Tushar Rathod Politcs : अशोक चव्हाणांना ओव्हरटेक करत आमदाराने लावली ताकद : मुखेड, मुदखेडसाठी CM फडणवीसांकडे टाकला शब्द!

Tushar Rathod Vs Ashok Chavan : तुषार राठोड यांनी अशोक चव्हाण यांना ओव्हरटेक करत थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मुखेड आणि मुदखेड या दोन तालुक्यांचा समावेश ट्रिगर वन मध्ये करावा, यासाठी मागणी केली.
ashok chavan, tushar rathod
ashok chavan, tushar rathod Sarkarnama
Published on: 
Updated on: 

Nanded Politics : मराठवाड्यासह महाराष्ट्रातील २६५ तालुक्यांमध्ये राज्य सरकारने ट्रिगर १ नियम लागू करत दुष्काळ सदृश्य परिस्थिती जाहीर केली. मराठवाड्यातील ७६ पैकी ७४ तालुक्यांचा यामध्ये समावेश करण्यात आला. अख्ख्या मराठवाड्यात दुष्काळ असताना भाजपचे खासदार व जिल्ह्यात सर्वाधिक आमदार असलेल्या नांदेड जिल्ह्यातील मुखेड आणि मुदखेड या दोन तालुक्यांना मात्र वगळण्यात आले.

जिल्ह्यातील हे दोनच तालुके का वगळण्यात आले? यावरून कार्यकर्ते आपल्या नेत्यांना फोन करून जाब विचारत होते. खासदार अशोक चव्हाण यांना तर एका कार्यकर्त्याने लोक आम्हाला शिव्या घालत आहेत? असे म्हणत संताप व्यक्त केला होता. त्यावर अशोक चव्हाण यांनी दोन दिवस शिव्या खा, आम्ही प्रयत्न करत आहोत असे म्हणत रागा केला होता. समाज माध्यमांवर या ऑडिओ क्लिपची राज्यभर चर्चाही झाली. त्यानंतर मुखेडचे आमदार डॉ. तुषार राठोड यांनी खासदार अशोक चव्हाण यांना ओव्हरटेक करत थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मुखेड आणि मुदखेड या दोन तालुक्यांचा समावेश ट्रिगर वन मध्ये करावा, यासाठी मागणी केली.

मुख्यमंत्र्यांनीही दोन्ही तालुक्यांचा समावेश या यादीत करणार असल्याचे आश्वासन त्यांना दिले. आता या दोन्ही तालुक्यांचा समावेश होणार असल्याचे सांगत तुषार राठोड यांनी अशोक चव्हाण यांच्यावर कुरघोडी केल्याची चर्चा नांदेडच्या राजकारणात सुरू झाली आहे.

यापूर्वी नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीतही तुषार राठोड यांनी अशोक चव्हाण यांच्या मेहनतीवर पाणी फिरवत थेट मुख्यमंत्र्यांकडून बँकेच्या अध्यक्षपदावर आपली वर्णी लावून घेतली होती. मुख्यमंत्र्यांकडूनच अध्यक्षपदासाठी तुषार राठोड यांच्या नावाची शिफारस झाल्यामुळे अशोक चव्हाण यांचा नाईलाज झाला आणि त्यांनी राठोड यांच्या नावाला पसंती दर्शवली.

ashok chavan, tushar rathod
Maharshtra Drought : अशोक चव्हाण अन् तुषार राठोडांच्या अडचणी वाढल्या! मुदखेड, मुखेड तालुके दुष्काळातून वगळले; शेतकरी आक्रमक!

जिल्हा बँक ताब्यात घेण्यासाठी चव्हाण यांनी सर्वपक्षीयांना एकत्र घेत निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न केला. १३ संचालक बिनविरोध निवडूनही आणले. अध्यक्षपदावर आपल्या समर्थकांची वर्णी लावून जिल्हा बँकेचा कारभार आपल्या हातात ठेवण्याचा अशोक चव्हाण यांचा प्रयत्न होता. मात्र तुषार राठोड यांनी थेट मुख्यमंत्र्यांमार्फत त्यांचा हा प्रयत्न हाणून पाडत अध्यक्षपद पटकावले. आता दुसऱ्यांदा मुखेड, मुदखेड या दोन तालुक्यांचा समावेश दुष्काळी तालुक्यांच्या यादी करण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे आपले वजन वापरत अशोक चव्हाण यांना ओव्हरटेक केल्याची चर्चा रंगू लागली आहे.

शासनाने जाहीर केलेल्या २६५ दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीतून वगळण्यात आलेल्या मुखेड आणि मुदखेड तालुक्यांचा लवकरच दुष्काळी यादीत समावेश केला जाईल, अशी माहिती आमदार डॉ. तुषार राठोड यांनी दिली. शासनाने २३ मार्च रोजी दुष्काळग्रस्त तालुक्यांची यादी जाहीर केली होती. मात्र, तांत्रिक कारणांमुळे मुखेड आणि मुदखेड तालुक्यांचा या यादीत समावेश झाला नव्हता. याप्रकरणी आपण राज्याचे महसूल मंत्री तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन तालुक्यातील गंभीर परिस्थितीची माहिती दिली आहे.

लवकरच नवीन GR

मुख्यमंत्री आणि महसूल मंत्र्यांनी याबाबत सकारात्मक आश्वासन दिले असून, मंत्री उपसमितीच्या बैठकीतही या विषयावर चर्चा झाली आहे. आवश्यक अनुपालनास (Compliance) मान्यता मिळाल्यानंतर लवकरच नवीन शासन निर्णय (GR) निर्गमित करून दोन्ही तालुक्यांचा ‘ट्रिगर-१’ अंतर्गत दुष्काळी यादीत समावेश केला जाईल, असा विश्वास आमदार डॉ. तुषार राठोड यांनी व्यक्त केला.

ashok chavan, tushar rathod
Ashok Chavan : नांदेड जिल्ह्यातील दोन तालुके वगळल्याने अशोक चव्हाण नाराज, पाठपुरावा सुरू!

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com