Winter Session : भुखंड ढापणे, महिलांना शिवीगाळ अन् वसुली एवढेच या मंत्र्यांचे काम..

Anil Parab : जाताजाता फक्त वसुली करायची होती, ज्या पद्धतीने त्यांनी निर्णय घेतले त्याला जाताजाता फावडे मारणे म्हणतात.
Ad.Anil Parab-Abdul Sattar News, Aurangabad
Ad.Anil Parab-Abdul Sattar News, AurangabadSarkarnama

Anil Parab On Saatar : हिंदुत्वासाठी चाललो अशा बाता मारत शिंदे गटासोबत गेलेल्या अब्दुल सत्तारांनी जाताजाता डल्ला मारला, त्याला फावडं मारणं म्हणतात, अशा शब्दात शिवसेनेचे अॅड. अनिल परब (Anil Parab) यांनी सत्तारांच्या राजीनाम्याची मागणी केली. विधान परिषदेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या २८९ च्या प्रस्तावाचे समर्थन करतांना परब यांनी सत्तार यांच्यावर चांगलेच तोंडसुख घेतले.

Ad.Anil Parab-Abdul Sattar News, Aurangabad
Winter Session : गायरान जमीन, कृषी महोत्सव प्रकरणावरून सत्तारांच्या राजीनाम्यासाठी अजित पवार मैदानात..

कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांच्या विभागाकडून त्यांच्या सिल्लोड मतदारसंघात १ जानेवारीपासून राज्यस्तरीय कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवासाठी १५ कोटी वसुल करण्याचे टार्गेट संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांना दिल्याचा आरोप, प्रवेशिका वाटून पैसे गोळा करण्याचे प्रकरण आणि (Marathwada) नागपूर खंडपीठाने गायरान जमीनीचे वाटप बेकायदा ठरवत सत्तारांवर ताशेरे ओढले.

ही प्रकरणं आज सभागृहात गाजली. विधान परिषदेत अंबादास दानवे यांनी या विषयावर आक्रमक भूमिका घेत सत्तारांच्या राजीनाम्याची मागणी केली. यावर बोलतांना परब चांगलेच आक्रमक झाल्याचे पहायला मिळाले. त्यांनी सत्तारांना भुखंड ढापणारे मंत्री, महिलांना शिवीगाळ करणारे मंत्री असा त्यांचा उल्लेख केला.

अनिल परब म्हणाले, गायरान जमीन वाटपाच्या प्रकरणावर नागपूर खंडपीठाने अब्दुल सत्तार यांच्यावर ताशेरे ओढले. परंतु जेव्हा हा निर्णय महसुल राज्यमंत्री म्हणून सत्तारांनी घेतला होता, तेव्हा जिल्हाधिकाऱ्यांनी, उपसचिवांनी सांगून देखील त्यांनी ऐकले नाही. त्यांना जाताजाता फक्त वसुली करायची होती, ज्या पद्धतीने त्यांनी निर्णय घेतले त्याला जाताजाता फावडे मारणे म्हणतात.

या मंत्र्यांचे एकच काम होते भुखंड ढापणे, महिलांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करणे, आणि चारही बाजुंनी वसुली करणे. त्यामुळे त्यांना मंत्रीमंडळात राहण्याचा अधिकार नाही, त्यांचा तात्काळ राजीनामा घेतला पाहिजे. हा महत्वाचा विषय असल्यामुळे सगळे विषय बाजूला ठेवून ३५ च्या सूचनेनूसार सभागृहात चर्चा झाली पाहिजे, असेही परब म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com