
Budget Session News : बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील शिक्षक धनंजय नागरगोजे यांनी आत्महत्या करत 3 वर्षीय मुलीला संवेदनशील असे पत्र लिहिले. संस्थाचालक विक्रम मुंडे, अतुल मुंडे व त्यांच्या कार्यकर्त्यांनी या शिक्षकाला 'फाशी घे आणि मोकळा हो' असे म्हटले. विना अनुदानित शाळा काढताना सरकारला प्रतिज्ञापत्र दिले असताना शिक्षकांना वेतन दिले जात नाही. नागरगोजे यांची आत्महत्या ह्दय पिळवटून टाकणारी आहे. याला जबाबदार असणाऱ्या संस्थाचालकांवर कारवाई झाली पाहिजे. छळ करणाऱ्या संस्थाचालकांवर गुन्हे दाखल करून त्यांना जेलमध्ये टाका, अशी मागणी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज सभागृहात केली.
शिक्षक धनंजय नागरगोजे यांच्या आत्महत्येने संपूर्ण बीड जिल्हा हळहळला. तर शिक्षकाची व्यथा ऐकून न घेता त्यांना फाशी घे आणि मोकळा हो, असे सांगणाऱ्या संस्थाचालकांच्याविरोधात संतापाचे वातावरण आहे. यावर अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी सभागृहात आवाज उठवत संस्थाचालकांवर कठोर कारवाईची मागणी केली. तसेच त्यांना जेलमध्ये टाका, असं दानवे म्हणाले. दरम्यान, सरकारच्या वतीने या प्रकरणात चौकशी करून संस्थाचालकांवर गुन्हा दाखल करण्यात येईल, असे उत्तर देण्यात आले.
संभाजीनगरला दोन दिवसाआड पाणी द्या
अंबादास दानवे यांनी छत्रपती संभाजीनगर शहरवासियांना अकरा दिवसांनी पाणी मिळते, याकडे सभागृहाचे लक्ष वेधले. महापालिकेचे प्रशासक या प्रश्नावर गंभीर नाहीत, असा आरोपही दानवे यांनी केला. (Shiv Sena) संभाजीनगरकरांना उन्हाळ्यात पाणीपुरवठ्यासाठी 193 कोटी रुपये खर्च करून 900 मिलिमीटर व्यासाची पाणी पुरवठा योजना महानगरपालिकेच्या माध्यमातून नियोजित करण्यात आली आहे. एप्रिल महिन्यापर्यंत 75 एमएलडी पाणी या योजनेच्या माध्यमातून संभाजीनगरला मिळणार होते.
आज रोजी संभाजीनगरला 11 व्या दिवशी पाणी मिळत असल्याने गंभीर स्थिती निर्माण झाली आहे. सदरील प्रकरणी मनपा आयुक्ता आणि महानगरपालिका गंभीर नसून पाण्याच्या व्यवस्थापनासाठी शासन काही उपायोजना करणार आहेत का ? असा प्रश्न उपस्थित करत पाण्याचे योग्य व्यवस्थापन केले तर संभाजीनगरला किमान दोन दिवसाआड पाणी मिळेल, अशी सूचना नियम अंबादास दानवे यांनी मांडली. तसेच ही योजना तातडीने पूर्ण करण्यासाठी राज्य शासनाने सूचना कराव्यात, अशी मागणी केली.
तसेच चक्रीवादळ आणि अवेळी झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांना अद्याप नुकसानभरपाई मिळाली नसल्याचा मुद्दा दानवे यांनी सभागृहात उपस्थित केला. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई झालेल्याची एकूण देय रक्कम 21 हजार 489 कोटी रुपये होती. यापैकी 8 हजार 696 कोटी वाटप झाले आहेत. तर 12 हजार कोटीची शिल्लक नुकसान भरपाई अद्याप देणे बाकी आहे. यामध्ये चक्रीवादळ 2020 आणि अवेळी पाऊस 2023 अशा दोन्ही नुकसानींचा समावेश आहे. शेतकऱ्यांची राहिलेली थकीत मदत कधी वितरित करणार, असा प्रश्नही दानवे यांनी उपस्थित केला.
२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.