Latur Loksabha Constituency : महाविकास आघाडी लातूरमध्ये आतातरी जिंकण्यासाठी लढणार का?

Congress Political News: दोनवेळा 'बाय' मिळालेली भाजप मात्र तिसऱ्यांदा विजयाच्या आत्मविश्वासात वावरताना दिसत आहेत.
Sharad pawar, Uddhav Thakre & Balasaheb Thorat Latest News
Sharad pawar, Uddhav Thakre & Balasaheb Thorat Latest NewsSarkarnama
Published on
Updated on

राम काळगे

Latur News : गेल्या दोन टर्मपासून भाजपाकडे असलेली लातूर लोकसभेची जागा जिंकून हॅट्रिक साधण्याचा प्रयत्न पक्षाकडून सुरू आहे. यापुर्वीच्या निवडणुकीत काँग्रेसने दिलेले उमेदवार आणि त्यांना निवडून आणण्यासाठी लावलेली ताकद याबद्दल शंका व्यक्त केली जाते. काँग्रेसने जिंकण्याच्या उद्देशाने या निवडणुका लढल्याच नाहीत, असा आरोपही केला जातो. आता तरी महाविकास आघाडी (इंडिया आघाडी ) यावेळी जिंकण्यासाठी लढणार का? असा सवाल काँग्रेस-राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून केला जात आहे.

दोनवेळा 'बाय' मिळालेली भाजप (BJP) मात्र तिसऱ्यांदा विजयाच्या आत्मविश्वासात वावरताना दिसत आहेत. शैक्षणिक व राजकीयदृष्या आतिशय संवेदनाशील असलेल्या लातूर लोकसभा मतदारसंघात सर्वच पक्षाकडून निवडणुकीची मोर्चेबांधणी सुरू आहे. हा मतदारसंघ अनुसूचीत जातीसाठी राखीव असून तत्कालीन मुख्यमंत्री तथा केंद्रीय मंत्री विलासराव देशमुख यांनी यापूर्वी स्थानिक उमेदवार न देता जयंत आवळे यांच्या रूपाने इचलकरंजी येथून बाहेरचा उमेदवार आयात केला होता. पण तरीही विलासरावांच्या नेतृत्वावर लातूरकरांनी विश्वास दाखवत आवळे यांना विजयी करत दिल्लीत पाठवले होते.

त्यानंतर मात्र काँग्रेसला ही किमया साधता आली नाही. लातूर लोकसभा मतदार संघातून अनेक दिग्गजांनी यापूर्वी आपले नशीब आजमावले असून लोकसभेचे माजी सभापती तथा माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर (Shivraj Patil Chakurkar) यांनी सातवेळा निवडून येण्याचा विक्रम केला आहे. परंपरागत काँग्रेस पक्षाकडे असलेला लातूर लोकसभा मतदारसंघ 2004 मध्ये भाजपने रूपा पाटील निलंगेकरांच्या विजयाने आपल्याकडे खेचला. मतदारसंघ आरक्षित झाल्यापासून केवळ एकदा इथे काँग्रेसला विजय मिळवता आला होता.

Sharad pawar, Uddhav Thakre & Balasaheb Thorat Latest News
Pune BJP : धंगेकरांचा पराभव निश्चित; कसब्याचे उट्टे काढण्यास भाजप तयार...

काँग्रेसमध्ये (Congress) अंतर्गत गटबाजी नाही असा, आव स्थानिक नेत्यांकडून नेहमी आणला जातो. असे असले तरी चाकूरकर, निलंगेकर व देशमुख असे तीन गट जिल्ह्यात सक्रीयपणे काम करत असतात. सध्या भाजपविरोधी विचाराचे वारे वाहू लागले असून इंडीया आघाडीकडे अनेक पक्ष आकृष्ट होत आहेत. जिल्ह्यात काँग्रेसची वेगळी छाप असली तरी लातूर लोकसभा मतदार संघातून खासदार निवडून आणून तो वरचढ होईल व पुन्हा त्यांना बाजूला सारणे अवघड अशी भूमिका काँग्रेसमधील एका गटाकडून सातत्याने घेतली जाते.

देशमुखांशिवाय मतदारसंघात कुठलाच मोठा राजकीय निर्णय घेतला जात नाही. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, त्यांना संलग्न असलेल्या विविध कार्यकारी सोसायट्या, अनेक सहकारी साखर कारखान्यांच्या माध्यमातून देशमुखांनी जिल्ह्याच्या राजकारणावर कायमच आपले वर्चस्व राखले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

त्यामुळे लोकसभेचा उमेदवार ठरवताना देशमुखांची भूमिका महत्वाची असते. त्यांनी ठरवले तर लातूर लोकसभा मतदारसंघ जिंकणे कठीण नाही. सध्या महाविकास आघाडीकडून अनेक नावे चर्चेत असले तरी देशमुखांचा आशीर्वाद कोणाच्या पाठीवर पडणार हे? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. शिवाय जिल्हास्तरावर प्रमुख जबाबदारी कोणाच्या खांद्यावर दिली जाते यावर विजयाचे गणित अवंलबून असणार आहे. नुकताच महाविकास आघाडीचा जिल्हास्तरीय कार्यकर्ता मेळावा लातूर येथे संपन्न झाला. लवकरच महाविकास आघाडीचा मेळावाही होणार आहे.

मात्र त्याआधीच निलंगा येथे शुक्रवारी निलंगा विधानसभा मतदार संघाचा कार्यकर्ता मेळावा काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अशोकराव पाटील निलंगेकर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात येणार आहे. या मेळाव्यात लोकसभा निवडणुकीची रणनीती आखली जाणार आहे.

Sharad pawar, Uddhav Thakre & Balasaheb Thorat Latest News
Beed OBC Elgar Parishdad: गोपीनाथ मुंडे दुर्लक्षित; भुजबळांना ताकद अन् पंकजा मुंडे 'टार्गेट'

काँग्रेसकडून मागील निवडणुकीचा अनुभव व निकालातील मताधिक्य पाहता या निवडणूकीत तरी महाविकास आघाडी जिंकण्यासाठी लढणार का? असा सवाल निष्ठावंत कार्यकर्त्यांकडून विचारला जात आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

Sharad pawar, Uddhav Thakre & Balasaheb Thorat Latest News
Uddhav Thackeray : नार्वेकरांच्या निकालाची चिरफाड,शिवसेनेचा पुनर्जन्म…; जनता न्यायालयाचा 'मास्ट्रर स्ट्रोक' यशस्वी

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com