NCP Crisis News : अजित पवारांची बैठकीला दांडी; शरद पवार यांच्यापुढे येणे जाणीवपूर्वक टाळले ?

Sharad Pawar Vs Ajit Pawar : दिलीप वळसे पाटील यांनी शरद पवार यांचे यावेळी स्वागत केले.
Ajit Pawar Sharad Pawar
Ajit Pawar Sharad PawarSarkarnama

Pune News : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार शुक्रवारी पुन्हा पुण्यात वसंतदादा शुगर इन्स्टिट्युटच्या संचालक मंडळाच्या बैठकीसाठी एकत्रित येतील अशी चर्चा होती. मात्र या बैठकीला अजित पवार यांनी दांडी मारत शरद पवार यांच्यापुढे येणे टाळले आहे. दुसरीकडे या बैठकीसाठी हजर असलेल्या सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी शरद पवार यांचे यावेळी स्वागत केले.

Ajit Pawar Sharad Pawar
Hasan Mushrif Vs Sanjay Mandlik : शिंदे गटाचे विनाकारण आकांडतांडव; अजित पवार गटाचा पलटवार

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची अजित पवार यांनी काही दिवसापूर्वी गुप्तपणे पुण्यात भेट घेतली होती. मात्र फुटीनंतर सार्वजनिकरित्या दोघेही एकत्र आले नव्हते. मात्र आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांचे अध्यक्ष म्हणजे शरद पवार आणि अजित पवार एका बैठकीसाठी एकत्र येथील अशी शक्यता प्रसारमाध्यमांकडून व्यक्त केली जात होती. मात्र अजित पवार यांनी बैठकीकडे पाठ फिरवत सर्व चर्चांना पूर्ण विराम दिले आहे.

Ajit Pawar Sharad Pawar
Ajit Pawar विरुद्ध sharad Pawar ; NCP'चे दोन्ही गट आमनेसामने येणार

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर या पूर्वी एक वेळेस वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूच्या संचालक मंडळाची एक बैठक झाली होती. त्यावेळी अजित पवार बैठकीला गैरहजर होते. मात्र, त्याच दिवशी अजित पवार यांनी शरद पवार यांची भेट घेतली होती. दोघांमध्ये पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम उद्योजक अतुल चोरडिया यांच्या घरी भेट झाली होती. त्या गुप्त भेटीची चर्चा पुढे बरेच दिवस सुरू होती. त्यामुळेच अजितदादांनी या बैठकीला येणे टाळले असल्याचे समजते.

Ajit Pawar Sharad Pawar
Nana Patole News : शिंदेंचे आमदार अपात्र ठरले तर फडणवीस मराठा आरक्षणाची जबाबदारी झटकतील!

(Edited By - Chetan Zadpe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com