Prakash Solunke : ''मी 'Victim' असताना मलाच 'Villain' करण्याचे प्रयत्न सुरू'' ; प्रकाश सोळुंकेंचं विधान!

SIT Probe : दगडफेक व जाळपोळ प्रकरणाची 'SIT' चौकशी करण्याची केली आहे मागणी.
Prakash Solunke
Prakash Solunke Sarkarnama
Published on
Updated on

कमलेश जाब्रस -

Majalgaon News : ऑक्टोबरला आपल्या घरावर झालेली दगडफेक व जाळपोळ प्रकरण पोलिसांच्या निष्क्रियतेमुळे घडल्याचा आरोप राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके यांनी केला. शिवाय या प्रकरणाची SIT मार्फत चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली.

प्रकाश सोळंके(Prakash Solunke) म्हणाले, ''30 ऑक्टोबरला मी घरात होतो दगडफेक जाळपोळ करणाऱ्यांना मी पाहिले नसून याप्रकरणी फिर्याद देखील दिलेली नाही. पोलिसांना जवाब सुद्धा दिलेला नाही, एकाही व्यक्तीचे नाव सांगितलेले नाही. मात्र उपलब्ध रेकॉर्डिंग पोलिसांना दिले आहे. प्रत्यक्ष जाळपोळ दगडफेक प्रकरणात ज्यांच्या विरोधात प्रत्यक्ष पुरावे आहेत त्यांनाच आरोपी करावे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Prakash Solunke
Amol Mitkari : ''2024 मध्ये अजित पवार मुख्यमंत्री असतील अन्...'' ; बावनकुळेंच्या 'त्या' वक्तव्यावर अमोल मिटकरींचा दावा !

तसेच, ''राजेंद्र होके ,रामचंद्र डोईजड, अजय राऊत ,लखन सावंत यांचा दगडफेक व जाळपोळ प्रकरणी काहीही संबंध नाही, त्यांनाही पोलिसांनी आरोपी केले आहे. निरपराध लोकांना पोलिसांनी अडकवू नये आमदार या नात्याने मी सर्वतोपरी सहकार्य करेल.'' असेही सांगितले.

''मी 'Victim' असताना मलाच 'Villain' करण्याचा प्रयत्न केला जातोय आहे. लवकरच सीसीटीव्ही फुटेज व व्हिडीओसह आपण फेसबुक लाईव्ह करणार आहोत.'' असे आमदार सोळंके यांनी सांगितले. बाबुराव पोटभरे, जयसिंग सोळंके, नितीन नाईकनवरे, चंद्रकांत शेजुळ, जयदत्त नरवडे, श्रीहरी मोरे, कल्याण आबूज, नासेर खान पठाण, सुशील डक, सुशील सोळंके उपस्थित होते.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com