Manoj Jarange Patil : तुकाराम मुंढेंचे मोठे बंधू जरांगे पाटलांच्या भेटीला, 'या' मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असल्याची चर्चा

Ashok Munde met Manoj Jarange Patil : सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांचे मोठे बंधू अशोक मुंढे यांनी अंतरवली सराटीत जाऊन मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. या भेटीनंतर अशोक मुंढे हे विधानसभा लढवण्यासाठी इच्छुक असल्याचं बोललं जात आहे.
Ashok Munde, Manoj Jarange Patil
Ashok Munde, Manoj Jarange PatilSarkarnama
Published on
Updated on

Jalna News, 20 August : सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांचे मोठे बंधू अशोक मुंढे यांनी अंतरवली सराटीत जाऊन मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. या भेटीनंतर अशोक मुंढे (Ashok Mundhe) हे विधानसभा लढवण्यासाठी इच्छुक असल्याचं बोललं जात आहे.

सध्याच्या सरकारने आमच्या मागण्या मान्य केल्या नाहीत तर राज्यातील विधानसभेच्या 288 मतदारसंघात उमेदवार उभे करणार असल्याची घोषणा मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. शिवाय यासाठी त्यांनी जे कोणी विधानसभा लढवण्यासाठी इच्छूक असतील त्यांना भेटण्यासाठीचं आवाहन देखील केलं होतं.

त्यानुसार आता अनेक इच्छुक जरांगे यांची भेट घेताना दिसत आहेत. अशातच आता सनदी अधिकारी तुकाराम मुंढे (Tukaram Mundhe) यांचे मोठे बंधू अशोक मुंढे यांनी अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगेंची भेट घेतली आहे. अशोक मुंढे हे गेवराई मतदार संघातील ताडसोन्ना या गावचे रहिवासी आहेत. गेवराई मतदार संघातून ते इच्छुक असल्याचं बोलल जात आहे.

Ashok Munde, Manoj Jarange Patil
Badlapur School Case : बदलापुरात चिमुकलींवर अत्याचार, संभाजीराजे मोदी अन् शिंदे सरकारवर संतापले; म्हणाले...

तर जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) आणि अशोक मुंडे यांच्यात यावेळी जवळपास 20 मिनिटं चर्चा झाली. मात्र, या भेटीनंतर त्यांनी प्रसार माध्यमांशी बोलण्यास नकार दिला. त्यामुळे या भेटीत नेमकी काय चर्चा झाली? याबाबतची माहिती समजू शकली नाही. मात्र, विधानसभेच्या उमेदवारीसाठी अनेक नेते जरांगे पाटलांची भेट घेत असतानाच मुंडे यांनी ही भेट घेतल्यामुळे ते आगामी निवडणुकीसाठी इच्छुक असल्याचं बोललं जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com