Amol Mitkari : ''2024 मध्ये अजित पवार मुख्यमंत्री असतील अन्...'' ; बावनकुळेंच्या 'त्या' वक्तव्यावर अमोल मिटकरींचा दावा !

Chandrasekhar Bawankule : शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाटांनीही दिली आहे प्रतिक्रिया ; मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यावरून महायुतीत धुसफूस सुरू झाल्याची चर्चा!
Amol Mitkari
Amol MitkariSarkarnama
Published on
Updated on

Mahayuti News : भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी 2024मध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पदाची पुन्हा शपथ घेतील, असा संकल्प भंडारा जिल्ह्यातील लाखणी येथे रविवारी भाजपा मेळव्यात पदाधिकारी, कार्यकर्त्यांकडून वदवून घेतला.

यानंतर राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाल्या, तर बावनकुळेंच्या या विधानावर महायुतीमधील भाजपचे मित्र पक्ष असलेल्या शिवसेना(शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस(अजित पवार) कडून प्रतिक्रिया समोर आली आहे.

2024मध्ये अजित पवारांना मुख्यमंत्री करण्याचा संकल्प करण्यात आला आहे, असं अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) म्हणाले आहेत. तर शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनीही प्रतिक्रिया देत मुख्यमंत्री पदाचा चेहरा प्रदेशाध्यक्ष ठरवत नसतो, असा टोला लगावला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Amol Mitkari
Chandrasekhar Bawankule : फडणवीस पुन्हा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार? ; बावनकुळेंच्या विधानाने चर्चांना उधाण!

राष्ट्रवादी(अजित पवार गट) आमदार अमोल मिटकरी म्हणाले, ''पाच राज्यांच्या निवडणुकांचे जे निकाल आले. त्यामध्ये चार राज्यात भाजपाला जनतेने स्पष्ट बहुमत दिलं. त्यामुळे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची कॉन्फिडन्स लेव्हल वाढणं साहाजिक आहे. जसा बावनकुळेंचा संकल्प आहे, तसा राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता या नात्याने आमचाही संकल्प आहे, की झोकून देऊन काम करू आणि अजित पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री 2024-2029ला असतील आणि तेही वानखेडे स्टेडियमवरच शपथ घेतील.''

याशिवाय शिवसेना(शिंदे गटाचे) छत्रपती संभाजीनगर(पश्चिम)चे आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी म्हटले की, ''निवडणूक झाल्यानंतर जे आमदार निवडून येतील, त्यानंतर पक्षाचे वरिष्ठ नेते त्यावर निर्णय घेतात. आजही तुम्ही पाहिलं असेल, ज्या राज्यात भाजपचे सरकार आले, तिथल्या भाजपच्या प्रदेशाध्यक्षांनी कधी हे नाही सांगितलं की इथला मुख्यमंत्री कोण असेल. त्यांना हे अधिकार नाहीत. परंतु बावनकुळेंनी एक राजकीय विधान केलं आहे, जेणेकरून आपल्या कार्यकर्त्यांचं मनोबल वाढावं. त्यामुळे आम्ही त्यांच विधान फारस गांभीर्याने घेत नाही.''

Amol Mitkari
Nagpur : हिवाळी अधिवेशन महायुतीचं सत्ताधारी म्हणून शेवटचं अधिवेशन ठरणार

चंद्रशेखर बावनकुळे नेमकं काय म्हणाले होते? -

भंडारा येथील भाजपच्या मेळाव्यात बोलताना 2024 मध्ये नवीन सरकारमध्ये वानखेडे स्टेडियमवर मुख्यमंत्री पदाची कोण शपथ घेणार? असा प्रश्न चंद्रशेखर बावनकुळे(Chandrasekhar Bawankule) यांनी उपस्थित पदाधिकारी, कार्यकर्त्यांना विचारला, त्यावर सर्वांनी एकमुखाने देवेंद्र फडणवीसांचं नाव उच्चारलं. तसेच महाराष्ट्रात एकच वाघ आहे, तो म्हणजे देवेंद्र फडणवीस, दुसरा कोणी वाघ होऊ शकत नाही. असंही बावनकुळेंनी यावेळी बोलून दाखवलं.

''या नवीन सरकारमध्ये पुन्हा एकदा वानखेडे स्टेडियमवर....ऐकला का सर्वांनी. वानखेडे स्टेडियमवर कुणाचा शपथविधी झाला होता? दोन्ही हात वर करून जोरात सांगा तुमच्या मनात काय? या महाराष्ट्रात पुन्हा वानखेडे स्टेडियमवर ....यावर उपस्थितांनी एकमुखाने देवेंद्र फडणवीसांचं नाव घेतलं होतं.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com