Monsoon Session News : विधानसभेत विरोधी पक्षनेता नसल्याने दानवे भाव खाऊन गेले..

Shivsena : या अधिवेशनात दानवे यांचे महत्व वाढल्याचे दिसून आले.
Monsoon Session News
Monsoon Session NewsSarkarnama
Published on
Updated on

Marathwada : राज्याच्या राजकारणाला दोन आठवड्यापुर्वी कलाटणी मिळाली. शिंदे-फडणवीस सरकारमध्ये अनपेक्षितपणे झालेल्या राष्ट्रवादीच्या एन्ट्रीने विधानसभेतील विरोधी पक्षनेते पदच हिरावले गेले. (Monsoon Session News) खुद्द विधानसभेतील विरोधी पक्षनेते असलेले अजित पवार सरकारमध्ये सामील झाले आणि त्यांनी उपमुख्यमंत्रीपदासह अर्थ खातेही मिळवले.

Monsoon Session News
Imtiaz Jalil News : आधी नाकारली, मग परवानगी दिली ; ठेवीदारांचा मोर्चा धडकला..

केंद्रातील मोदी सरकारचा कारभार जसा विरोधी पक्षनेत्याशिवाय सुरू आहे, तशीच काहीशी परिस्थिती महाराष्ट्रात देखील निर्माण झाली आहे. (Shivsena) त्यामुळे पावसाळी अधिवेशनात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे चांगेलच भाव खाऊन गेले. शिंदे गटात बंड झाल्यानंतर महाविकास आघाडीचे सरकार कोसळले.

उद्धव ठाकरे यांची मुख्यमंत्रीपदाची खुर्ची गेली, पण या सगळ्या राजकीय घडामोडी ठाकरे गटातील काही आमदारांच्या पथ्यावर पडल्या असेच म्हणावे लागेल. (Aurangabad) औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विधान परिषदेवर निवडून गेलेल्या अंबादास दानवे यांची थेट विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेते पदावर वर्णी लागली. (Marathwada) उद्धव ठाकरे यांचे विश्वास आणि संघटन कौशल्यात निपूण असलेल्या दानवे यांनी देखील चालून आलेल्या या संधीचं सोनं केलं.

मुंबई, नागपूर आणि आता परत मुंबई येथील विधीमंडळाच्या अधिवेशनात दानवे यांनी आपली छाप पाडलीच. आजपासून सुरू झालेले विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन तर दानवे यांच्यासाठी खासच ठरणार आहे. विधान परिषदेतील उपसभापती डाॅ. नीलम गोऱ्हे, आमदार मनिषा कायंदे यांनी पक्षाला जय महाराष्ट्र केल्यामुळे दानवे यांचे विरोधी पक्षनेते पदच धोक्यात आल्याची चर्चा सुरू झाली होती.

परंतु राष्ट्रवादीच्या बंडामुळे दानवे बचावले आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते पदच रिक्त झाले. आता या जागेवर सभागृहातील सर्वात मोठा पक्ष म्हणून काॅंग्रेसकडून दावा केला जात आहे. अद्याप विरोधी पक्षनेता कोण असेल? यावर निर्णय झालेला नाही. त्यामुळे सत्ताधाऱ्यांच्या चहापाणावर बहिष्कार, दोन्ही सभागृहात कोणत्या मुद्यावर सरकारची कोंडी करायची याची रणनिती आखण्यासाठीच्या बैठका दानवे यांच्याच दालनात पार पडल्या.

Monsoon Session News
Protest For Landless People: गायरान जमीन भूमिहीनांच्या नावे करा, जेलभरोने लक्ष वेधले..

अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, नाना पटोले, जयंत पाटील यांच्यासारख्या ज्येष्ठ आणि अनुभवी नेत्यांच्यासमोर विरोधी पक्षनेता म्हणून दानवेंना मार्गदर्शन करण्याची संधी मिळाली. उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी पक्षांतर केल्यामुळे त्यांना पदावरून हटवा, अशी मागणी दानवे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीने राज्यपालांकडे केली.

याशिवाय सरकारविरोधात विधानभवनाच्या प्रवेशद्वारावर करण्यात आलेल्या आंदोलनातही अंबादास दानवे केंद्रस्थानी होते. एकंदरित विधानसभेत विरोधी पक्षनेता नसल्यामुळे या अधिवेशनात दानवे यांचे महत्व वाढल्याचे दिसून आले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com