..तर मग वर्षभराने खैरेंना भेटायला हिमालयात जावं लागेल ; शहाजी बापूंचा टोला..

शिंदे सेनेचे ५० गद्दार आमदार पुन्हा निवडून येणार नाहीत असा, दावा केला. हे पन्नास आमदार पुन्हा निवडून आले तर मी हिमालयात जाईल असे खैरे म्हणाले होते. (Chandrakant Khaire)
Mla Sahaji Patil-Chandrakant Khaire News, Aurangabad
Mla Sahaji Patil-Chandrakant Khaire News, AurangabadSarkarnama
Published on
Updated on

औरंगाबाद : पक्षातून फुटून गद्दारी गेलेले ५० आमदार पुन्हा निवडून येणार नाहीत, असा दावा करत असे झाले तर आपण हिमालयात निघून जाऊ, असे म्हणणारे (Shivsena) शिवसेना नेते चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांना शिंदे सेनेचे आमदार शहाजी बापू पाटील यांनी जोरदार टोला लगावला. चंद्रकांत खैरे यांनी दिल्लीत जाऊन हिमालयात एक गुहा आरक्षित करून ठेवावी, कारण वर्षभराने खैरेंना भेटायला हिमालयातच जावं लागेल, असा पलटवार शहाजी बापू यांनी केला आहे.

दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात शिंदे सेना व उद्धवसेना यांच्याकडून मेळावे, आढावा बैठका घेतल्या जात आहेत. या बैठकांमधून आरोप प्रत्यारोप, दावे प्रतिदावे आणि गौप्यस्फोट केले जात आहेत. (Marathwada) दोघेही एकमेकांवर तुटून पडले असून गद्दार, पन्नास खोके, वारसा, निष्ठा याचा दाखला देत टीका करत आहेत.

शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी औरंगाबाद येथे मेळाव्यानंतर टीका करताना शिंदे सेनेचे ५० गद्दार आमदार पुन्हा निवडून येणार नाहीत असा, दावा केला. हे पन्नास आमदार पुन्हा निवडून आले तर मी हिमालयात जाईल असे देखील खैरे म्हणाले होते.

Mla Sahaji Patil-Chandrakant Khaire News, Aurangabad
औरंगाबाद लोकसभा भाजप लढवणार की शिंदे सेना ? केंद्रीय मंत्र्यांची गुगली..

खैरेंच्या या दाव्यानंतर सोशल मीडियावर टीका आणि खिल्ली उडवली जात असताना काय ते डोंगर, काय ती झाडी, काय ते हॉटेल सगळं कसं ओके, फेम सांगोल्याचे आमदार शहाजी बापू पाटील यांनी खैरेंवर निशाणा साधला. खैरे यांनी दिल्लीत जाऊन हिमालयातील एखादी गुहा आरक्षित करून ठेवावी, असा चिमटा काढत वर्षभराने खैरेंना भेटायला हिमालयातच जावे लागेल, असा टोला लगावला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com