

Dharashiv News : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सासरवाडी धाराशिव जिल्ह्यातील तेर येथे आहे. गेल्या काही वर्षापासून अजितदादांनी सासरवाडीच्या मातीशी असलेले अतूट नाते जपले आहे. अजितदादांच्या पत्नी सुनेत्रा वहिनी या धाराशिवच्या कन्या आहेत. माजी मंत्री डॉ. पद्मसिंह पाटील यांच्या त्या भगिनी आहेत. अजितदादा धाराशिवला यायचे, तेव्हा ते येथील मातीशी एकरूप व्हायचे. सासरवाडीच्या लोकांच्या सुख-दुःखात ते नेहमीच हजर राहिले. त्यामुळे अजित पवार यांच्या निधनामुळे संपूर्ण महाराष्ट्रात शोककळा पसरली आहे. त्यांची सासरवाडी तेर येथील नागरिकांनी संपूर्ण गाव बंद ठेवले आहे तर ग्रामस्थांच्या डोळ्यात पाणी दिसून येत आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला बुधवारी सकाळी भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये त्यांचे निधन झाले. दरम्यान, अजित पवार यांच्या निधनाचे वृत्त कळताच धाराशीव जिल्ह्यातील तेर येथे शोककळा पसरली आहे. हे वृत्त समजल्यानंतर बारामतीमध्ये कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली असून, त्यांच्या डोळ्यामध्ये पाणी आहे, आपल्या नेत्याला शेवटचा निरोप देण्यासाठी कार्यकर्ते बारामतीमध्ये दाखल झाले आहेत.
धाराशिव जिल्हा हा नेहमीच दुष्काळाच्या छायेत राहिला. पण अजितदादांनी अर्थमंत्री आणि जलसंपदा मंत्री म्हणून या जिल्ह्याला झुकतं माप दिले. कृष्णा-मराठवाडा उपसा जलसिंचन योजना मार्गी लावण्यासाठी त्यांनी घेतलेली आक्रमक भूमिका धाराशिवकर कधीच विसरणार नाहीत.
जे बोलणार तेच करणार असे आमचे नेते अजितदादा होते, अशा शब्दात ग्रामस्थांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. तेर गावातील ग्रामस्थ प्रचंड भावुक झाले असून, त्यांच्या डोळ्यात पाणी आले आहे. अजित पवार यांच्या निधनामुळे शोककळा पसरली आहे. माजी मंत्री राणा जगजीतसिंह पाटील हे अजितदादांचे भाचे आहेत. नोंव्हेबर महिन्यातच राणा पाटील यांचे चिरंजीव मल्हार पाटील यांच्या विवाहानिमित्ताने अजितदादा धाराशिवला आले होते. यावेळी त्यांनी धाराशिव जिल्ह्यात नगरपालिका प्रचाराच्यानिमित्ताने सभा घेतल्या होत्या. त्यासोबतच सप्टेंबर महिन्यात धाराशिव जिल्ह्यातील पूरपरिस्थितीची पाहणी करण्यासाठी आल्यानंतर त्यांनी मोठ्या मदतीची घोषणाही केली होती.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.