Nanded Political News : युती सरकारकडून नांदेडमध्ये बाहेरचा पालकमंत्री देण्याची परंपरा कायम!

tradition-of-ally-minister-in-nanded-continues-atul-sawe-to-oversee-administration : भाजप- सेना युतीच्या काळात दिवाकर रावते, साबेर शेख, रामदास कदम,अर्जुन खोतकर यांनी पालकमंत्रीद सांभाळले आहे. तर भाजपचे संकटमोचक म्हणून ओळखले जाणारे गिरीश महाजन यांनीही पालकमंत्री म्हणून नांदेडची जबाबदारी सांभाळली होती.
Nanded Guardian Minister Atul Save News
Nanded Guardian Minister Atul Save NewsSarkarnama
Published on
Updated on

लक्ष्मीकांत मुळे

Nanded Guardian Minister News : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दावोसला जाण्यापुर्वी पालकमंत्र्यांची नावे जाहीर केली. महायुतीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस यांना त्यांच्या संख्याबळानूसार पालकमंत्री पदावर संधी देण्यात आली आहे. कुठल्याही जिल्ह्यात स्थानिक पालकमंत्री दिला जावा, अशी त्या त्या पक्षाची मागणी असते. परंतु आधीच्या युती सरकार प्रमाणेच आताच्या महायुतीने अनेक जिल्ह्यात बाहेरचे पालकमंत्री दिले आहेत.

नांदेड (Nanded) जिल्ह्यात युती सरकारने सुरू केलेली बाहेरचा पालकमंत्री देण्याची परंपरा महायुतीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही पुढे नेली आहे.यामुळे महायुतीच्या स्थानिक नेत्यांमध्ये काहीसा नाराजीचा सूर आहे. राज्यातील पालकमंत्र्यांची यादी काल जाहीर झाली आणि त्यामध्ये नांदेडची जबाबदारी मंत्री अतुल सावे यांच्यावर सोपवण्यात आली आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना अतुल सावे यांच्याकडे जालन्याचे पालकत्व होते.

परंतु शिवसेना शिंदे गटाने त्यांच्या नावाला कडाडून विरोध दर्शवला. दुसरा कोणीही मंत्री पालकमंत्री म्हणून द्या, पण सावे नको, ते पक्षासाठी घातक आहेत, असा घणाघात जालन्यातील शिवसैनिकांनी केला होता. परिणामी अतुल सावे (Atul Save) यांना फडणवीस यांनी थेट नांदेडची जबाबदारी दिली. राज्यात जेव्हा जेव्हा युतीचे सरकार आले तेव्हा नांदेड जिल्ह्याला क्वचितच मंत्री पदाची संधी मिळाली. त्यामुळे जिल्ह्यावर पालकमंत्री म्हणून बाहेरची व्यक्तीच लादली जायची.

Nanded Guardian Minister Atul Save News
Atul Save-Sanjay Shirsat News : संभाजीनगरकरांनो, तुमचा पालकमंत्री कोण होणार; शिरसाट की सावे!

राज्यात युतीचे सरकार असताना माजी राज्यमंत्री डी. बी. पाटील यांना अल्प काळासाठी संधी मिळाली होती. त्यानंतर तीन वेळा युतीचे सरकार सत्तेवर आले,पण जिल्ह्याला मंत्रीपद मिळाले नाही. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील सर्व आमदार हे महायुतीचे निवडून आले. असे असताना जिल्ह्याचा मंत्रीपदापासून वंचित ठेवले गेले. परिणामी पुन्हा एकदा नांदेडवर बाहेरचा पालकमंत्री लादण्यात आला आहे.

Nanded Guardian Minister Atul Save News
Ashok Chavan News : नांदेडवर पकड मिळवण्यासाठी अशोक चव्हाण 'अ‍ॅक्टिव्ह'; विरोधकांच्या तंबूत शिरकाव!

नांदेडचे पालकमंत्री म्हणून छत्रपती संभाजीनगरचे अतुल सावे यांची घोषणा करण्यात आली आहे. राज्यात पहिल्यांदा भारतीय जनता पक्ष व सेना यांच्या युतीच्या काळात सेनेचे ज्येष्ठ नेते दिवाकर रावते, साबेर शेख, रामदास कदम,अर्जुन खोतकर यांनी पालकमंत्रीद सांभाळले आहे. तर भारतीय जनता पक्षाचे संकटमोचक म्हणून ओळखले जाणारे जळगावचे गिरीश महाजन यांनीही पालकमंत्री म्हणून नांदेडची जबाबदारी पार पाडली होती.

Nanded Guardian Minister Atul Save News
Nanded Congress News : भोकरमध्ये काँग्रेस फुटली; पण पदाधिकाऱ्यांचा ओढा भाजपऐवजी अजितदादांच्या राष्ट्रवादीकडे!

महायुतीचे सरकार आल्यावर नांदेडचे पालकत्व कोणाला मिळणार? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. मंत्री धनंजय मुंडे,पंकजा मुंडे यांच्या नावाची चर्चा सुरू होती. पण त्यांच्या नावाला तीव्र विरोध झाल्याने अखेर मुख्यमंत्र्यांचे विश्वासू अशी ओळख असलेल्या अतुल सावे यांच्याकडे ही जबाबदारी सोपवण्यात आली. सावे यांना आता भाजपचे खासदार अशोक चव्हाण,काँग्रेसचे रविंद्र चव्हाण, भाजपाचे पाच आमदार, शिवसेना शिंदे गटाचे चार,व राष्ट्रवादी काँग्रेसचा एक आमदार अशा सगळ्यांना सोबत घेऊन काम करण्याची कसरत करावी लागणार आहे.

Nanded Guardian Minister Atul Save News
Devendra Fadnavis : दावोसला जाण्यापूर्वी फडणवीसांनी घेतला मोठा निर्णय; 'या' तीन विश्वासू नेत्यांकडे सोपवली दुहेरी जबाबदारी

अशोक चव्हाणांकडून स्वागत

नांदेडचे पालकमंत्री हे आपल्यापेक्षा वरचढ नसावे, असा प्रयत्न माजी मुख्यमंत्री खासदार अशोक चव्हाण यांचा होता. त्यामुळे जेव्हा पालकमंत्री म्हणून वरिष्ठ पातळीवर पंकजा मुंडे, धनंजय मुंडे यांच्या नावाची चर्चा सुरू झाली तेव्हा चव्हाण काहीसे अस्वस्थ झाल्याची चर्चा होती. पंकजा मुंडे यांचे पालकमंत्री म्हणून नाव समोर येत असल्याचे जेव्हा माध्यमांनी विचारले,तेव्हा तो मुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे असे म्हणत चव्हाण बोलणे टाळत होते. अतुल सावे यांची नांदेडचे पालकमंत्री म्हणून निवड झाल्यानंतर चव्हाण यांनी सुटकेचा निश्वास सोडल्याची चर्चा आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com