Marathwada Shivsena News : माझ्या गल्लीत बारा दिवसांपासून पाणी नाही, दसऱ्यानंतर हंडा मोर्चा काढणार...

Sambhajinagar News : शहरात जो पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे, त्याचे पाप भाजप आणि एमआयएम यांचेच आहे.
Marathwada Shivsena News
Marathwada Shivsena NewsSarkarnama
Published on
Updated on

Water supply Issue News : छत्रपती संभाजीनगर शहरातील पाणीपुरवठा सुरळीत व्हावा, यासाठी मी मंजूर करून आणलेली समांतर जलवाहिनी भाजप, एमआयएम आणि मीडियाच्या काही लोकांनी मिळून बंद पाडली. (Shivsena News) अन्यथा दोन वर्षांपूर्वीच शहरातील पाण्याचा प्रश्न सुटला असता, असा दावा शिवसेना ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी केला.

Marathwada Shivsena News
BJP Political News : भाजपच्या शहर कार्यकारिणीत केंद्रीय मंत्री कराडांची बहीण अन् चिरंजीव...

शहरातील पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे, माझ्या गल्लीतच बारा दिवसांपासून पाणी आलेले नाही. दसऱ्यानंतर आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली हंडा मोर्चा काढणार असल्याचेही खैरै यांनी म्हटले आहे. शहरातील शिवसेना भवनात नुकतीच चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांनी शहरातील पदाधिकारी, महिला कार्यकर्त्यांची बैठक घेऊन पाण्यासह विविध प्रश्नांवर चर्चा केली.

यात प्रामुख्याने पाण्याचा मुद्दा आणि त्याला विरोधी पक्ष कसे जबाबदार आहेत हे खैरे यांनी निक्षूण सांगितले. (Shivsena) समांतर योजना ७९८ कोटींची होती, ती पुर्ण झाली असती तर आज पाण्यासाठी लोकांना वणवण करावी लागली नसती. (BJP) भाजपने एमआयएमला हाताशी धरून तेव्हा समांतर योजनेला विरोध केला. काही सामाजिक संघटना, माध्यमांना हाताशी धरून समांतर योजना घालवली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

त्यामुळे आज शहरात जो पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे, त्याचे पाप भाजप आणि एमआयएम यांचेच आहे, असा आरोपही खैरे यांनी केला. या विरोधात आवाज उठवून वस्तुस्थिती समोर आणणे गरजेचे आहे. शहरातील नागरिकांना मुबलक पाणी मिळाले पाहिजे, यासाठी विजयादशमी झाल्यानंतर आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेवर `हंडा मोर्चा` काढण्यात येईल, असेही खैरै यांनी सांगितले.

राज्यात महाविकास आघाडी सरकार आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना तेव्हाचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महापालिकेवर आक्रोश मोर्चा काढला होता. शहरासाठी अठराशे कोटींची पाणीपुरवठा योजना मंजूर झाली असली तरी तिचे काम कासवगतीने सुरू आहे. ही योजना अजूनही दोन वर्षे पूर्ण होऊ शकणार नाही, असे बोलले जाते. या पार्श्वभूमीवर भाजपने काढलेल्या आक्रोश मोर्चाला ठाकरे गटाकडून हंडा मोर्चाने प्रत्युत्तर देण्याची तयारी ठाकरे गटाने सुरू केली आहे.

Edited By : Jagdish Pansare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com