Hingoli : गद्दाराची गाडी जो पहिले फोडेल, त्याला जिल्हाप्रमुखपद अन् मातोश्रीवर सन्मान..

आमदार बांगर, खासदार पाटील यांनी बंडखोरी केली असली तरी जिल्ह्यातील स्थानिक नेते, पदाधिकारी व शिवसैनिक पक्षाशी निष्ठा राखून आहेत. (Hingoli Shivsena)
Shivsena Leader Babanrao Thorat, Hingoli News
Shivsena Leader Babanrao Thorat, Hingoli NewsSarkarnama
Published on
Updated on

हिंगोली : ठाकरे सरकारविरोधात बंड पुकारत बाहेर पडलेल्या शिवसेनेतील ४० गद्दार आमदारांच्या विरोधात आता (Shivsena) शिवसेनेचे नेते अधिक आक्रमक झाले आहेत. हिंगोली येथील कार्यकर्ता मेळाव्यात संपर्कप्रमुख बबनराव थोरात यांनी तर इच्छूक जिल्हाप्रमुखांना आॅफरच दिली. (Hingoli) आपल्या कार्यक्षेत्रात, गावात गद्दाराची पहिली गाडी जो फोडेल त्याला जिल्हाप्रमुखपद आणि मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सन्मान केला जाईल. गद्दारांना धडा शिकवण्यासाठी आता पुन्हा एकादा बाळासाहेब ठाकरेंच्या विचारावर आक्रमक होण्याची गरज असल्याचेही थोरात म्हणाले.

एकनाथ शिंदे यांच्या बंडात हिंगोलीची जिल्हाप्रमुख तथा कळमनुरीचे आमदार संतोष बांगर हे सहभागी झाले होते. त्यानंतर खासदार हेमंत पाटील हे देखील बाहेर पडल्याने जिल्ह्यात शिवसेनेला मोठा धक्का बसला होता. (Marathwada) शिवसेनेचा बालेकिल्ला अशी ओळख असलेल्या जिल्ह्यात सुरू असलेली पडझड रोखण्यात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व स्थानिक पदाधिकाऱ्यांना यश आले आहे.

आमदार बांगर, खासदार पाटील यांनी बंडखोरी केली असली तरी जिल्ह्यातील स्थानिक नेते, पदाधिकारी व शिवसैनिक पक्षाशी निष्ठा राखून आहेत. कार्यकर्त्यांची ही एकजूट कायम राहावी यासाठी संपर्कप्रमुख बबनराव थोरात यांच्या उपस्थीतीत आज शिवसेना पदाधिकाऱ्यांचा मेळावा झाला. यावेळी आक्रमक भूमिका मांडतांना थोरात यांनी गद्दारांच्या गाड्या फोडा, असे आवाहन थोरात यांनी केले.

Shivsena Leader Babanrao Thorat, Hingoli News
शिरसाट बदमाशाची औलाद, केसरकर गद्दार ; शिवसेनेचं नावं घेण्याची तुमची लायकी नाही..

जे जे कोणी जिल्हाप्रमुख पदासाठी इच्छूक आहेत, त्यांना माझे आवाहन आहे. शिवसेनेशी गद्दारी करून फुटलेले ज्यांच्या कोणाच्या कार्यक्षेत्रात येतील आणि जो पहिल्यांदा त्यांची गाडी फोडेल, त्याचा मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सन्मान केला जाईल. गद्दारांच्या विरोधात आता रस्त्यावर उतरावेच लागेल, असे आवाहन देखील थोरात यांनी यावेळी केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com