Marathwada : महाविकास आघाडी सरकारच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी औरंगाबादचे संभाजीनगर आणि उस्मानाबादचे धाराशीव असे नामकरण करण्याचा ठराव मंजूर केला होता. (Ambadas Danve On Aurangabad News) त्यानंतर राज्यात सत्तातंर झाले आणि शिंदे-फडणवीस सरकारने नव्याने ठराव मंजरू करून औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर असा नवा प्रस्ताव केंद्राकडे पाठवला.
छत्रपती संभाजीनगर आणि धाराशीव असे नामांतर झाल्याचे जाहीर करून त्या संदर्भात अधिसूचना देखील काढली. (Aurangabad) शासकीय कार्यालयावरील पाट्या देखील टप्याटप्प्याने बदलण्यात येत असतांना न्यायालयाने नामांतरविरोधी याचिका निकाली लागत नाहीत तोपर्यंत नव्या नावांचा वापर करण्यास मनाई आदेश दिले.
दरम्यान, शिंदे-फडणवीस सरकारने नामांतराचे श्रेय घेत सभा घेतल्या. (Eknath Shinde) मात्र सरकारी आदेश व कागदपत्रांवर पुन्हा औरंगाबाद असा उल्लेख केला जात असल्याने विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. (Shivsena) मुख्यमंत्री कार्यालयाकडून वक्फ बोर्डाने सुरू केलेल्या एका वेबसाईटची माहिती देणाऱ्या परिपत्रकात छत्रपती संभाजीनगरचा उल्लेख `औरंगाबाद` असा करण्यात आला आहे.
नेमंक यावर बोट ठेवत दानवे यांनी एक ट्विट करत सरकारला सवाल केला आहे? ` सांगा आता औरंगाबाद हे नाव आणि औरंगजेब कुणाला आवडतो`, अस विचारत दानवे यांनी एक ट्विट केले आहे. सध्या हे ट्विट चर्चेत असून औरंगजेबाचे पोस्टर झळकावण्याच्या घटनेवरून दानवे यांनी स्वतःला हिंदुत्ववादी म्हणवणाऱ्या सरकार टीकास्त्र सोडले होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.