Marathwada Political News : चंद्रकांत खैरे चारदा खासदार झाले ; पण कुटुंबीय आजही विकतात अंत्यसंस्काराचे साहित्य..

Shivsena News : खैरे यांचे आजोबा भागूजी खैरे, त्यांच्यानंतर त्यांचे वडील भाऊसाहेब खैरे यांनी हा व्यवसाय सांभाळला.
Traditional business Khaire family  News
Traditional business Khaire family News
Published on
Updated on

Traditional business Khaire family : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सामान्य लोकांना रस्त्यावरून उचलून आमदार, खासदार, अगदी मंत्रीही केले. बाळासाहेबांनी डोक्यावर हात ठेवला, की त्याचे नशीब उजळलेच अशी परिस्थिती होती. (Shivsena) काँग्रेसच्या तत्कालीन सरंजामदार नेत्यांना कंटाळलेल्या नागरिकांनी मग बाळासाहेबांनी दिलेल्या सामान्य वर्गातील उमेदवारांना अक्षरशः डोक्यावर घेतले. काळी पिवळी जीप चालवणारे ज्ञानेश्वर पाटील यांना बाळासाहेब ठाकरे यांनी भूम-परंड्याचे आमदार केले.

Traditional business Khaire family  News
Pimpri Chinchwad Police : पिंपरी-चिंचवडचा पोलिस अधिकारी ५० रुपयांत करोडपती !

गृहिणी असलेल्या कल्पनाताई नरहिरे शिवसेनेकडून कळंबच्या आमदार, नंतर खासदार बनल्या. ही यादी लांबतच जाणारी आहे. (Marathwada) दोन वेळा आमदार, मंत्री आणि चार वेळा खासदार राहिलेले छत्रपती संभाजीनगर (पूर्वीचे औरंगाबाद) येथील शिवसेनेचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे यांचाही या यादीत समावेश होतो. शिवसेना ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) हे बाळासाहेब ठाकरे यांचे कट्टर शिवसैनिक म्हणून ओळखले जातात. प्रदीर्घ काळ महत्त्वाची पदे भूषवल्यानंतरही खैरे यांच्या कुटुंबीयांनी आपला पारंपरिक व्यवसाय सोडला नाही.

अंत्यसंस्काराचे साहित्य विकण्याचा खैरे कुटुंबीयांचा व्यवसाय आहे. येथील डेक्कन फ्लोअर मिलमध्ये चंद्रकांत खैरे व्यवस्थापक होते. ते बुरूड समाजाचे आहेत. (Maharashtra) त्यामुळे अंत्यसंस्काराचे साहित्य विकण्याचा त्यांचा पिढीजात व्यवसाय आहे. खैरे यांचे आजोबा भागूजी खैरे, त्यांच्यानंतर त्यांचे वडील भाऊसाहेब खैरे यांनी हा व्यवसाय सांभाळला. भाऊसाहेबांच्या निधनानंतर चंद्रकांत खैरेंच्या मातोश्री वत्सलाबाई खैरे, त्यांच्या दोन मुली म्हणजेच खैरे यांच्या भगिनी शारदा आणि अरुणा सध्या हा व्यवसाय सांभाळतात.

खैरे होते कंपनीत मॅनेजर...

खैरे यांचे बंधू स्व. सूर्यकांत खैरे हे एपीआय कंपनीत कार्यरत होते. काही काळ त्यांनीही या व्यवसायात लक्ष घातले होते. डेक्कन फ्लोअर मिलमध्ये नोकरी करत असताना खैरे राजकारणात आले. शिवसेनेचे शहरप्रमुख म्हणून त्यांनी राजकीय इनिंगला सुरुवात केली. मराठवाड्यात बाळासाहेब ठाकरे यांचे गारूड आणि पहिली शाखा छत्रपती संभाजीनगरमध्ये स्थापन झाल्यानंतर खैरेंची राजकीय कारकीर्द बहरायला लागली. शिवसेनेकडून खैरेंना दोन वेळा विधानसभेची उमेदवारी मिळाली.

ते विजयी झाले आणि राज्यात युतीचे सरकार आले तेव्हा त्यांना गृहनिर्माण, परिवहन, वन खात्याचा कारभार पाहण्याची संधी मिळाली. या शिवाय ते पालकमंत्रीही होते. दोन वेळा आमदार झाल्यानंतर शिवसेनेने त्यांना लोकसभेवर पाठवले. खैरे सलग चार वेळा निवडून आले. पक्षातही त्यांना उपनेते, नेते पदावर बढती मिळाली. राजकारणात एकापाठोपाठ शिखरे गाठत असले तरी त्यांच्या कुटुंबीयांनी अंत्यसंस्काराचे साहित्य विक्रीचा पारंपरिक व्यवसाय सोडला नाही, तो सुरूच ठेवला.

Traditional business Khaire family  News
Bhupesh Baghel Candy Crush : कँडी क्रश माझं फेव्हरेट; गेम खेळण्याच्या दाव्यावर बघेलांचं भाजपला बिनधास्त उत्तर...

आमचा पोटापाण्याचा धंदा आम्हाला करू द्या

राज्यात मंत्री, केंद्रात खासदार आणि विविध समित्यांचे अध्यक्ष झाल्यानंतर खैरेंनी कुटुंबीयांकडे व्यवसाय बंद करण्याचा आग्रह धरला. वेळोवेळी त्यांनी तसे कुटुंबातील सदस्यांना बोलूनही दाखवले, पण आज त्यांच्या कुटुंबातील जे सदस्य या व्यवसायाची धुरा सांभाळून आहेत, त्यांनी खैरेंना नकार दर्शवला. `तुम्ही तुमचे राजकारण सांभाळा, हा आमचा पोटापाण्याचा धंदा आहे तो आम्हाला करू द्या`, असे स्पष्ट सांगितले. त्यानंतर मात्र खैरेंनी आपला आग्रह सोडला.

आधी खैरेंच्या मछली खडक येथील वडिलोपार्जित लाकडी पटावच्या घरातून हा व्यवसाय सुरू होता. बांबू, दुरडी, मातीचे मडके, पांढरा कपडा, बुक्का, गुलाल असे अंत्यसंस्कारासाठी लागणारे सगळे साहित्य तिथे उपलब्ध असायचे. आज हे जुने घर पक्क्या तीनमजली आणि चकचकित इमारतीत बदलले आहे. एका मजल्यावर खैरे यांचे संपर्क कार्यालय आणि तळ मजल्यावर आजही अंत्यविधीसाठी लागणारे साहित्य विकण्याचे दुकान सुरू आहे.

Traditional business Khaire family  News
Prakash Ambedkar News : भाजपमध्ये अस्वस्थ असलेल्या पंकजाताईंना आंबेडकरांचा सल्ला

खैरे यांच्या मातोश्री वत्सलाबाई भाऊराव खैरे, भगिनी अरुणा व शारदा हा व्यवसाय कोणत्याही प्रकारचा कमीपणा वाटून न घेता करत आहेत. राजकारणात पद, प्रसिद्धी, पैसा आल्यानंतर अनेक राजकारणी बदलतात. जुना व्यवसाय फक्त ते आपण पूर्वी काय करत होतो, कसे दिवस काढले हे सांगण्यासाठी भांडवल स्वरूपात सांगतात. खैरे यांचे कुटुंबीय त्याला अपवाद ठरले आहेत. आजही खैरे यांच्या कुटुंबीयांच्या ओळखीत त्यांच्या पिढीजात व्यवसायाचाही समावेश आहे.

Edited By : Jagdish Pansare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com