Ncp Ex.Mla Join Shivsena : वैजापूरचे राष्ट्रवादीचे माजी आमदार यांनी अपेक्षेप्रमाणे पक्षाला रामराम ठोकत उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेची मशाल हाती घेतली आहे. Shivsena गेल्या महिन्यात चिकटगांवकरांचा प्रखर विरोध डावलून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी वैजापूर तालुक्यातील काॅंग्रेसच्या भाऊसाहेब ठोंबरे, पंकज ठोंबरे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांना पक्षात प्रवेश दिला होता. त्यानंतर चिकटगांवकर हे लवकरच पक्ष सोडणार याचे संकेत मिळाले होते.
मराठवाडा पदवीधरचे आमदार सतीश चव्हाण माझे राजकारण संपवायला निघालेत असा आरोप चिकटगांवकर यांनी जाहीरपणे केला होता. (Ncp) मात्र पक्षाने याची दखल न घेता चिकटगांवकरांकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून आले होते. ठोंबरे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाने पक्षानेच तालुक्यात दोन गट निर्माण केल्याचा आरोप देखील चिकटगांवकर यांनी केला होता. (Ramesh Bornare) परंतु वारंवार विरोध दर्शवून देखील ठोंबरे व त्यांच्या समर्थकांना पक्षात प्रवेश दिल्यामुळे चिकटगांवकर प्रचंड नाराज होते.
त्यामुळे मतदारसंघात दौरा करून आपण लवकरच पुढची दिशा स्पष्ट करू असे चिकटगांवकर यांनी त्यावेळी सांगितले होते. भाऊसाहेब पाटील यांचे व्याही नांदेडचे भाजप खासदार प्रतापपाटील चिखलीकर हे असल्याने चिकटगांवकर भाजपमध्ये प्रवेश करतील असा अंदाज वर्तवला जात होता. परंतु वैजापूर विधानसभेची जागा भाजपच्या वाट्याला येत नसल्याने आणि प्रा. रमेश बोरनारे हे शिंदे गटाचे विद्यमान आमदार असल्याने भाजपमध्ये प्रवेश करणे चिकटगांवकरांना सोयीचे ठरणार नव्हते.
तर दुसरीकडे बोरनारे यांच्या गद्दारीचा बदला घेण्यासाठी ठाकरे गट देखील तगड्या नेत्याच्या शोधात होता. भाऊसाहेब पाटील चिकटगांवकर यांच्या रुपाने आता शिवसेनेला तो नेता मिळाल्याची चर्चा आहे. भाऊसाहेब पाटील चिकटगांवकर यांनी २०१४ च्या मोदी लाटेत देखील वैजापूरमधून राष्ट्रवादीला विजय मिळवून दिला होता. परंतु २०१९ मध्ये भाऊसाहेबांच्या पक्षांतर्गत विरोधकांनी काका विरुद्ध पुतण्या यांच्यात उमेदवारीसाठी संघर्ष घडवून आणला. उमेदवारीसाठी पक्षात कलह नको अशी भूमिका घेत चिकटगांवकरांनी पुतण्या अभयसाठी माघार घेतली.
वैजापूरमध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्वतः सभा घेतली. परंतु उमेदवारीत केलेला बदल वैजापूरकरांना रूचला नाही आणि त्याचा फायदा शिवसेनेला झाला. प्रा. रमेश बोरनारे मोठ्या फरकाने विजयी झाले. तेव्हापासून चिकटगांवकर पक्षात फारसे सक्रीय नसले तरी तालुक्यात त्यांचा संपर्क कायम होता.
परंतु वैजापूरमध्ये झालेल्या पराभवानंतर चिकटगांवकर यांना पक्षात दुय्यम वागणूक दिली जाऊ लागली. त्यांना पर्याय निर्माण करण्याचे प्रयत्न झाले. ठोंबरे व त्यांच्या समर्थकांना पक्षात आणण्याचे प्रयत्न चिकटगांवकरांनी दोनदा हाणून पाडले. मात्र गेल्या महिन्यात ते झाले आणि चिकटगांवकरांना पक्षातून बाहेर जाण्याचा रस्ताच एकप्रकारे मोकळा करून दिला की काय? अशी चर्चा तालुक्यात सुरू झाली.
गेल्या महिनाभरात चिकटगांवकरांनी गावागावत जाऊन समर्थकांच्या भेटी घेतल्या, चर्चा केली. नुकतीच त्यांनी सरला बेटच्या महारांजाची भेट घेतली होती. त्यानंतर त्यांनी आज थेट शिवसेनेत प्रवेश केला. चिकटगांवकरांनी दोनदा वैजापूरमधून अपक्ष निवडणूक लढवून ३५ ते ५० हजार मते मिळवली होती. राष्ट्रवादीने उमेदवारी दिल्यानंतर ते आमदार झाले होते. चिकटगांवकर यांना मानणारा मोठा वर्ग तालुक्यात आहे. त्यामुळे शिवसेनेत प्रवेश करत चिकटगांवकरांनी धुर्त खेळी केल्याचे म्हणावे लागेल.
बोरनारे यांनी शिवसेनेच्या बंडात सहभागी होवून मतदारसंघातील जनतेला रोष ओढावून घेतला आहे. त्यामुळे त्यांना २०२४ ची निवडणूक जड जाणार हे स्पष्ट होते. त्यातच आता शिवसेनेने चिकटगांवकरांना पक्षात प्रवेश दिल्यामुळे बोरनारे यांची वाट अधिकच बिकट होणार आहे. बोरणारेंना धडा शिकवण्यासाठी ठाकरेंनी केलेली ही खेळी यशस्वी होणार का? की बोरनारे आमदारकी पुन्हा राखतात याकडे सगळ्यांचे लक्ष असणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.