Badlapur news today marathi : बदलापूर येथील घटनेचे राज्यभरात तीव्र पडसाद उमटत आहेत. विविध स्तरातून घटनेबाबत संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच जुंपली आहे. यातच माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी सरकारवर निशाणा साधला आहे.
देशात कायद्याचा धाक राहिला नाही. लोकांनीच कठोर भूमिका घेतली, तर शासनाने आणि समाातील बेगजी मानवतावाद्यांनी लोकांना दोष देऊ नये, असं संभाजीराजे छत्रपती यांनी सुनावलं आहे.
'एक्स' अकाउंटवर ट्विट करत संभाजीराजे छत्रपती म्हणाले, "कोलकाता येथील घटनेतील सर्व आरोपी अद्याप पकडले गेले नाहीत. उरण येथील घटना ताजी असतानाच नुकतीच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात दहावीत 96% मिळविलेल्या एका 16 वर्षांच्या मुलीने विकृत मेकॅनिक मुलाच्या अघोरी त्रासाला कंटाळून आत्महत्या केली."
"आता बदलापूर येथील शाळेत चिमुकल्यांवर अत्याचार झाल्याचे उघडकीस येत आहे. संपूर्ण देशभरात कोणतेच सरकार महिलांना सुरक्षिततेची हमी देण्यास कमी पडत आहे. विकृती वाढीस लागली आहे. आरोपींना वेळीच पकडले जात नाही. पकडले तरी कठोर शिक्षा होत नाही. कित्येक तर निर्दोष सुटून जातात. देशात कायद्याचा धाक राहिला नाही," अशी खंत संभाजीराजे छत्रपती यांनी व्यक्त केली आहे.
"अशा गैरप्रकारांना रोखण्यासाठी लोकांनीच कठोर भूमिका घेतली, तर शासनाने आणि समाजातील बेगडी मानवतावाद्यांनी लोकांना दोष देऊ नये," असं म्हणत संभाजीराजे छत्रपती यांनी यांनी केंद्र आणि राज्य सरकारला लक्ष्य केलं आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.