High Court News : कंपनीच्या दूषित पाण्याने पंधरा एकर फळबाग नापीक, शेतकऱ्याची खंडपीठात धाव..

Aurangabad : कंपनी राजकीय क्षेत्रातील एका महिला नेत्याशी संबंधित असल्याने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ कारवाई करत नाही.
Bombay High Court Bench Aurangabd, News
Bombay High Court Bench Aurangabd, NewsSarkarnama
Published on
Updated on

Marathwada : शेंद्रा औद्योगिक वसाहतीतील एन. व्ही. रॅडिको या कंपनीच्या दूषित पाण्यामुळे १५ एकरावरील फळबाग नापीक झाली, अशी तक्रार घेऊन एका शेतकऱ्याने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली. (High Court News) न्या. मंगेश पाटील व न्या. शैलेश ब्रह्मे यांनी प्रतिवादींना नोटीस बजावली.

Bombay High Court Bench Aurangabd, News
Pankaja Munde Childhood Photos : पंकजा मुंडेंच्या बालपणीच्या काही आठवणी आणि त्यांच्या नावाची गमतीशीर गोष्ट !

याचिकेत कंपनी ही राजकीय क्षेत्रातील एका महिला नेत्याशी संबंधित असल्याने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ कंपनीवर कारवाई करत नसल्याचा आरोप करण्यात आलेला आहे. (High Court) नारायण परसराम कुबेर यांनी ॲड. चंद्रकांत व्ही. ठोंबरे यांच्यामार्फत याचिका दाखल केली.

याचिकेनुसार टाकळी शिवारात नारायण कुबेर यांची १५ एकर शेती आहे. (Aurangabad) रॅडिको कंपनी शेंद्रा औद्योगिक वसाहत परिसरात विविध प्रकारच्या दारूचे उत्पादन करते. (Farmers) मात्र, कंपनीतील दूषित पाणी टाकळी शिवारात असलेल्या वायनरी प्रकल्पाच्या प्रवेशद्वारासमोर खड्डे खोदून त्यात सोडले जाते. ते पाणी जमिनीत मुरले जाते. त्यामुळे फळबाग व जमीन नापीक झाली आहे.

फळे काळी होऊन गळून पडत असून एक वर्षांपासून वारंवार तक्रार करूनही प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी कारवाई करत नाहीत, असा आरोप याचिकेत करण्यात आल्याचे ॲड. ठोंबरे यांनी सांगितले. याप्रकरणी प्रदूषण नियंत्रण मंडळातर्फे ॲड. उत्तम बोंदर आणि शासनातर्फे सहायक सरकारी वकील ए. ए. जगतकर काम पाहात आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com