Sandipan Bhumre On His Ministry : माती कामगार खाते म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रोजगार हमीला माझ्यामुळे राज्यात प्रतिष्ठा..

Shivsena : गेल्यावर्षी राज्यात १७०० कोटी तर यावर्षी ३६०० कोटी खर्च केला. यात सर्वाधिक छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याला निधी दिला.
Sandipan Bhumre On His Ministry, News
Sandipan Bhumre On His Ministry, NewsSarkarnama

Chhatrapati Sambhajinagar : अगोदर राज्यात अनेक रोजगार हमी योजनेचे मंत्री होऊन गेले, अगोदर या खात्याला माती कामगार मंत्रीपद म्हणून संबोधले जात असे. परंतु जेव्हापासून मी रोजगार हमी योजना व फलोत्पादन खात्याचा पदभार स्वीकारला तेव्हापासून या विभागाची ओळख संपूर्ण राज्यात झाली. आतापर्यंत सर्वात जास्त निधी खर्च करणारा हा विभाग असून या विभागाच्या माध्यमातून थेट वैयक्तिक लाभाच्या योजना व गावाच्या विकासासाठी निधी वितरित केल्याचा दावा (Sandipan Bhumre) रोजगार हमी मंत्री संदीपान भुमरे यांनी केला.

Sandipan Bhumre On His Ministry, News
BRS Rally News : ज्यांचे हैदराबादेत गुलाबी रुमाल देवून स्वागत, त्यांचेच आजच्या सभेत प्रवेश..

पंचायत राज निमित्त सोमवारी (ता.२४) छत्रपती संभाजीनगर जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्ष व पंचायत विभागाच्यावतीने संत गाडगेबाबा पुरस्कार, महाअवास अभियान व इतर योजनेतील पुरस्काराचे वितरण भुमरे यांच्या हस्ते करण्यात आले. (Paithan) भुमरे म्हणाले, अगोदर या खात्याला बिगर शेतकरी मंत्री मिळाले होते, त्यामुळे शेवटच्या लाभार्थ्यापर्यंत या योजना पोहोचत नव्हत्या. (Marathwada) परंतु मी खात्याचा पदभार घेताच काही लोकांनी मला दुय्यम खाते दिले असे म्हणत टीका केली.

परंतु राज्यात निधी वितरणामध्ये नंबर एकचे हेच खाते ठरत आहे. यात वैयक्तिक लाभाच्या योजना व गावाच्या विकासासाठी थेट निधी वितरत करण्यात येत आहे. (Shivsena) यात स्मशान भूमी, अंगणवाड्या, शाळा दुरुस्ती, सिमेंट रस्ते, पानंद रस्ते, शेततळे, वृक्ष लागवड अशा विविध योजनातून थेट लाभार्थ्यांना निधी वितरित होत आहे. येणाऱ्या वर्षात पाच हजार कोटीहून अधिक निधी खर्च करणार असल्याचेही भुमरे यांनी यावेळी सांगितले.

अगोदर बिगर शेतकरी मंत्री होते या खताचे पदभार स्वीकारताच बिगर शेतकरी मंत्री असल्यामुळे त्यांना गाय गोठा, पानंद रस्ता काय हे माहिती नव्हते. परंतु मी स्वतः शेतकरी असल्यामुळे शेतीतील मला जास्त माहिती आहे, प्रत्यक्षात काम करण्यासाठी शेतकऱ्यांना काय हवे आहे ते त्यांनी करू द्या, आपण फक्त अनुदान त्यांना वाटप करायचा हा निर्णय घेतला. त्यामुळे हे खाते यशस्वी ठरत असल्याचेही भुमरे म्हणाले.

फलोत्पादन व रोजगार हमी योजनेचे काम करत असताना गट विकास अधिकारी व ग्रामसेवकांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागतो, परंतु अडचणी व तक्रारी यांना न घाबरता तुम्ही तुमचे काम करत नागरिक व गावाचा विकास करा, तुमच्या पाठीशी मी आहे. यात निधीची कसलीच कमतरता भासू देणार नाही, असे आश्वासनही त्यांनी दिले.

Sandipan Bhumre On His Ministry, News
Pankaja Munde Speech: व्यापारी देशाच्या पाठीचा कणा, त्यांना संरक्षण मिळाले पाहिजे..

तर नुकतेच बिडिओंनी रोजगार हमी योजनेच्या कामावर बहिष्कार टाकत मस्टरवर सही न करण्याचा निर्णय घेतलाहोता परंतु नुकतेच सचिवांनी या निर्णयात बदल करत ऑनलाईन ऐवजी ऑफलाईन स्वाक्षरी घेण्याची आदेश काढले असल्याचे भुमरे यांनी सांगितले. रोजगार हमी योजनेत अगोदर मोठ्या अडचणी होत्या.

एखादी योजना राबवण्यासाठी विविध जाचक अटी टाकण्यात आल्या होत्या. मी या खात्याचा पदभार स्वीकारताच या सर्व जाचकाठी रद्द करत गेल्यावर्षी राज्यात १७०० कोटी खर्च केले. तर यावर्षी ३६०० कोटी खर्च केला. यात सर्वाधिक छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याला निधी दिला असल्याचे भुमरे यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com