Ambadas Danve On Wadettiwar : विरोधी पक्षनेतेच आपापसात भिडले; वडेट्टीवारांच्या आरोपाला दानवेंचे आव्हान...

Congress News : दानवे मराठा आहेत तरी त्यांनी ओबीसीचे प्रमाणपत्रही घेतले आणि वैधता प्रमाणपत्रही.
Opposition Leaders News
Opposition Leaders NewsSarkarnama
Published on: 
Updated on: 

Maharashtra Political News : राज्यात मराठ्यांना कुणबी जातीचे प्रमाणपत्र आणि त्याआधारे ओबीसींचे आरक्षण लागू करण्याचा मुद्दा सध्या सर्वत्र गाजतोय. (Ambadas Danve News) अंतरवाली सराटीतील आंदोलनातून मनोज जरांगे पाटील यांनी ही मागणी सरकारकडे केली आणि नव्या वादाला सुरुवात झाली. हे लोण आता राज्यभर पसरत असतानाच राज्याच्या विधिमंडळातील दोन्ही सभागृहांचे विरोधी पक्षनेतेच आपापसात भिडल्याचे दिसून आले आहे.

Opposition Leaders News
Ambadas Danve On Bansode : शरद पवारांच्या `कृतज्ञता` सोहळ्यात दानवे कुणाला `कृतघ्न` म्हणाले...

विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यावर बनावट ओबीसी प्रमाणपत्र घेतल्याचा गंभीर आरोप केला. (Congress) त्याला दानवे यांनी आव्हान देत बनावट प्रमाणपत्राचे आरोप खोटे असून, असे कोणतेही प्रमाणपत्र माझ्याकडे नसल्याचे स्पष्टीकरण दिले. तसेच वडेट्टीवार यांच्याकडे काही माहिती असेल तर त्यांनी ते पुरावे सादर करावेत, असे आव्हानही दिले.

त्यामुळे दोन्ही सभागृहांचे विरोधी पक्षनेते एकमेकांच्या विरोधात आरोप-प्रत्यारोप करत असल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे. (Shivsena) वडेट्टीवार यांनी माध्यमांना माहिती देताना अंबादास दानवे यांच्यावर खोटे ओबीसी प्रमाणपत्र घेतल्याचा गंभीर आरोप केला होता. यावर माध्यमांशी बोलताना दानवे यांनी आरोप फेटाळून लावतानाच वडेट्टीवार यांच्याकडे काही पुरावे असतील तर त्यांनी सर्वांसमोर सादर करावेत, असे म्हटले आहे.

दानवे मराठा आहेत तरी त्यांनी ओबीसीचे प्रमाणपत्रही घेतले आणि वैधता प्रमाणपत्रही घेतल्याचा आरोप वडेट्टीवार यांनी केल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. यावर दानवे यांनी स्पष्टीकरण देताना वडेट्टीवर यांनी व्यक्तिशः माझ्यावर केलेले आरोप पूर्णतः खोटे असून, त्यांच्याकडे अशी काही माहिती असेल तर त्यांनी याचे पुरावे सादर करून सत्य माहिती सर्वांसमोर सादर करावी, जेणेकरून वास्तव परिस्थिती समोर येईल असे म्हटले आहे.

तसेच विरोधी पक्षनेते यांनी सत्य माहिती घेऊन असे आरोप करावेत, खोटे आरोप करू नयेत, असा सल्लाही दिला. शिवसेनेचा एक कार्यकर्ता म्हणून मला अभिमान आहे. शिवसैनिक म्हणूनच मी राज्यभर फिरतो, मी कोणत्याही जातीचा नेता नसून आतापर्यंत कसल्याही आरक्षित जागेचा मी लाभ घेतलेला नाही. नगरसेवक ते विरोधी पक्षनेते पदापर्यंत पोहोचलो तरीही खुल्या गटातून मी निवडून आलेलो आहे, असेही दानवे यांनी स्पष्ट केले.

Opposition Leaders News
Ashish Shelar On Aditya Thackeray : आदू बाळ, बालबुद्धीपणाचा कळस गाठू नका; शेलारांचा ठाकरेंना टोला...

मराठा समाजाला आरक्षण देताना इतर समाजाचे नुकसान होईल, असा निर्णय शासनाने घेऊ नये. यामुळे मराठा समाजासह इतर समाजाचेसुद्धा नुकसान होऊ शकते. मराठवाड्यातील शेतकरी समाजाचा उल्लेख अजूनही कुणबट म्हणून केला जातो. मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी हा पुरावा फायदेशीर ठरू शकतो, अशी अपेक्षाही दानवे यांनी व्यक्त केली.

Edited By : Jagdish Pansare

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.