Sambhajinagar Cabinet Meeting : मंत्रिमंडळाची बैठक होऊच नये म्हणून विरोधकांचे प्रयत्न; ... फडणवीसांचा आरोप !

Marathwada Meeting Updates : "असे लोक नाव ठेवण्याचे काम करतात..."
Sambhajinagar Cabinet Meeting :
Sambhajinagar Cabinet Meeting : Sarkarnama
Published on
Updated on

Chhatrapati Sambhajinagar News : राज्य मंत्रिमंडळाची छत्रपती संभाजीनगरमध्ये बैठक संपली आहे. या बैठकीतून कोणते निर्णय घेतले याची माहिती देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची एकत्रित पत्रकार परिषद पार पडत आहे. या वेळी फडणवीस यांनी काही निर्णयांवर निवेदन करतानाच विरोधकांवर टीका केली. (Latest Marathi News)

Sambhajinagar Cabinet Meeting :
NCP Crisis News : अजित पवारांची बैठकीला दांडी; शरद पवार यांच्यापुढे येणे जाणीवपूर्वक टाळले ?

फडणवीस म्हणाले, "मंत्रिमंळाची बैठक मराठवाड्यात होत आहे. विरोधकांनी बैठक होऊच नये, असादेखील प्रयत्न केला. जे स्वत: काही करू शकले नाहीत, असे लोक नाव ठेवण्याचे काम करतात. तुम्ही अडीच वर्षांत काय केलं?" अशा शब्दांत फडणवीसांनी विरोधकांवर हल्लाबोल केला.

Sambhajinagar Cabinet Meeting :
Manoj Jarange Protest : अजित पवार-देवेंद्र फडणवीस यांनी जरांगे यांच्या उपोषणस्थळी जाणे का टाळले, काय आहे कारण ?

शेवटची बैठक कधी? काय झालं?

४ ऑक्टोबर २०१६ रोजी मंत्रिमंडळाची बैठक पार पडली होती. त्या बैठकीत एकूण ३१ निर्णय घेण्यात आले. यामध्ये एकूण २२ विषय अवगत केले गेले, तर काही विषयांवर निर्देश देण्यात आले होते. या सर्व ३१ विषयांचा आढावा २०१७ मध्ये घेतला. तेव्हा १० विषय कार्यवाही प्रक्रिया झाली होती . उर्वरित १५ विषयांवर कार्यवाही करण्याचे नियोजन टप्प्यात होते, तर एकूण ६ विषयांवरील कार्यवाही राहिली होती. आज २०२३ चा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा एकूण ३१ विषयांपैकी २३ विषय पूर्णदेखील झालेले आहेत. ७ विषयांवर कार्यवाही सुरू झाली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com