Budget Session : पटोलेंच्या ऑफरची अजितदादांनी उडविली खिल्ली; ‘तुमच्याकडं 15-20 टाळकी अन्‌ कशाचा पाठिंबा देताय?, ब्रह्मदेव आला तरी... ’

Ajit Pawar Reply To Nana Patole Offer : काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ‘उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना आमच्याकडे या तुम्हाला आलटून पालटून मुख्यमंत्री करतो,’ अशी ऑफर दिली होती. त्यावरून राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली होती.
Ajit Pawar-Nana Patole
Ajit Pawar-Nana Patole Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai, 17 March : काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ‘उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना आमच्याकडे या तुम्हाला आलटून पालटून मुख्यमंत्री करतो,’ अशी ऑफर दिली होती. त्यावरून राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली होती. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पावरील चर्चेला उत्तर देताना त्यावरून जोरदार फटकेबाजी केली. ‘तुमच्याकडे पंधरा, वीस टाळकी अन्‌ कशाचा पाठिंबा देताय’ असे म्हणून अजितदादांनी नाना पटोले यांच्या ऑफरची शब्दशः खिल्ली उडवली.

अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी अर्थसंकल्पावरील चर्चेला उत्तर देताना विधानसभेत जोरदार बॅटिंग केली. सुरुवातील सभागृहात विरोधी बाकावरील ज्येष्ठ सदस्य उपस्थित नव्हते, त्यावरून अजितदादांनी विरोधकांची फिरकली घेतली. विधानसभेत अजितदादांनी भाषणाला सुरुवात करताच विरोधी पक्षाचे एकेक आमदार सभागृहात येऊन बसायला सुरुवात केली.

नाना पटोले (Nana Patole) यांच्या ऑफरच्या संदर्भाने बोलताना अजितदादा म्हणाले, सन 2024 ते 2029 ही पाच वर्षे अशी आहेत की, कोणी गंमतीने जरी म्हटलं...अमक्याने मुख्यमंत्री व्हावे, तमक्याने मुख्यमंत्री व्हावे... आम्ही पाठिंबा देतो. तुमच्याकडे माणसंच नाही तर कशाचा पाठिंबा देताय. वीस टाळकी असताना....पंधरा टाळकी असताना...दहा टाळकी असताना...तेवढ्यात विरोधी बाकावरून भास्कर जाधव यांनी टाळकी म्हणू नका, अशी कमेंट केली.

भास्कर जाधव यांनी केलेल्या कमेंटला अजितदादांनी जोरदार उत्तर दिले. ते म्हणाले, ‘तुम्ही बोलत असताना काहीजण काय काय बोलले. मी सुरुवातीलाच सन्मानीय सदस्य म्हणाला होतो. मी नेहमी सन्मानीय सदस्यच म्हणतो. तुम्ही सुरुवातीला नव्हता. पण पहिल्यांदा सन्मानीय सदस्य भास्करराव जाधव असं म्हणालो, आणि त्यानंतरच भाषणाला सुरुवात केली.

तुम्हीपण बोलत असताना ‘कायपण बोलायचं. भास्करराव, एक तर तुम्हाला सांगतो की पाच वर्षे या सरकारला ब्रम्हदेव आला तरी कोणी धक्का लावू शकत नाही, असे सांगून अजित पवार यांनी विरोधी पक्षाच्या स्वप्नातील मांडे खाण्याच्या प्रकाराला सुरुंग लावला.

विरोधी पक्षाकडून गोंधळ वाढल्यानंतर अध्यक्ष महोदय हे सर्व बोलत असताना मी गप्प खाली मुंडी घालून ऐकत होतो. ते मला इकडून मारत होते, तिकडून मारत होते. मी आपला गप्प ऐकत हेातो. त्यावर विरोधी बाकावरील भास्कर जाधवांनी पुन्हा एकदा अजितदादांना ‘गरीब बिचारे’ म्हणून कमेंट केली. त्यावर अजितदादा म्हणाले, गरीब बिरचाराच आहे ना. म्हणून तर इथं बसलो आहे, असे सूचक विधान केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com