Sharad Pawar Sabha : आता वेळ आलीय.... चुकीच्या लोकांना आवरायची; शरद पवारांचा निशाणा कोणावर?

Beed NCP Rally : तीच स्थिती काकूंचे नातू संदीप क्षीरसागर यांनी आणली याचा मला आनंद आहे,
Sharad Pawar
Sharad PawarSarkarnama

Beed News : आता वेळ आलेलेली आहे. चुकीच्या लोकांना आवरायचं आहे. सत्तेचा गैरवापर केला जात आहे. व्यासपीठावर आज काही लोक आहेत. ते आमच्याबरोबर राजकारणात नव्हते. पण, काहीतरी मुद्दे काढून त्यांना तुरुंगात टाकले जाते. विशेषतः परळीत या गोष्टी अधिक होत आहेत. सत्तेचा गैरवापर करत लोकांना तुरुंगात डांबून कोणी वेगळं राजकारण करत असेल त्यांना उलथून टाकण्यासाठी कधीही वेळ लागणार नाही. ते करायला आमचे लोक तयार झाल्याशिवय राहणार नाहीत, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसे अध्यक्ष शरद पवार यांनी नेमका कोणाला दिला असा सवाल उपस्थित होत आहे. (Time has come to Stop the wrong people : Sharad Pawar)

ज्येष्ठ नेते शरद पवार यांची आज बीडमध्ये स्वाभिमान सभा झाली. त्या सभेत पवार बोलत होते. ते म्हणाले की, बऱ्याच दिवसांनी आज बीडला संदीप क्षीरसागरांनी आयोजित केलेल्या सभेला उपस्थित राहता आले. तुम्ही लोकांनी केलेले उत्स्फूर्त स्वागत पाहून मला जुन्या काळाची आठवण झाली. ती आठवण म्हणजे निष्ठेच्या बाबतीत बीड कधीही तडजोड करत नाहीत, त्यांच्या पाठीशी जनता उभी राहते, हे संदीप क्षीरसागर यांनी दाखवून दिले.

Sharad Pawar
Sandeep Kshirsagar Mimicry: संदीप क्षीरसागरांनी पुन्हा केली धनंजय मुंडेंची नक्कल; म्हणाले, ‘कुणाचाही नाद करा; पण....’

महराष्ट्रात आम्ही यशवंतराव चव्हाण यांच्या विचाराने काम करत होते. त्यावेळी खऱ्या नेतृत्वापेक्षा काही लोकांनी वेगळी भूमिका मांडायला सुरुवात केली. सामान्य जनता अस्वस्थ होते. त्यावेळी बीडचे नेतृत्व केशरकाकू क्षीरसागर यांच्याकडे होतं. त्यांनी भूमिका घेतली की, नेत्याच्या निष्ठेच्या संदर्भात मी तडजोड करणार नाही. त्याला पडेल ते करावं लागलं, पडेल ती किंमत मोजावी लागली तरी चालेल. पण मी भूमिकेपासून मागे हटणार नाही, अशी भूमिका केशरकाकूंनी घेतली होती. तीच स्थिती काकूंचे नातू संदीप क्षीरसागर यांनी आणली याचा मला आनंद आहे, असे पवार यांनी नमूद केले.

Sharad Pawar
Sandeep Kshirsagar Speech : शेवटच्या श्वासापर्यंत शरद पवारांच्या पायाशी राहीन; संदीप क्षीरसागरांचे भावनिक भाषण

शरद पवार म्हणाले की, चमत्कारिक लोकांच्या हातात आज सत्ता आहे. कष्टकऱ्यांबाबत त्यांना आस्था नाही. समाजात फूट पाडण्याची त्यांची भूमिका आहे. आज देशात किती प्रश्न आहेत. महागाई, खताच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढलेल्या आहेत. शेतकरी आज अडचणीत आहे. पण, सरकारला चिंता नाही. कायदा व सुव्यवस्थेची चिंता सरकारला नाही. मणिपूर, नागालॅंड, सिक्कीम, अरुणाचल प्रदेश या ठिकाणी कायदा व सुव्यवस्थेची समस्या आहे.

मणिपूरमध्ये समाजात, गावांत भांडणं झाली. अनेकांच्या घरांवर हल्ले केले जात आहेत. स्त्रीयांची धिंड काढली जात आहे. पण, भाजप सरकार कोणतेही पाऊल उचल नाही. देशाच्या पंतप्रधानांनी मणिपूरला जाण्याची आवश्यकता होती. पण, त्यांनी तिकडे ढुंकूनही पाहिले नाही. अधिवेशनात अवघे तीन मिनिटे बोलले. पण पंतप्रधानांनी मणिपूरच्या भगिनींचे दुःख जाणून घेतले नाही, अशी टीकाही शरद पवार यांनी मोदींवर केली.

Sharad Pawar
Jayant Patil On Ajit Pawar: अजित पवार मुख्यमंत्री होण्याचा प्रश्न आजतरी दिसत नाही; जयंत पाटलांचे भाष्य

पवार म्हणाले की, लोकांनी निवडून दिलेली सरकारे पाडण्याचे काम भाजपकडून केले जात आहे. स्थिर सरकार देण्याची घोषणा करता आणि केंद्रातील सत्तेच्या जोरावर विरोधकांची सरकारं उलथवून टाकता. त्यातून सामान्य जनतेचे जीवन उद्‌ध्वस्त केली जात आहेत. ज्यांना आपण सत्ता दिली, ते लोक योग्य पद्धतीने वागत नाहीत. ठाण्यातील सरकारी रुग्णालयात १८ लोकांचे जीव गेले. जखमींना आधार देण्याची जबाबदारी रुग्णालयांवर असताना त्याच रुग्णालयांत लोक मृत्युमुखी पडतात. त्याबाबत राज्य सरकार बघ्याचे भूमिका घेते, हे राज्य कसे चालेले आहे आणि कुठे चालेले आहे. हे आपण सर्वजण बघत आहोत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com