Parli Assembly Constituency: परळीत करुणा मुंडे यांचा उमेदवारी अर्ज बाद

Karuna Munde Nomination Rejected: त्यांच्या अर्जावर सूचक म्हणून ज्यांचे नाव होते, त्यांनी या अर्जावरची सही आपली नसल्याचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना सांगितले. त्यानंतर हा अर्ज बाद ठरवण्यात आला.
Karuna Munde News
Karuna Munde NewsSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Assembly Election 2024 : संपुर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या विधानसभेच्या परळी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या करुणा मुंडे यांचा अर्ज अवैध ठरवण्यात आला आहे. या अर्जावर सूचक म्हणून नाव असलेल्या व्यक्तीने, मी स्वाक्षरी केली नसल्याचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांसमोर स्पष्ट केल्याने हा अर्ज बाद ठरवण्यात आला आहे.

बीडच्या परळी (Parli) विधानसभा मतदारसंघातून करुणा मुंडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. या उमेदवारी अर्जावर सूचक म्हणून ज्या व्यक्तीचे नाव होते, त्याने अर्जावरील स्वाक्षरी आपली नसल्याचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना सांगितले. त्यानंतर एकच गोंधळ उडाला, निवडणूक निर्णय अधिकार्‍यांनी करुणा मुंडे यांचा उमेदवारी अर्ज बाद ठरवला.

परळी विधानसभा मतदारसंघात 10 उमेदवारांचे 15 अर्ज बाद ठरले आहेत. करुणा मुंडे यांनी आपल्या स्वराज्य शक्ती सेना पक्षाकडून परळीतून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. पती धनंजय मुंडे यांच्याविरोधात करुणा यांनी अर्ज दाखल केल्याने राज्यभरात याची चर्चा सुरू होती. मात्र आज उमेदवार अर्ज छानणीत करुणा मुंडे यांचा अर्ज निवडणुक निर्णय अधिकाऱ्यांनी बाद ठरवला.

Karuna Munde News
Parli Assembly Constituency : परळीची निवडणुक निर्भय वातावरणात, आयोगाची खंडपीठात हमी

त्यांच्या अर्जावर सूचक म्हणून ज्यांचे नाव होते, त्यांनी या अर्जावरची सही आपली नसल्याचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना सांगितले. त्यानंतर हा अर्ज बाद ठरवण्यात आला. (Karuna Munde) करुणा मुंडे यांनी 2 आॅक्टोबर रोजी पत्रकार परिषद घेऊन राज्यातील 47 विधानसभा मतदारसंघातून पक्षाचे उमेदवार देणार असल्याचे जाहीर केले होते. तसेच स्वतः परळी विधानसभा मतदारसंघातून पती धनंजय मुंडे यांच्याविरोधात निवडणुक लढवणार असल्याची घोषणा केली होती.

यावेळी त्यांनी धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप देखील केले होते. परळीतून निवडणुक लढवण्याची घोषणा केल्यानंतर करुणा मुंडे यांनी मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांची अंतरवाली सराटीत जाऊन भेट घेतली होती. दरम्यान, आज करुणा मुंडे यांचा उमेदवारी अर्जच बाद ठरवण्यात आला.

Karuna Munde News
Dussehra Melava-Dhananjay Munde : धनंजय मुंडेंचे दसरा मेळाव्यात बारा वर्षांनंतर भाषण

त्यामुळे परळीत पती विरुद्ध पत्नी असा सामना आता होणार नाही. करुणा मुंडे या मनोज जरांगे पाटील यांना भेटून आल्यानंतर परळीत यांची मोठी चर्चा सुरू झाली होती. राज्यातील हाय वोल्टेज लढत म्हणून परळीतील निवडणुकीकडे पाहिले जात होते. मात्र ही लढत करुणा मुंडे यांचा उमेदवारी अर्ज बाद झाल्याने आता टळली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com