Harshavardhan Jadhav News : हर्षवर्धन जाधवांवर `अ‍ॅनिमल` इफेक्ट; मुलगा आदित्यला केलं माफ...

Kannad News : एकमेकांशी अबोला धरून असलेल्या या पिता-पुत्रांमधील गैरसमज दूर होऊन ते पुन्हा एकत्र येणार.
Harshvardhan Jadhav News
Harshvardhan Jadhav NewsSarkarnama
Published on
Updated on

Marathwada Political News : सध्या देशभरात रणबीर कपूर आणि अनिल कपूर यांची भूमिका असलेला `अ‍ॅनिमल` चित्रपट धुमाकूळ घालतोय. बाप-मुलाच्या नात्यावर आधारलेल्या या चित्रपटाने 800 कोटींचा गल्ला आतापर्यंत जमवला आहे. (Harshavardhan Jadhav News) चित्रपट हा समाजमनाचा आरसा असतो, असं नेहमीच म्हटलं जातं. चित्रपटातील व्यक्तिरेखा, त्यांची स्टाईल, देहबोली याचं अनुकरण तरुण पिढी करत असते.

Harshvardhan Jadhav News
Harshvardhan Jadhav Angry : सोन्यासारख्या मतदारसंघाची गटारगंगा केली, आता सोडणार नाही ; हर्षवर्धन जाधव भडकले..

`अ‍ॅनिमल` चित्रपटात आपल्या वडिलांवर जीवापाड प्रेम करणारा मुलगा आणि व्यवसायात गुंतलेला, मुलांकडे दुर्लक्ष असलेला बाप अनिल कपूर यांनी रंगवला आहे. (Kannad) रंजक पद्धतीने मांडण्यात आलेल्या या कथेला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं आहे. (Marathwada) अशीच काही उदाहरण किंवा या भूमिकांशी साम्य असलेल्या घटना राजकारणात देखील पाहायला मिळतात.

मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या कन्नड-सोयगांव मतदारसंघाचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव (Harshvardhan Jadhav) सध्या त्यांच्या कौटुंबिक वाद आणि इतर गोष्टींमुळे चर्चेत आहेत. एका मोठ्या राजकीय पक्षाचे नेते, केंद्रात मंत्री असलेल्या व्यक्तीच्या मुलीशी जाधव यांचा झालेला विवाह संपुष्टात आला. या वादात मुलगा आणि वडील यांच्या नातेसंबंधालाही तडा गेला होता. हर्षवर्धन जाधव यांचा राजकीय वारस म्हणून त्यांचा मुलगा आदित्यवर्धन याच्याकडे पाहिले जात होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

स्वतः हर्षवर्धन जाधव यांनी जाहीर भाषणातून आदित्यच्या रुपाने कन्नड मतदारसंघाला जाधव घराणे तुम्हाला नवा आमदार देणार आहे, असे सांगत होते. पण मध्यंतरी हर्षवर्धन आणि आदित्यवर्धन या पिता-पुत्राच्या नात्यामध्ये दुरावा निर्माण झाला. हर्षवर्धन जाधव यांनी आपल्याच मुलावर गंभीर आरोप करत व्हिडिओ समाज माध्यामांवर व्हायरल केले होते. तेव्हापासून या दोघांमधील संबंध कमालीचे बिघडले होते.

दरम्यान, रणवीर कपूर, अनिल कपूर यांचा बाप-मुलगा नात्यावर भाष्य करणारा चित्रपट प्रदर्शित झाला. हा योगायोग म्हणा, की या चित्रपटातून प्रेरणा घेऊन म्हणा पण जाधव पिता-पुत्रांमधील संबंध पुन्हा पूर्वपदावर येत आहेत. कौटुंबिक, राजकीय संकटात असलेल्या हर्षवर्धन जाधव यांच्या मदतीला त्यांचा मुलगा आदित्यवर्धन धावून आला आहे.

Harshvardhan Jadhav News
Shivsena MLA Disqualification: '...तर शिवसेनेच्या सर्वच आमदारांचे निलंबन करावे लागेल'; ठाकरे गटाच्या वकिलांचा मोठा दावा

काही दिवसांपासून एकमेकांशी अबोला धरून असलेल्या या पिता-पुत्रांमधील गैरसमज दूर होऊन ते पुन्हा एकत्र येणार असल्याची गोड बातमी हर्षवर्धन जाधव यांनी स्वतःच सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली. आदित्यने मला एक मेसेज केला, त्यात माझी चूक झाली, पण मी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे, असा तो मेसेज होता. मुलं चुकतात, भरकटतात, मात्र त्यांना समजून घेणे आणि मोठ्या मनानं माफ करणे हेच तर एका पित्याचं काम असतं. आदित्यला त्याची चूक कळाली, त्यानं ती मान्यही केली माझ्यासाठी ही खूप मोठी गोष्ट आहे.

मी ही त्याला माफ केलं आहे, असं म्हणत हर्षवर्धन जाधव यांनी मुलगा आदित्य यांच्यासोबत असलेली कटुता दूर झाल्याचं स्पष्ट केलं. हर्षवर्धन जाधव हे छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातून पुन्हा निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत. राजकारणात चहुबाजूने संकटात असलेल्या जाधव यांच्या मदतीला मुलगा धावून येणार असल्यानं ही त्यांच्यासाठी जमेची बाजू ठरणार आहे. जाधव यांच्या खासगी आयुष्यात अनेक वादळ आली, येत आहेत. मात्र, या सगळ्यांवर मात करून ते विरोधकांना आव्हान देताना दिसत आहेत. आता त्यांना मुलाचीही साथ लाभणार असल्याने त्यांचा आनंद द्विगुणित झाला आहे.

Edited By : Jagdish Pansare

Harshvardhan Jadhav News
Nagpur News : एकनाथ शिंदे हे महाराष्ट्रासाठी 'पनौती'; तुपकरांचा हल्लाबोल, पोलिस अन् शेतकऱ्यांमध्ये खडाजंगी

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com