ठाकरेंनी स्वीकारले सत्तारांचे चॅलेंज; 7 नोव्हेंबरला सिल्लोडमध्ये तोफ धडाडणार...

Aditya Thackeray| अब्दुल सत्तार यांनी काही दिवसांपूर्वी आदित्य ठाकरे यांनी सिल्लोड मध्ये शिवसंवाद यात्रा काढून दाखवावी असे आव्हान दिले होते.
Aditya Thackeray
Aditya Thackeray
Published on
Updated on

औरंगाबाद : गेल्या काही दिवसांपासून कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) आणि आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांच्यातील शाब्दिक चकमकी झडत आहेत. सत्तार यांनी काही दिवसांपूर्वी आदित्य ठाकरे यांनी सिल्लोड मध्ये शिवसंवाद यात्रा काढून दाखवावी असे आव्हान दिले होते. आता आदित्य यांनीसुद्धा सत्तारांचे आव्हान स्वीकारले आहे.

येत्या 7 नोव्हेंबरला आदित्य ठाकरे सिल्लोडमध्ये शिवसंवाद यात्रा काढत मेळावा घेणार आहेत, इतकेच नव्हे तर आदित्य ठाकरे हे औरंगाबादचे पालकमंत्री संदिपान भुमरे यांच्या मतदारसंघात देखील शेतकरी मेळावा घेणार असल्याची माहिती विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी माध्यमांना दिली आहे.

Aditya Thackeray
मंत्री दादा भुसेंच्या सूचनांना नाफेडकडून केराची टोपली

मिळालेल्या माहितीनुसार आदित्य ठाकरे दोन दिवसांच्या औरंगाबाद दौरा करणार आहेत. पहिल्या दिवशी 7 नोव्हेंबरला आदित्य ठाकरे सिल्लोड मतदारसंघात शिवसंवाद यात्रा काढून मेळावाही घेणार आहेत. तर दुसऱ्या दिवशी औरंगाबादचे पालकमंत्री संदिपान भुमरे यांच्या मतदारसंघात शेतकरी मेळाव्याला हजेरी लावतील. त्यामुळे आता सत्तार, भुमरे यांच्या मतदारसंघात आदित्य ठाकरें काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

शिवसेनेत झालेल्या बंडखोरीत शिंदे गटातील औरंगाबादचे पाच आमदार सहभागी झाले होते. या बंडात संदिपान भुमरे आणि अब्दुल सत्तार यांची भूमिका महत्त्वाची मानली जाते. यानंतर शिंदे मंत्रिमंडळात या दोघांना मंत्रीपदही देण्यात आले. यापूर्वीही भूमरेंच्या मतदार संघातून शिवसंवाद यात्रा काढण्यात आली होती. आता पुन्हा भुमरेंच्याच मतदारसंघात आदित्य ठाकरें पुन्हा शेतकरी मेळावा घेणार आहेत. त्यामुळे आदित्य ठाकरेंच्या या दौऱ्याकडे संपूर्ण औरंगाबाद करांचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com