Talathi Recruitment News: नव्या तलाठी भाऊसाहेबांची क्रीम पोस्टिंगसाठी फिल्डींग

Talathi Recruitment Process : जिल्हाधिकारी कार्यालयाकडे शिफारशीसाठी अनेकांचे प्रयत्न
Talathi Office in Chandrapur
Talathi Office in ChandrapurGoogle
Published on
Updated on

Latur News : महाराष्ट्र सरकारच्या वतीने काही महिन्यांपूर्वी घेण्यात आलेल्या तलाठी तसेच वनरक्षक पदासाठीच्या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आलेला आहे. या निकाल नंतर भरती प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचे आरोप कारण्यात आले. या नंतर आता महसूल विभागाने अनेक दिवसांच्या प्रक्रियेतून तलाठ्यांची भरती करत या पदावर उमेदवारांची निवड केली. निवडीनंतर सध्या संबंधित जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयातून कागदपत्रांची तपासणी व अन्य प्रक्रिया सुरू आहे. त्यापूर्वीच निवड झालेल्या नव्या तलाठ्यांनी चांगला सज्जा मिळावा, यासाठी धडपड सुरू केली आहे. यासाठी त्यांनी विविध माध्यमांतून शिफारसी सुरू केल्या असून यात चांगले उत्पन्न देणारा व कटकट नसलेल्या एका सज्जासाठी अनेक भाऊसाहेब प्रयत्नांची पराकाष्ठा करताना दिसत आहेत.

राज्य सरकारकडून तब्बल चार वर्षांनंतर तलाठीपदासाठी मेगा भरती जाहीर करण्यात आली होती. मागील वर्षात प्रक्रिया पूर्ण करण्यात अली. यात राज्यातील चार हजार ७९३ तलाठी पदांसाठी दहा लाख ४१ हजार ७१३ उमेदवारांनी अर्ज केले होते. मोठ्या संख्येने अर्ज आल्यामुळे राज्यातील अनेक केंद्रावर पदासाठी १७ ऑगस्ट ते १४ सप्टेंबर २०२३ या कालावधीत ऑनलाईन परीक्षा घेण्यात आली. त्यानंतर उत्तरतालिका, त्यावरील आक्षेप व अन्य प्रक्रिया पार पाडून पाच जानेवारी २०२४ रोजी निकाल जाहिर करण्यात आला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Talathi Office in Chandrapur
Central Government : बहुरूपी कलावंतही म्हणतात सत्ताधारी म्हणजे ईडी सरकार

त्यानुसार निवड झालेल्या उमेदवारांच्या जिल्हानिहाय जाहिर झाल्या व सध्या नव्या भाऊसाहेबांना नियुक्ती देण्यासाठी कागदपत्रांची तपासणी सध्या सर्व जिल्हाधिकारी कार्यालयात सुरू आहे. तपासणी पूर्ण झाल्यानंतर निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्ती देण्यात येणार असून त्याआधीच या उमेदवारांनी चांगल्या ठिकाणी पोस्टींग (नियुक्ती) मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. कटकट नसलेल्या आणि चांगले उत्पन्न देणाऱ्या सज्जासाठी उमेदवारांची पसंती असून त्यासाठी ते लोकप्रतिनिधी व विविध माध्यमातून त्यासाठी शिफारस करत आहेत. नियुक्तीसाठी भाऊसाहेबांच्या वशिल्यांमुळे अधिकारी त्रस्त झाले असून तलाठी होण्याआधीच उमेदवारांची धडपड पाहून ते चक्रावून गेले आहेत.

 नियुक्तीसाठी पाहावी लागणार वाट 

निवड झालेल्या ५५ पैकी ५३ उमेदवारांची यादी जिल्हाधिकारी कार्यालयात आली आहे. दोन पदे पात्र उमेदवार न मिळाल्याने रिक्त राहण्याची शक्यता आहे. त्यानुसार उमेदवारांच्या कागदपत्रांची तपासणी सुरू आहे. सामाजिक व समांत्तर आरक्षणानुसार कागदपत्रांची पडताळणी केली जात आहे. याशिवाय वैद्यकीय तपासणी तसेच चारित्र्य पडताळणीही होणार आहे. या सर्व प्रक्रियेसाठी वेळ लागणार असून प्राथमिक अंदाजानुसार लोकसभा निवडणुकीनंतरच नव्या उमेदवारांना नियुक्ती मिळण्याची शक्यता आहे. दरम्यानच्या काळात चांगल्या सज्जासाठी या उमेदवारांकडून तगड्या शिफारसी सुरूच राहणार आहेत.

Talathi Office in Chandrapur
Lok Sabha Election 2024 : अजित पवारांच्या भूमिकेमुळे भारती पवारांचे वाढणार टेन्शन !

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com