Sanjay Shirsat On BJP : ज्यांचा हात धरून मोठे झाले, त्यांच्या विरोधात अंहपणे बोलणे दुर्दैवी; संजय शिरसाट यांनी भाजप नेत्यांना सुनावले..

Strain emerges between Shinde Sena and BJP leaders over contesting solo or as an alliance. MLA Sanjay Shirsat highlights the ground reality and expresses concern. : स्थानिक भाजप नेते अत्यंत जोशात आहेत. आम्ही काय बोलाव, काय बोलू नये आम्ही बघू. आम्ही त्यांच्याच मूळे उठाव केला आणि सत्तेत आलो, आणि ते कुणामुळे आले?
Sanjay Shirsat On BjP News
Sanjay Shirsat On BjP NewsSarkarnama
Published on
Updated on

योगेश पायघन

Shivsena News : ज्यांचे हात धरून मोठे झाले, त्यांच्याविरोधात अंहपणे बोलत असाल तर दुर्दैव आहे. इतका अंहकार बरा नाही. जे निवडून आले आहे त्यांना विचारा कसे निवडून आले. एकमेकांच्या सहकार्याशिवाय जिंकणे शक्य नव्हते. त्यामुळे कुण्या एकाने श्रेयवादात जावू नये. स्थानिक पातळीवर युती व्हावी, असे शिवसेनेचे धोरण आहे. पण, ज्यांना युती होऊ नये असे वाटते त्यांनी पक्षाच्या प्रमुखांना तसे कळवावे. मात्र, जाहीर वाच्यता करू नये, त्याचा परिणाम मतदारांवर होतो, अशा शब्दात पालकमंत्री संजय शिरसाट यांनी भाजप नेत्यांना सुनावले.

घमेंड करू नका, युती तोडली तर पश्चाताप होईल या शिवसेनेच्या नेत्यांच्या वक्तव्यावरून भाजप नेत्यांनी शिवसेनेवर निशाणा साधला. त्याला पालकमंत्री संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी प्रत्युत्तर देत टोलाही लगावला. स्थानिक भाजप नेते अत्यंत जोशात आहेत. आम्ही काय बोलाव, काय बोलू नये आम्ही बघू. आम्ही त्यांच्याच मूळे उठाव केला आणि सत्तेत आलो, आणि ते कुणामुळे आले? असा सवाल करत टोलाही लगावला.

मुंबई, ठाणे मनपा निवडणूकीत मोठा भाऊ कोण? या प्रश्‍नावर निवडणुकीच्या काळात पक्ष सर्व्हे करतात. फीडबॅक घेत असतात व अहवाल पक्षाकडे सादर केला जातो. विधानसभेत असे सर्व्हे झाले. मात्र, त्यातील 80 टक्के सर्व्हे चूक निघाले. (BJP) या अंदाजावर राजकीय गणित बांधणे चुकीची आहे. मात्र, पक्षाची परिस्थिती काय याचा आढावा अशा सर्व्हेतून घेतला जातो.कोण छोटा भाऊ आणि कोण मोठा भाऊ? अजून हे ठरलेले नाही. याला अजून वेळ आहे, आजच्या घडीला सांगणे योग्य नाही, असे शिरसाट म्हणाले.

Sanjay Shirsat On BjP News
Ambadas Danve On Sanjay Shirsat News : चक्रम, वेड्या माणसाला मंत्रिमंडळात ठेवू नका! अंबादास दानवे राज्यपालांना पत्र देणार..

आता जर सांगितलं की कोण मोठा आणि कोण छोटा तर वाद होईल. कोण कुठल्या ठिकाणाहून लढत आहे? त्यानंतर सर्व्हेला महत्व राहील. हा प्राथमिक सर्व्हे यानंतर अजून दोन सर्व्हे होतील. हा फक्त अंदाज आहे, हा सर्व्हे आहे, असेच घडेल असे मानून चालणे योग्य नाही. मुंबई महापालिकेवर आमचा भगवा फडकला पाहिजे, मोठा भाऊ कोण? हे निवडणुकीवेळी ठरेल, असेही ते म्हणाले.

Sanjay Shirsat On BjP News
Shivsena UBT MNS Alliance : मनसेसोबत युतीसाठी मोठं पाऊल, 'मातोश्री'वरून आदित्य ठाकरेंचा स्पष्ट संदेश; म्हणाले, 'लोकांच्या मनात...'

नाराजीची वाच्यता न करण्याचा आदेश

मंगळवारी झालेली बैठक ही आमच्या पक्षाच्या ध्येय धोरणाबाबत होती, संघटन बाबतीत होती. काम करताना काय काय अडचणी येतात? या बाबत आमदारानी सांगीतले आहे. मात्र, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट सांगीतले आहे, कुठेही वाच्यता करु नका, तिन्ही नेते मिळून मार्ग काढू. आदित्य ठाकरे म्हणतात जे येईल त्याच्यासोबत युती करू. आदित्य ठाकरेंनी स्पष्ट बोंबलायला पाहिजे की, राज ठाकरे येत असेल तर स्वागत करू. उद्या ओवेसीं आणि अबू आझमी सोबत आले तर घ्याल का? बेसलेस वक्तव्य असल्याचे शिरसाट म्हणाले.

Sanjay Shirsat On BjP News
BJP News : "निवडणुकीपर्यंत फक्त 'भाजपचीच' चर्चा झाली पाहिजे..." : मंत्र्यांनंतर आता पदाधिकारी अन् कार्यकर्त्यांनाही 100 दिवसांचं टार्गेट

हॉटेल खरेदी विषय संपला

हॉटेल हा विषय माझ्यासाठी संपला आहे. पण, ज्यांना खोदकाम करायचे आहे त्यांनी करावे. संजय राऊत उबाठा बुडवत आहे, म्हणून काँग्रेस बाजूला आहे. शरद पवार यांना जाणीव होती म्हणून पवारांनी त्यांना मोहिमेवर ठेवले होते, असा आरोपही शिरसाट यांनी केला. तर उबाठाकडून मराठवाड्यात आंदोलन करणार आहे याकडे लक्ष वेधले असता अडीच वर्षात तुम्ही काय केले? आंदोलन करा मात्र, नाचू नका, वरातीत घोड्यासमोर नाचता तसे नाचू नका. इतर पक्षात पाहू नका, आपल्या पक्षात काय चलालं ते बघा. आमच्या पक्षात चंद्रहार पाटील प्रवेश करीत आहे. हिम्मत असेल तर थांबवून दाखवा, असे आव्हानही शिरसाट यांनी दिले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com