Radhakrishna Vikhe Patil : धर्मांतराची प्रकरण रोखण्यात पोलीस दल, गुप्तचर विभागच कमी पडतोयं? राधाकृष्ण विखे पाटलां घरचा आहेर!

Radhakrishna Vikhe Patil On police investigation Over religion issue : राज्यातील पोलीस, गुप्तचर विभाग आणि गुन्हे अन्वेषण विभागाच्या कामगिरीबद्दल विखे पाटील यांनी नाराजी व्यक्त केली.
Radhakrishna Vikhe Patil On police investigation
Radhakrishna Vikhe Patil On police investigationsarkarnama
Published on
Updated on
Summary
  1. TCS सारख्या मोठ्या कंपनीत धर्मांतराच्या आरोपांमुळे राजकीय वाद निर्माण झाला आहे.

  2. मंत्री राधाकृष्ण पाटील यांनी पोलीस आणि गुप्तचर यंत्रणांवर प्रश्न उपस्थित केले आहेत.

  3. या प्रकरणामुळे राज्यातील धर्मांतराच्या मुद्द्यावर सरकारवर टीका वाढली आहे.

Chhatrapati Sambhajinagar News : टिसीएस सारख्या नामांकित कंपनीमध्ये जबरदस्तीने धर्मांतराची प्रकरणे उघडकीस आली आहेत, ही अतिशय गंभीर बाब आहे. पोलीस दल, गुन्हे अन्वेषण विभाग, गुप्तचर विभागाला याची माहिती कशी होत नाही? असा सवाल करत मंत्री राधाकृष्ण पाटील यांनी राज्यातील वाढत्या धर्मांतराच्या प्रकरणावर सरकारला घरचा आहेर दिला.

धर्मांतराची प्रकरणे रोखण्याची जबाबदारी जशी सरकारची आहे, तशी ती समाजातील प्रत्येक घटकाची देखील आहे. हा एक सामाजिक प्रश्न आहे. आपल्या घरातील एखाद्या व्यक्ती, घटकाबद्दलची माहिती कोणालाही होत नाही हे अत्यंत दुर्देवी आहे. धर्मांतराच्या घटना रोखण्यासाठी समाजानेही अधिक सतर्क राहणे गरजेचे असल्याचे स्पष्ट मत विखे पाटील यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये माध्यमांशी बोलताना केले.

राज्यातील पोलीस, गुप्तचर विभाग आणि गुन्हे अन्वेषण विभागाच्या कामगिरीबद्दल विखे पाटील यांनी नाराजी व्यक्त केली. पोलीसांवर कामाचा वाढता ताण आहे, कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याची मोठी जबाबदारी आहे, हे मान्य असले तरी टिसीएस किंवा आता राज्यात ज्या ज्या भागात धर्मांतरासारखे प्रकार उघडकीस येत आहेत, त्याची माहिती पोलीसांना होणे आवश्यक आहे. त्यांच्याकडे यंत्रणा आहे, गुप्तचर विभाग आहे, असे असताना धर्मांतरासारखे प्रकार घडतात हा गंभीर विषय आहे.

Radhakrishna Vikhe Patil On police investigation
Radhakrishna Vikhe Patil : मनोज जरांगेची स्वतंत्र मराठा-कुणबी मंत्रालयाची मागणी; राधाकृष्ण विखे पाटलांनी थेटच सांगितलं!

नाशिकच्या खरात प्रकरणात पहिला गुन्हा शिर्डीत दाखल झाला, मग नाशिकमध्ये खरातचे सगळे कारनामे पोलीसांच्या नाकाखाली सुरू असताना त्यांना या प्रकरणाची माहिती का होऊ शकली नाही? असा प्रश्नही या निमित्ताने पडतो. सरकार आपल्या परीने धर्मांतर रोखण्यासाठी कठोर कायदे करत आहे. या प्रकरणात कारवाई देखील केली जात आहे. परंतु वाढते प्रकार लक्षात घेता यासाठी एका 'एसओपी' ची गरज असल्याचे स्पष्ट मत विखे यांनी व्यक्त केले.

इम्तियाज, गायकवाड यांनी भडक विधाने करू नये...

टिसीएस धर्मांतर प्रकरणाबाबत एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी नाशिकचे खरात प्रकरण दाबण्यासाठी टीसीएसचे प्रकरण समोर आणण्यात आले, असा आरोप केला. खरात याच्याऐवजी या प्रकरणात एखादा मुस्लिम आरोपी असता तर त्याच्यावर तात्काळ कारवाई करण्यात आली असती, पण तो हिंदू असल्याने त्यांच्यावर कारवाई केली जात नाही, असा आरोप इम्तियाज यांनी केला होता. याकडे विखे यांचे माध्यमांनी लक्ष वेधले असता, इम्तियाज हे पत्रकार राहिलले आहेत, अशा प्रकरणात त्यांनी संवेदनशीलता दाखवायला हवी. खासदार राहिलेल्या माणसाने असे आरोप किंवा विधान करणे अत्यंत चुकीचे असल्याचे विखे पाटील म्हणाले.

'शिवाजी कोण होता' या कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या पुस्तकावरून शिवसेनेचे बुलडाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी पानसरे यांच्यावर मरणोत्तर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. यावरही विखे पाटील यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत गायकवाड यांनी आधी या पुस्तकाचा अभ्यास करायला हवा. अशा प्रकारची चुकीची विधाने करून ते आपल्या पक्षाची आणि सरकारची बदनामी करत आहेत. या शिवाय छत्रपती शिवाजी महाराजांचाही या सगळ्या प्रकरणात अपमान होत असल्याचे विखे पाटील म्हणाले.

Radhakrishna Vikhe Patil On police investigation
Radhakrishna Vikhe Patil Helpline : अवैध धंद्यांवर कारवाईसाठी मंत्री विखेंची मोठी घोषणा! पोलिस क्रमांक असतानाही पुन्हा ‘स्पेशल हेल्पलाइन’चा धडाका, खबऱ्याचं नाव राहणार 'सीक्रेट'

FAQs :

1. TCS प्रकरणात नेमका काय आरोप आहे?
कंपनीमध्ये जबरदस्तीने धर्मांतर घडवले जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

2. मंत्री राधाकृष्ण पाटील यांनी काय प्रतिक्रिया दिली?
त्यांनी पोलीस आणि गुप्तचर यंत्रणांवर माहिती न मिळाल्याबद्दल नाराजी व्यक्त केली.

3. हा मुद्दा राजकीय का ठरला आहे?
धर्मांतरासारख्या संवेदनशील विषयामुळे आणि सरकारी यंत्रणांवर टीका झाल्यामुळे हा मुद्दा राजकीय झाला आहे.

4. या प्रकरणाची चौकशी कोण करणार आहे?
पोलीस आणि संबंधित तपास यंत्रणा या प्रकरणाची चौकशी करू शकतात.

5. या वादाचा पुढे काय परिणाम होऊ शकतो?
या प्रकरणामुळे राजकीय चर्चा वाढू शकते आणि कायदेशीर कारवाई होण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com