Hingoli : शिंदे सरकारच्या निर्णय स्थगितीला राष्ट्रवादीचे आमदार वैतागले, म्हणाले..

वसमत मध्ये नियोजित असलेल्या ग्लोबल मार्केटसाठी राखीव ठेवलेली ६५ एकर जमीन हळद संशोधन बोर्डाला दिली असल्याचा आरोप नवघरे यांनी केला. (Mla Chandrakant Navghare,Ncp)
Cm Eknath Shinde-Mla Chandrakant Navghare News, Hingoli
Cm Eknath Shinde-Mla Chandrakant Navghare News, HingoliSarkarnama
Published on
Updated on

हिंगोली : राज्यातील सत्तांतरानंतर शिंदे-फडणवीस सरकारने आधीच्या आघाडी सरकारच्या निर्णयांना स्थगिती देण्याचा सपाटा लावला. यावरून आघाडीचे नेते या सरकारला स्थगिती सरकार म्हणून डिवचत आहे. यातच आता वैतागलेल्या (Ncp) राष्ट्रवादीच्या आमदाराने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याकडे एक आगळी-वेगळी मागणी केली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, तुम्ही सोन्या चांदीचे रस्ते निर्माण करा, पण आमच्या मतदारसंघातील विकास कामांना स्थगिती देऊ नका, अशी विनंती वजा मागणी चंद्रकांत नवघरे यांनी केली आहे. (Hingoli) हिंगोलीच्या वसमत विधानसभेतील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार चंद्रकांत नवघरे यांनी मुख्यमंत्र्यांना विनंती करत मतदार संघातील विकास कामांना दिलेली स्थगिती उठविण्याची मागणी केली आहे.

आमदार नवघरे यांनी जाहीर पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप देखील केले. तुमच्या मतदारसंघात सोन्या-चांदीचे रस्ते बनवा मात्र आमच्या मतदारसंघांमध्ये मंजुरी देण्यात आलेली विकास कामे थांबवू नका, असे साकडे देखील त्यांनी घातले.

Cm Eknath Shinde-Mla Chandrakant Navghare News, Hingoli
Abdul Sattar : आमचे मुख्यमंत्री साधेपणा जपणारे, तर आधीचे चमच्याने दूध पिणारे..

वसमत मध्ये नियोजित असलेल्या ग्लोबल मार्केटसाठी राखीव ठेवलेली ६५ एकर जीन हळद संशोधन बोर्डाला दिली असल्याचा आरोप नवघरे यांनी केला. या सोबतच आदिवासी मुलांसाठी निर्मिती करण्यात येणाऱ्या निवासी वसतिगृहाच्या कामाचा निधी देखील शिंदे गटातील आमदारांना देण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com