Uddhav Thackeray News : 'माझा पक्ष चोरला, बाप चोरला, आता आणखी एक ठाकरे चोरतायेत...'

Loksabha Election 2024 : महाराष्ट्रात मोदी-शाहांच्या नावाने मतं मिळत नाहीत. महाराष्ट्रात ठाकरेंच्या नावाने मतं मिळतात, म्हणून पक्ष चोरला, बाप चोरला. आता आणखी एका ठाकरेला चोरले जात आहे. तुम्ही...
Uddhav Thackeray
Uddhav ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Nanded News : भाजपला महाराष्ट्रात मोदी, शाहांच्या नावार मतं मिळत नाहीत, म्हणून पक्षाची, नेत्यांची चोरी केली जात आहे. आधी माझा पक्ष, बाप चोरला आता आणखी एक ठाकरे चोरतायेत, असा टोला उद्धव ठाकरे यांनी भाजपला लगावला. पाहिजे तितके घ्या, पण महाराष्ट्रातील सामान्य जनता आमच्यासोबतच आहे, असा दावाही उद्धव ठाकरे यांनी केला.

अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांच्या मतदारसंघातील अर्धापुर तालुक्याच्या पिंपळगाव येथील कुटुंब संवाद मेळाव्यात ठाकरे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भाजपसोबत होऊ घातलेल्या संभाव्य युतीवरही भाष्य केले. अशोक चव्हाणाच्या मतदारसंघात येऊनही ठाकरेंनी त्यांच्यावर टीका करणे टाळल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या.

Uddhav Thackeray
Lok Sabha Election 2024 : अमित शहा-राज ठाकरेंची दिल्लीत 40 मिनिटं बैठक, आता बाळा नांदगावकरांचं लोकसभेबाबत मोठं विधान

ठाकरे म्हणाले, महाराष्ट्रात मोदी-शाहांच्या नावाने मतं मिळत नाहीत. महाराष्ट्रात ठाकरेंच्या नावाने मतं मिळतात, म्हणून पक्ष चोरला, बाप चोरला. आता आणखी एका ठाकरेला चोरले जात आहे. तुम्ही त्यांना खुशाल घेऊन जा, आमच्या सोबत सामान्य जनता आहे. ज्यांच्यात धाडस नाही तेच भाजपमध्ये जात आहेत.

भारतीय जनता पक्षाने दिलेली आश्वासने पूर्ण केली नाहीत. गेल्या दहा वर्षांच्या काळात शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही, युवकांना रोजगार मिळाला नाही. त्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या शासन काळात कोणालाही काही मिळाले नाही. भाजपाच्या जाहीरनाम्यात दिलेले आश्वासन पूर्ण झाली नाहीत, ही माहिती गावोगावी जाऊन मतदारांना सांगा. महाविकास आघाडीचे जागावाटप येत्या एक ते दोन दिवसात जाहीर होईल असेही उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) सांगितले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

आघाडीतील घटक पक्षाचा उमेदवार कोणीही असो तो निवडुन आला पाहिजे. नांदेडला महाविकास आघाडीचा उमेदवार प्रचंड मताधिक्याने निवडून येईल, असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. भारतीय जनता पक्षात असताना शिवसेनेची बदनामी होत होती. त्यांची साथ सोडल्याने समाजातील सर्व घटक जोडले जात आहेत.

आमचे हिंदुत्व हे चूल पेटवविणारे आहे, तर त्यांचे हिंदुत्व हे घर पेटविणारे, अशी टीकाही ठाकरे यांनी भाजपवर केली. ज्यांना आमदार केले, खासदार केले ते पक्ष सोडून गेले, अशा गद्दारांना निवडून येऊ देऊ नका, असे आवाहनही उध्दव ठाकरे यांनी केले.

दरम्यान, हिंगोलीच्या जनसंवाद सभेत अशोक चव्हाण यांचा आदर्शवाले असा उल्लेख करत ठाकरेंनी टीका केली होती. मात्र आज त्यांच्या मतदारसंघात येऊनही उद्धव ठाकरेंनी अशोक चव्हाण यांच्यावर टीका करणे टाळले, याची राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

Uddhav Thackeray
Pune Lok Sabha News 2024 : मोठी बातमी! पुण्यातून शरद पवार लढणार, कार्यकर्त्यांचा हट्ट पुरवणार का?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com