Protest For Landless People: गायरान जमीन भूमिहीनांच्या नावे करा, जेलभरोने लक्ष वेधले..

Jail Bharo Andolan: गेली ६५ वर्षे हा लढा सुरू असून वन खाते व गायरान जमीन भूमिहीनांच्या नावे करण्याबाबत वेळोवेळी शासन स्तरावर अर्ज केले.
Protest For landless people News
Protest For landless people NewsSarkarnama
Published on
Updated on

Gairan Jamin Bhumihin: राज्यातील शासकीय व वनखात्याच्या गायरान जमीनी भूमिहीन कष्टकऱ्यांच्या नावे करण्याच्या प्रमुख मागणीसह आज जेलभरो आंदोलन करण्यात आले. मराठवाडा बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष तथा माजी जिल्हा परिषद सदस्य रमेश गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.

Protest For landless people News
Imtiaz Jalil News : आधी नाकारली, मग परवानगी दिली ; ठेवीदारांचा मोर्चा धडकला..

गेली ६५ वर्षे हा लढा सुरू असून वन खाते व गायरान जमीन भूमिहीनांच्या नावे करण्याबाबत वन खातेदार व गायरान धारक यांनी वेळोवेळी शासन स्तरावर अर्ज केले, मोर्चे काढले, आंदोलने उभारली. (Aurangabad) त्याची दखल म्हणून महाराष्ट्र शासनाने अनेक शासन निर्णय काढले परंतु शासन निर्णयाची अंमलबजावणी झाली नाही. (Marathwada) याला कारणीभूत तलाठी, मंडळ अधिकारी, तहसीलदार असल्याचा आरोप यावेळी गायकवाड यांनी केला.

संबंधितांनी त्यांचे कर्तव्य पार न पाडता अतिक्रमण धारकांचा अतिक्रमणाचा पुरावा तयार होऊ नये म्हणून मुद्दामहून अतिक्रमण शेत जमिनीचा पंचनामा केला नाही, अतिक्रमण नोंदवहीला नोंदी घेतल्या नाहीत. (Maharashtra) त्यामुळे शासन निर्णय कितीही झाले तरी त्याची अंमलबजावणी होत नाही याचा प्रत्यय वनजमीन धारक व गायरान धारकांच्या अनुभवातून आलेला आहे.

१४ नोव्हेंबर १९९१ व १४ ऑगस्ट २००१ च्या शासन निर्णयाप्रमाणे जमिनीचे वाटप झाले नाही. तसेच वन समित्यांचे अहवाल शासन पातळीवर पायदळी तुडविले जातात. राज्याच्या एकूण लोकसंख्येच्या प्रमाणात ५०% जमीन भांडवलदारांनी ताब्यात घेतली आहे, असा आरोप देखील गायकवाड यांनी केला. भूमिहीन शासकीय गायरान जमिनीवर पिके काढून स्वतःची उपजीविका करत असतात.

त्यांचे अतिक्रमणे सुप्रीम कोर्टाचा निर्णय पूर्णपणे वाचून न घेता सिविल अपील नं. ११३२ व एस.एल.पी. (सी) नं. ३१०९/२०११ या जनहित याचिकेचा हवाला देऊन दलित, ओबीसी व अल्पसंख्यांकांच्या ताब्यातील जमीन हिसकावण्यासाठी नोटीसा दिल्या जात आहेत. या विरोधात आपले हे आंदोलन असल्याचे गायकवाड यांनी स्पष्ट केले.

Protest For landless people News
Aurangabad Divisional Commissioner: मधुकरराजे आर्दड नवे विभागीय आयुक्त..

या शिवाय जिल्ह्यातील सर्व झोपडपट्टी वासियांना मालकी हक्काचे पीआर कार्ड देण्यात यावे. घरकुल योजनेचे १० लक्ष रुपये अनुदान द्यावे, सर्व निवासी अतिक्रमण नियमानुकुल करण्यात यावे, गायरान जमिनीवरील सर्व अतिक्रमण धारकांना दिलेल्या नोटिसा परत घ्याव्यात. तसेच शासन निर्णयाप्रमाणे अनुसूचित जाती जमाती तसेच सर्वच समाजाचे अतिक्रमण नियमानुकुल करण्यात यावे, अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली.

रमेश गायकवाड हे पश्चिम विधानसभा मतदारसंघातून इच्छूक आहेत. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत ते मोठ्या ताकदीने उतरणार आहेत. याचाच भाग म्हणून आजच्या आंदोलनाकडे पाहिले जात आहे. सर्वसामान्य, गरीबांचे प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला आमदार व्हायचे असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com