Manoj Jarange Protest : अजित पवार-देवेंद्र फडणवीस यांनी जरांगे यांच्या उपोषणस्थळी जाणे का टाळले, काय आहे कारण ?

Maratha Reservation Protest At Jalna : "मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर त्यांच्या नियोजित बैठकांचं आयोजन .."
Maratha Reservation Protest At Jalna
Maratha Reservation Protest At JalnaSarkarnama

Jalna News : मराठा आरक्षणाच्या मागणीवर ठाम असलेले मनोज जरांगे पाटील यांनी अखेर सतराव्या दिवशी उपोषण मागे घेतले. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आश्वासनानंतर जरांगे पाटील यांनी उपोषण सोडले. मुख्यमंत्र्यांच्या प्रयत्नाला यश आले आहे. मात्र, या वेळी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी जरांगे यांच्या उपोषणस्थळी जाणे टाळले. यावरून आता जोरदार चर्चा होत आहे. मराठा आंदोलकांच्या उपोषणस्थळी उपस्थिती लावतील, अशी अपेक्षा असताना नियोजित बैठकांमुळे अजित पवार व देवेंद्र फडणवीस अंतरवाली सराटीत गेले नसल्याचे सांगितले जात आहे.

Maratha Reservation Protest At Jalna
Parliament Special Session: मोदी सरकारने का बोलावले विशेष अधिवेशन ? अधिवेशनाचा अजेंडा आला समोर

मुख्यमंत्र्यांसोबत अजित पवार जालन्यात जाणार असल्याची माहिती होती. मात्र, अंतरवाली सराटीत जाण्याऐवजी ते मंत्रालयात दाखल झाले आहेत. मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर त्यांच्या नियोजित बैठकांचं आयोजन करण्यात आले आहे. या बैठकांमुळे अजित पवार अंतरवाली सराटीत गेले नसल्याचे सांगितलं जात आहे.

दुसरीकडे जरांगे पाटील यांचे उपोषण सोडवताना शिंदे गटाचे मंत्री संदीपान भुमरे, मंत्री उदय सामंत, माजी मंत्री अर्जुन खोतकर उपस्थित होते. तसेच भाजपचे मंत्री उपस्थित होते. मात्र, अजित पवार गटाच्या एकाही मंत्र्याने या वेळी उपोषणस्थळी उपस्थित लावली नाही.

Maratha Reservation Protest At Jalna
Sarkarnama Podcast : लातूरकरांचा चिमटा, मातब्बराचा पराभव

दुसरीकडे देवेंद्र फडणवीस हे तीन दिवसांच्या राजस्थान दौऱ्यावर आहेत. त्यांच्याकडे तेथील विधानसभा निवडणुकीची जबाबदारी आहे. त्यामुळे ते राजस्थानमधील अजमेरसह पाच ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. त्यांचा हा दौरा पूर्वनियोजित असल्याने ते जालना येथे आंदोलनस्थळी येऊ शकले नाहीत, असे सांगितलं जात आहे.

Maratha Reservation Protest At Jalna
Parbhani NCP News: परभणीत राष्ट्रवादीची घडी विस्कटली; पुढे आणखी धक्के बसणार...

फडणवीस हे राज्याचे गृहमंत्री आहेत. गृहमंत्रालयाशी संबंधित काही मागण्या मराठा आंदोलकांच्या आहेत. त्यामुळे ते जालन्यात येऊन आंदोलकांची समजूत काढतील अशी अपेक्षा होती. पण फडणवीसही जालन्याला आले नाहीत. या वेळी भाजपचे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी हजेरी लावली होती.

(Edited By - Chetan Zadpe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com