Aurangabad Central Constituency: तनवाणींच्या माघारीनंतर जिल्हाप्रमुख पदही गेले; `मध्य` मध्ये बाळासाहेब थोरातांना उमेदवारी!

Kishanchand Tanwani: शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शहरप्रमुख बाळासाहेब थोरात यांना उमेदवारी जाहीर केली. तसेच तनवाणी यांच्याकडे असलेले जिल्हाप्रमुख पद काढून ते महानगरप्रमुख राजू वैद्य, सहसंपर्कप्रमुख त्र्यंबक तुपे यांच्याकडे विभागून सोपवण्याचे आदेश उद्धव ठाकरे यांनी अंबादास दानवे यांना दिले आहेत.
Aurangabad Central Assembly Constituency
Aurangabad Central Assembly Constituency Sarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Assembly Election 2024 : औरंगाबाद पूर्व मतदारसंघात काँग्रेसने एम. के. देशमुखांची उमेदवारी रद्द करत लहू शेवाळे यांना उमेदवारी जाहीर केली. तर दुसरीकडे मध्य मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने उमेदवारी जाहीर केलेल्या किशनचंद तनवाणी यांनी माघारीचा निर्णय घेतला.

यावर शिवसेनेकडून तातडीने निर्णय घेत शहरप्रमुख बाळासाहेब थोरात यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. तर तनवाणी यांच्याकडे असलेले जिल्हाप्रमुख पदही काढून घेण्यात आले आहे.

विधानसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची उद्या (ता.29) शेवटची मुदत आहे. अशावेळी किशनचंद तनवाणी यांनी दुपारी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आयोजित केलेली रॅली रद्द केली. तसेच पत्रका परिषद घेऊन मतांचे विभाजन टाळण्यासाठी आपण माघार घेत असल्याचे जाहीर केले.

तनवाणी यांच्या या अचनाक घेतलेल्या निर्णयाने शिवसेनेत (Shivsena) काहीकाळ खळबळ उडाली. पण यावर तातडीने निर्णय घेत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शहरप्रमुख बाळासाहेब थोरात यांना उमेदवारी जाहीर केली. तसेच तनवाणी यांच्याकडे असलेले जिल्हाप्रमुख पद काढून ते महानगरप्रमुख राजू वैद्य, सहसंपर्कप्रमुख त्र्यंबक तुपे यांच्याकडे विभागून सोपवण्याचे आदेश उद्धव ठाकरे यांनी अंबादास दानवे यांना दिले आहेत.

Aurangabad Central Assembly Constituency
Aurangabad Central Assembly Constituency 2024 : किशनचंद तनवाणी यांची माघार, संभाजीनगरमध्ये उद्धवसेनेला धक्का ?

दरम्यान, अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी पत्रकार परिषद घेऊन शहरप्रमुख बाळासाहेब थोरात यांची उमेदवारी जाहीर केल्यानंतर तनवाणी यांनी तातडीने यावर प्रतिक्रिया दिली आहे. अंबादास दानवे यांच्यावर आरोप करत त्यांच्या गटबाजीमुळे आणि सात दिवसातील हालचालीला वैतागूनच आपण उमेदवारी मागे घेण्याचा निर्णय घेतल्याचे म्हटले आहे. तर तनवाणी हे शिंदेसेनेत जाणार असल्याच्या चर्चा आता सुरू झाल्या आहेत.

अंबादास दानवे यांनी याला दुजोरा देत आमच्याकडे तशी माहिती आहे असा दावा केला. ऐनवेळी त्यांनी माघार घेऊन पक्षाला धोका दिला आहे, अशी टीका दानवे यांनी केली. पक्षातील गटबाजीमुळे तनवाणी यांनी निर्णय घेतल्याचा आरोप दानवे यांनी फेटाळून लावला. मी त्यांच्यासोबत बैठका घेत होतो, मध्य मतदारसंघात फिरत होता. उमेदवारीवरून काहीजण नाराज होते, पण तो विषय संपला होता. असे असताना तनवणी यांनी माघार का घेतली, याचे आश्‍चर्य वाटते, असे दानवे म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com