा एकदा पक्ष उभारणीसाठी सर्वांनी जोमाने कामाला लागावे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com